३५४) आधुनिक जीवन शैलीचा उपवास:

07-154305404590383
३५४) आधुनिक जीवन शैलीचा उपवास: 
लेखाचे शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना मित्रानो?

इंडियातील बरेच नव – श्रीमंत लोक आधुनिक जीवन शैली उपभोगतात. पण भारतातील सर्वच लोकांच्या नशिबात हे सुख नसते. विकास सर्व स्थरावर होत असतो. पण माणूस मात्र दिवसेंदिवस ह्या विकासाचा व जीवन शैलीचा गुलाम होत जातो. अर्थात प्रगतीसाठी एव्हडी किंमत तर मोजावीच लागेल ना ? असो.

इंडियातील लोकांना आधुनिक वस्तू किवा Gadgets शिवाय जगणे विसरायला झाले आहे. आपला मूड हा बरेच वेळा ह्या आधुनिक वस्तू किवा Gadgets वर अवलंबून असतो. आपण कधी हेतू पुरस्सर ह्या आधुनिक वस्तू किवा Gadgets शिवाय जगायचा प्रयत्न केला आहे का? वीज नसेल तर दुसरा पर्यायच नसतो, हा भाग वेगळा.

मी Gadgets शिवाय जगायचा प्रयत्न नेहमी करतो. १९९७ पासून आम्ही  नियमितपणे दर महिन्याला गावाला जातो व शक्य असूनही आधुनिक वस्तू किवा Gadgets शिवाय मजेत जगतो. थांबा, त्या जगण्याची एक झलकच दाखवितो. नुकताच मी गावाला जाऊन आलो आणि ह्या विषयावर लिहायचे ठरवले.

१ ) गावाला आम्ही  काही दिवस राहतो.  पेपर विकत घेत नाही व वाचनालयात – शेजाऱ्याकडे वाचायची सोय  असताना सुद्धा पेपर वाचत नाही. घरी परतल्यानंतर सर्व पेपर वाचायला खूप मजा  येते. त्याच दिवशी पेपर न वाचून विशेष नुकसान होते असे मला अजूनतरी गेल्या १७ वर्षात जाणवले नाही. नाहीतरी  पेपरमधील  news च्या ठराविक categories तयार झाल्या आहेत . जाऊदे, नकोच तो विषय . 🙂 आता सध्या निवडणूक – वाटाघाटी- शह – काटशह हा विषय चालू आहे.

२)  गावाला washing machine विकत घेतले नाहीये. कपडे हातानी धुतो व मस्तपैकी उन्हात वाळवितो. तेव्हडाच शरीराला व्यायाम. विजेची  बचत होते ती वेगळी. इस्त्री असूनही वापरत नाही. कपडे washing machine मध्ये न सुखवल्यामुळे झटकून वाळत टाकले तर इस्त्रीची गरज लागत नाही.  विजेची  बचत होते ती वेगळी.  🙂

३)  गावाला फ्रीज विकत घेतला  नाहीये. तशी गरजही भासत  नाही . दुध दिवसातून दोनदा तापवले कि झाले. मी फ्रीज मधील गार पाणी पीत नाही – बर्फ खात नाही. गावाला पाणी उकळवून – माठात  गार केले कि फ्रीज मधील पाणी झक  मारले. कधी माठातील पाणी चाखले आहे का ?

४) गावाला TV  विकत घेतला  नाहीये. तशी गरजही भासत  नाही. घरीसुद्धा मी TV फारसा बघत नाही. सांस्कृतिक केंद्रात TV आहे . कधी तरी शेजाऱ्याकडे TV वर NEWS highlights ५ मिनिटे बघतो.

५) गावाला mobile वरून call करत नाही. urgent वाटला तरच incoming call  घेतो.  नाहीतर SMS चाच वापर करतो.

६) Internet, फेसबुक, chat सर्व बंद. (शेजाऱ्याचा आग्रह असतो, पण मी त्याची विंनती मान्य करत नाही. ) mobile  वर internet connection लागत नाही. त्यामुळे तो हि प्रश्न नाही.  ह्या वेळेला mobile tower कार्यरत नव्हता त्यामुळे mobile चा फक्त गाणी ऐकण्यासाठी उपयोग झाला.

७) ATM कार्ड वापरायची सोय आहे पण ATM कार्ड कधीच वापरत नाही.

८) शक्यतो पैशाचे व्यवहार करायला बँकेत जात नाही. काही दिवसांसाठी लागणारे पुरेसे पैसे घेवून जातो.

९) विहिरीतील गार पाण्याने आंघोळ करण्याची मजा केवळ अवर्णनीय. अर्थात मी जवळ जवळ १२ महिनेच गार पाण्यानेच स्नान करतो. 🙂 गार  पाण्याने आंघोळ करणे  आरोग्यासाठी  चांगले असते. 🙂

मित्रानो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग आम्ही गावाला जाऊन काय करतो ? बरोबर ना ? आम्ही गावाला शांतपणे पुस्तके वाचतो. एकीकडे कॅसेटप्लेयर वर निवडक गाण्यांच्या (टेप करून घेतलेल्या) टेप ऐकतो. २-३ तास समुद्र किनाऱ्यावर भटकंती करतो. निसर्गाचे फोटो काढतो. चर्चा करतो. लिखाण करतो. ३-४ दिवस कसे जातात कळतही नाहीत.

ह्या सर्व वस्तू – gadgets नाकारून, जगणे अधिक समृद्ध झाल्यासारखे वाटते. बालपणाशी नाळ जुळलेली राहते. जेव्हा गरजा संपतात, गुलामी संपते तेव्हा मन सुखावते. आपला  मनावरील ताबा परत एकदा सिद्ध होतो आणि त्याचा फायदा हा वस्तूच्या वापरापेक्षा कितीतरी अधिक असतो. ज्या भारतीयांकडे ह्या सुविधा नाहीत, त्यांच्याबद्दल सहवेदना वाटते. आपल्या आयुष्यातील समस्या म्हणजे काहीच नाहीत, हि शिकवण मनाला मिळते. जे मिळाले आहे त्यावर प्रेम बसते – वाढते. हे खूप गरजेचे आहे कारण आपल्याला जे हवे ते सर्व मिळतेच असे नाही. (अर्थात काही व्यक्ती चांदीचा चमचा तोंडात घेवून जन्माला येतात, असे ऐकले आहे.) :

मित्रानो, बघा प्रयत्न करून, माझ्यासारखा उपवास करून. खूप मजा येते.

सुधीर वैद्य

२१-०९-२०१४
Advertisements

0 Responses to “३५४) आधुनिक जीवन शैलीचा उपवास:”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

October 2014
M T W T F S S
« Jul   Nov »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: