३५९) मेरी कोम (Mary Kom ) सिनेमा – एक चिंतन

359) Mary Kom-1      359) Mary Kom -2
३५९) मेरी कोम (Mary Kom ) सिनेमा – एक चिंतन

काही दिवसांपूर्वी हा सिनेमा बघितला, सिनेमा खूप आवडला. मी फारसे हिंदी सिनेमे  बघत नाही, पण चांगला विषय – आशय असेल तर मात्र आवर्जून बघतो. मेरी कोमच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. प्रियांका चोप्राने खूप मेहनत घेऊन  खऱ्या  मेरी कोमला न्याय दिला आहे. मेरी कोमच्या आयुष्यातील काही मोजके व  कलाटणी देणारे प्रसंग घेऊन सिनेमाची कथा गुंफली आहे. दिग्दर्शन, छाया चित्रण चांगले आहे. सर्व कलाकारांनी उत्तम कामे केली आहेत. अर्थात सिनेमा मला आवडण्याची खरी करणे वेगळीच आहेत.

कोणत्याही कलाकृतीतून (लेख, कविता, नाटक, TV मालिका, कथा, सिनेमा ) काही संदेश – शिकवण मिळाली पाहिजे असे माझे मत आहे. ह्या सिनेमातून अनेक जणांना खूप काही शिकण्यासारखे आहे, हेच सांगण्यासाठी ह्या लेखाचे प्रयोजन.

ह्या सिनेमाचे dialogue परिस्थितीवर नेमके भाष्य करतात.

— मणिपाल भारतात आहे हेच लोकांना माहित नाही.

— मेरी कोमची मुले मोठे होतील तेव्हा तरी ह्या प्रदेशात शांतता लाभू दे.

— तुम्ही खेळाडूना नुसती केळी आणि दुध दिले तरी सुद्धा हे खेळाडू  मेहनत करून देशाला मेडल मिळवून देतील.

मेरी कोमच्या आयुष्यातील मानसिक झगडा (वैयक्तिक – कौटुंबिक – career) आणि कोणत्याही क्षेत्रातील career woman च्या आयुष्यातील झगडा हा सारखाच असतो. मेरी कोमच्या नशिबाने तिला नवऱ्याची  साथ मिळते व  तिला जुळी मुले झाल्यानंतर तो परत career सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देतो. तिचे आई – वडील सुद्धा तिला मदत करतात. परंतु वास्तवात ह्या अशक्यप्राय गोष्टी आहेत. काही वेळा समजूतदार नवरा मिळतो पण इतर मंडळी त्याला परावृत्त करतात.

मुख्य प्रश्न career  स्त्री चा असतो. career च्या एका टप्प्यावर तिला लग्नही करायचे असते, पण मुला-बाळांची जबाबदारी नको असते. पण वडिलधाऱ्या मंडळींच्या अपेक्षांमुळे हे शक्य होत नाही. समजा बाईला  मुले आपल्या career च्या मध्ये अडथळा होतील म्हणून नको असतील आणि जरी नवरा व सासू -सासऱ्यांना  हे मंजूर असेल, तरी काही काळाने स्त्रीला तिचे मन खात राहते कारण मातृत्व हे प्रत्येक स्त्रीला हवे असते. पण हे उमगेपर्यंत स्त्रीचे वय वाढलेले असते आणि त्यातून परत अनेक प्रश्न निर्माण होतात.

समजा  वेळेवर मुले बाळे झाली आणि career परत सुरु झाली , तरी जेव्हा मुल आजारी पडते – त्याला भावनिक दृष्ट्या आईची गरज असते, तेव्हा ती स्त्री पुरेसा वेळ मुला – बाळांसाठी वेळ देऊ शकत नाही आणि हे वास्तव तिचे मन पोखरत राहते. ती स्वत:ला अपराधी समजते.

 
अनेक वेळा अशी career woman  वेगळाच मार्ग स्वीकारते. career च्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी मेहनत करावी लागते आणि हे करण्याची त्या स्त्रीची तयारी नसते.  पण मनमोकळेपणी हे मान्यही करायचे नसते. अश्यावेळी त्या मुलाची ढाल करून परत career सुरु करायाला  स्त्री नकार देते, पण आयुष्यभर स्वत:ची career बरबाद झाली म्हणून लग्नाला आणि पर्यायाने नवऱ्याला  दोष देते. त्यामुळे प्रत्येक career  woman  ने हा सिनेमा बघावा आणि आपला focus – किंवा आयुष्यातील ध्येय काय आहे ह्याचा मागोवा  घ्यावा व डोळसपणे लग्न  आणि त्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा  विचार करून, मनाला पटेल तो निर्णय घ्यावा आणि त्यावर ठाम राहावे.

आयुष्यात यश मिळवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ह्यावर सुरेख भाष्य  केले आहे. (फोकस, एकाग्रता, बांधिलकी, अपरंपार मेहनत वगैरे) उच्च शिक्षणाचे ध्येय असेल तर नेमके कसे आयुष्य काही वर्षे आपल्या वाट्याला येईल हे तपासून बघता येईल.

लहान मुलांना  खेळाचे आकर्षण असते. पण मेहनत करायची त्यांची तयारी असतेच असे नाही. त्यांना झटपट यश हवे असते. असे झटपट यश कोणत्याही खेळात कधीच मिळत नाही. कितीही सराव केला तरी रोज परीक्षा द्यावी लागते. कोणत्याही खेळासाठीच्या मेहनतीपेक्षा अभ्यास करणे सोपे असते. त्यामुळे अश्या मुलांनी हे समजण्यासाठी हा सिनेमा बघावा. ज्या मुलांना अभ्यासाच्या जोडीला आवड -छंद म्हणून खेळायचे  असेल तर काही प्रश्न नाही. पण खेळातील career हि खूप कठीण असते, हा संदेश आपल्याला मिळतो .

कोणत्याही खेळाचे आयोजन करणारे सरकारी अधिकारी आणि त्यांचे वागणे, त्यांचे मान-अपमान ह्यावर भाष्य  करून, भारत खेळात मागे का ह्याचे अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. अर्थात क्रिकेट हा खेळ ह्याला अपवाद आहे. त्यांचे तर अतोनात लाड होत असतात आणि त्यांना मिळणारे मानधन – सवलती – प्रतिष्ठा  हि इतर क्षेत्रातील खेळाडूना मिळत नाही हे आपले दुर्भाग्य आहे.

अनेक लोकांना  हे माहित नसेल कि मेरी कोम तिला मिळालेली बक्षिसाची रक्कम sports academy ला देते व साधेपणाने आपले आयुष्य जगते. हि बाब सिनेमात अधोरेखित करायला हवी होती असे मला वाटते. आपल्या क्रिकेट वीरांनी मेरी कोमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

मित्रानो, वेळ काढून हा सिनेमा बघाच.
 
मेरी कोम च्या career साठी खूप साऱ्या शुभेच्छा !!

सुधीर वैद्य
२८-०९-२०१४
Advertisements

0 Responses to “३५९) मेरी कोम (Mary Kom ) सिनेमा – एक चिंतन”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

October 2014
M T W T F S S
« Jul   Nov »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: