३५८) माझे आवडीचे ठिकाण :

358) Table-IMG_20130217_175111
३५८) माझे आवडीचे ठिकाण :

ह्या प्रश्नांचे उत्तर व्यक्ती सापेक्ष आहे ह्याची मला  पूर्ण कल्पना आहे. प्रत्येक माणसाचे आवडीचे ठिकाण वेगवेगळेच  असणार. अनेक जण कोणत्यातरी हिलस्टेशनचे नाव घेतील हे मात्र नक्की. 🙂

माझे उत्तर मात्र खूप वेगळे असणार आहे. माझे आवडीचे ठिकाण म्हणजे कोणतेही ग्रंथालय किंवा अशी जागा जेथे शांतपणे पुस्तक वाचायची – अभ्यासाची -ऑफिसचे काम करायची सोय आहे. काय चक्रावलात ना माझे उत्तर ऐकून? 🙂

माझे बालपण एका विचित्र परिस्थितीत गेले . काही वेळा मला प्रश्न पडतो कि मला बालपण होते का? ह्या परिस्थितीने मला एक गोष्ट शिकवली कि जन्म आपल्या हातात नसतो, पण जगावे कसे हे नक्की आपण ठरवू शकतो. वडिलांचा सहवास फार थोड्या वर्षांचा आहे हि जाणीव ६ व्या वर्षी झाल्यानंतर माझी काय अवस्था झाली असेल ह्याचे मी वर्णन करू शकत नाही. मला कल्पना आहे कि जर का तुम्ही हल्लीच्या लाडाकोडात वाढलेल्या ६ वर्षांच्या मुलाशी माझी तुलना करत असाल तर, तुमचा माझ्या सांगण्यावर विश्वास बसणार नाही.

मला एव्हडेच कळले कि मला शक्य असेल तेव्हडी वडिलांची सेवा केली पाहिजे. वयाच्या ७ व्या वर्षापासून पुढील १० वर्षे मी वडिलांना इन्सुलिनचे इंजेक्शन देत असे. वडिलांच्या औषधाच्या वेळा सांभाळत असे. मला कळले कि आता मला ह्या परिस्थितीवर मात करायची असेल तर मला खूप खूप शिकले पाहिजे. मी काही खूप हुशार विद्यार्थी नव्हतो. म्हणजे बुध्दिमत्ता चांगली होती पण मार्कांच्या तराजूत वजन कमी भरत  होते . 🙂 नशिबाची साथ किती मिळेल हे  कळलेच होते. मग एकच पर्याय म्हणजे भरपूर अभ्यास करणे.

जागा लहान आणि मोठे कुटुंब. त्यात पै  पाहुणा कायम असे. माझे घर म्हणजे एखादी धर्मशाळा होती. आई बिचारी हा रामरगाडा वाहून बेजार झाली होती. त्यात  भर म्हणून वडिलांच्या आयुष्याची कमजोर दोरी. ह्या परिस्थितीचा माझ्या कोवळ्या मनावर खूप परिणाम झाला. मी आईला प्रत्येक कामात मदत करू लागलो.  उरलेल्या वेळात मनसोक्त अभ्यास करणे. ज्या वयात मुले खेळतात त्या वयात माझी हि अशी दिनचर्या होती.

काही वर्षे मी गच्चीवर अभ्यासाला जात असे . कधी शाळेच्या बागेत अभ्यास करत असे. काही वेळा एकटा समुद्र किनाऱ्यावर जाऊन अभ्यास करत असे. एक दिवस असाच अभ्यास करत असताना काही गुंडांनी मला घेरले. मी प्रसंगावधान राखून त्यांच्या तावडीतून  धावत सुटलो. जवळ जवळ  ३० मिनिटे धावून  मी घरी पोचलो. आईला सर्व प्रकार सांगितला.

मग घरीच अभ्यास करू लागलो. घर लहान त्यामुळे रात्री जागरण सुद्धा करू शकत नव्हतो. महाविद्यालयात गेल्यानंतर अभ्यासाचा प्रश्न सुटला. ग्रंथालय रात्री ८ वाजेपर्यंत खुले असे. परंतु महाविद्यालय सुरु झाल्यानंतर पहिले ३ महिने ग्रंथालय ६ वाजेपर्यंत खुले असे. आम्ही महाविद्यालयाच्या Registrar कडे विनंती करून हि वेळ ८ वाजेपर्यंत वाढवून घेत असू. ग्रंथालयात बुवा नावाचा एक सेवक होता. तो माळकरी होता. अक्षर ओळख होती पण शिकला नव्हता. परंतु त्याला कोणत्याही पुस्तकाचे वर्णन आणि लेखकाचे नाव सांगितले कि ते पुस्तक ५ मिनिटात हजर करत असे. माझ्या शैक्षणिक यशात ह्या बुवाचा नक्की हातभार आहे.  धन्यवाद बुवा.  CA पास झाल्यावर मी आठवणीने त्याला पेढे दिले. तो क्षण मी आजही विसरू शकत नाही. आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी आले होते. कदाचित तुमचा विश्वास  बसणार नाही, पण हे लिहिताना सुद्धा माझे डोळे पाणावले आहेत.

त्यानंतर मी मोठ्या भावाकडे राहायला गेलो. नोकरी करताना ACS, DMA, DFM, DORM, DEM  चा अभ्यास करू लागलो. कंपनीत जबाबदारीचे पद सांभाळून अभ्यासासाठी रात्र आणि रविवार मिळत असे. हॉलला लागून एक मोठी बाल्कनी होती. त्यामुळे माझा मुक्काम अभ्यासासाठी तेथे असे, हे वेगळे सांगायला नकोच.

हल्ली पाल्य SSC ला गेला कि त्याच्या अभ्यासासाठी खोली सजवली जाते. night lamp ची, table -chair, पंखा – AC ची सोय केली जाते.  मी आयुष्यभर अभ्यास एका लहान writing डेस्क वर केला. त्याचा फोटो दिला आहे. आता माझा नातू ते वापरतो. ह्या डेस्क ची आठवण एक लेखात शब्दबद्ध केली आहे.

लिंक: https://spandane.wordpress.com/?s=%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%A9%29+%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F+%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE+%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4+%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%3A+

ज्या ठिकाणी शांतपणे बसून वाचता येईल, थोडा फार एकांत मिळेल, जेणेकरून आपण आपल्या मनाशी संवाद साधू शकू अशी  कोणतीही जागा माझ्यासाठी आवडते ठिकाण आहे. मला माहित आहे कि तुम्ही मला वेडा समजाल. हो, मी आहेच वेडा. वेडा  होतो म्हणूनच ह्या आयुष्यात काहीतरी कमावले, जेव्हा बरेच काही आधीच गमावले होते. गमावून सुद्धा काहीतरी मिळाले म्हणूनच मी आनंदी आहे. इतर अनेक जण  असतील ज्यांना गमावूनही काही मिळत नाही.

तुमच्या आवडत्या ठिकाणाची माहिती मला कळवाल? वाट बघतोय.
सुधीर वैद्य
२७-०९-२०१४
Advertisements

0 Responses to “३५८) माझे आवडीचे ठिकाण :”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

October 2014
M T W T F S S
« Jul   Nov »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: