३५६) Mind / मन – एक चिंतन

01-1966876_224067967799430_603025150_n  01-!cid_3.1533742920@web193805.mail.sg3.yahoo[1]  02-1962870_224068027799424_1745755581_n
03-P105017204-Lord Shiva---  05-P1060442
06-P1060440   07-154305404590383
08-Vitamin F     09-P1130394-1   10-1173842_224063144466579_1395133850_n
10-P1130393-1              10-Ripples
३५६) Mind / मन  – एक चिंतन

माणसाचे मन हा एक गहन विषय आहे. कितीही विचार – प्रयत्न केले तरी मनाचा  अभ्यास पूर्ण होणार नाही. स्वत:चे मन – त्याचा कौल कळला तरी नशीब . !!!

लहानपणापासून ‘ मन ‘ हा माझ्या आवडीचा विषय आहे. माझे मन मी बऱ्यापैकी ओळखले आहे. लोकांचे मन ओळखण्याचा सराव पदोपदी चालू असतो. 🙂

मित्रानो, तुमच्या लक्षात आले असेलच कि आज मी ‘ मन ‘ ह्या विषयावर तुम्हाला बोधामृत देणार आहे.

मात्र ह्या वेळी ‘ मनाचे विश्लेषण ‘  फोटोच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे तुम्हाला माझ्या फोटोग्राफीचा सुद्धा आनंद घेत येईल व कदाचित माझे विवेचन पटायला मदत होईल. 🙂

मन म्हणजे मन असते.
तुमचे आणि आमचे सेमच असते.
पण मन दुसऱ्याला दाखविता येत नाही हे दु:ख असते. 😦
तर मन दुसऱ्याला कळत नाही हि व्याकूळता असते.

आपले मन दुसऱ्याला न सांगता कळावे अशी अनेकांची अपेक्षा असते, पण मुळात तुम्हाला इतरांचे मन न सांगता कळते का? हा खरा प्रश्न आहे.

मन हे चंचल असते.
मन म्हणजे काय असते?
मन म्हणजे फांदीवरल्या पक्षासारखे असते. (फोटो १)
एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडत असते. (फोटो २)

मन म्हणजे उमलणाऱ्या कळीसारखे असते. (फोटो ३)
कधी कधी उमलण्याआधीच कोमेजून जाते.
तर कधी उमलल्यानंतर पाकळीसकट गळून जाते.

मन म्हणजे शंकरावर अभिषेक करणाऱ्या अभिषेकपात्रासारखे  असते. (फोटो ४ ) विचारांची धार चालूच असते.

मन कोठे असते?
कोणी म्हणतात की मन हृदयात असते.  (फोटो ५)
पण काही माणसाना हृदयच नसते. 🙂

सुखी व्हायचे असेल तर शरीर मनाच्या ताब्यात पाहिजे,
आणि मन बुद्धीच्या ताब्यात पाहिजे.

पण मग बुद्धी कोठे असते?

बुद्धी मेंदूत असते. (फोटो ६) पण काही लोकांना ~~~~~~~ 🙂 🙂

निर्णय घेण्यास बुद्धी पाहिजे की मन? की दोन्ही ?
निर्णय घेतला बुद्धीने तरी मनाचा कौल पाहिजे.
कारण  काही वेळा बुद्धी फसगत करू शकते.
त्यामुळे देवाच्या कौलापेक्षा मनाचा कौल तुमचे आयुष्य तारू शकते.

तुम्ही कधी विचाररहित मन अनुभवले आहे का? (फोटो ७)
नसेल तर नक्की प्रयत्न करा.
असे विचाररहित मन करणे वाटते तेव्हडे कठीण नसते.

विचाररहित मन करताना खूप मजा येते.
आणि जमले तर आयुष्याच बदलून टाकते.
आणि झोपेच्या गोळ्यांची गरजच संपवते.
(फोटो ८)

दिवसभरात आपल्या मनात ६०,००० हून जास्त विचार येतात असे वाचनात आले.  कसे मोजले – कोणी मोजले हे  प्रश्न जरी बाजूला ठेवले  तरी सुद्धा हे मान्य करावेच लागेल कि मनात विचारांची रांग  लागलेली असते. हे सांगण्याचा प्रयत्न ह्या फोटोत केला आहे . (फोटो ९)

ह्या असंख्य विचारांपैकी काही विचार प्रबळ ठरतात – असतात. परत परत मनात खळबळ करत राहतात. परंतु आपण जर का ह्या विचारावर वेळीच कारवाई केली तर हे विचार विरून जातात आणि आपले मन शांत होण्यास मदत होते. (फोटो १०)

असे हे मन !!! कितीही लिहिले तरी कमीच आहे.
मित्रानो, मला सांगाल  की मन म्हणजे काय असते आणि ते कोठे असते?

सुधीर वैद्य

२४-०९-२०१४
Advertisements

0 Responses to “३५६) Mind / मन – एक चिंतन”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

October 2014
M T W T F S S
« Jul   Nov »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: