३४९) विमा कंपनी कडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी काही सूचना

328) P1100040
३४९) विमा कंपनी कडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी काही सूचना

संगमनेर येथे नुकताच वादळी पाऊस पडला व अनेकांचे नुकसान झाले. खूप वाईट वाटले. निसर्गापुढे माणूस हतबल आहे. माणूस निसर्गाची हानी करतो आणि मग निसर्ग त्याचा सूड घेतो, असे म्हटले तर वावगे होणार नाही. असो. दुर्घटना घडली तरी जग रहाटी  सुरूच राहते. नव्या जिद्दीने वाटचाल करण्यातच आपले हित असते. परिस्थिती बदलण्याची आशा (Hopes )आपल्याला स्फूर्ती देते.

ज्या दुकानदारांचे – व्यावसाईक लोकांचे नुकसान झाले आहे व ज्यांनी विमा काढला आहे (General Insurance ) त्यांच्यासाठी नुकसान भरपाई मिळविण्यासाठी काही सूचना करीत आहे.

१)  आपण विमा कंपनीला नुकसानी बद्दल कळविले असेलच. नसेल तर ताबडतोब पत्र रवाना करा (शक्यतो hand delivery).  पोच पावती घेण्यास विसरू नका. पत्रात पत्ता, कश्यामुळे नुकसान झाले, policy चा नंबर आणि policy year, अंदाजे नुकसान नमूद करा. तसेच Insurance survey करण्यासाठी विनंती करा.

२) Insurance Policy ची xerox तयार ठेवा.

३) नुकसानीच्या घटने बद्दल थोडक्यात माहिती लिहा. पाऊस  कधी सुरु झाला, किती पडला, मालसाठा वाचविण्यासाठी आपण  काय प्रयत्न केले, पावसाचे पाणी कधी ओसरले वगैरे . पेपर मधील कात्रणे व फोटोच्या xerox तयार ठेवा.

४) नुकसानीचा तपशील तयार करा. मालाचे वर्णन, Quantity , Rate , Cost value.

५) मालसाठ्यावर बँके कडून कर्ज (cash credit ) घेतले असेल, तर submit केलेल्या माल साठ्याचा गेल्या ३ महिन्यांच्या xerox तयार ठेवणे.

६) चांगला माल साठा  आणि नुकसान झालेला माल साठा  वेगळा करावा -वेगळा ठेवावा. मालाचे फोटो काढावे.

७) पाणी साठले असता आपण  काढलेल्या फोटोच्या प्रती तयार ठेवाव्या.

८) पाणी उतरल्यानंतर दुकानाचे आतील भागाचे – बाहेरील भागाचे फोटो काढावे, जेणे करून पाणी किती उंची पर्यंत होते ह्याचा अंदाज येईल.

८) Furniture – दुकानाचे दार  – shutter चे नुकसान झाले असल्यास त्याचा तपशील तयार करावा. ह्या गोष्टी दुरुस्त होतील का ह्याचा अंदाज घ्यावा.  Repair च्या खर्चाचे estimate मागवावे.

८) नुकसान झालेला  माल कमी पैशात विकता  येईल का हे ठरवावे. जो खराब माल Insurance Surveyor येण्यापूर्वी टाकून दिला असेल त्याचा तपशील तयार  करावा व माल टाकून दिला हे confirm करणाऱ्या दोन साक्षीदारांच्या सह्या घेणे.

९) खराब झालेले खाद्य पदार्थ विकू नये – गरीब लोकांना फुकट देऊ नये. भविष्यातील नवीन प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून हे पदार्थ टाकून देणे गरजेचे आहे.

१०) गेल्या ३ वर्षाचे Income Tax Return – नफा – तोटा पत्रक , Balance Sheet च्या xerox copy  तयार ठेवाव्या.

११) नफा तोटा पत्रक (Provisional ) ०१-०४-२०१४ ते नुकसानीच्या दिवसा  पर्यंत विमा कंपनी ला द्यावे लागेल. त्यामुळे आपल्या Accountant ला सांगून Books of  Accounts update करण्यास सांगावे.

१२) Insurance Surveyor पाहणी करून आपला अहवाल कंपनीला देईल. आपल्या कडून वर नमूद केलेली कागदपत्रे – xerox copy मागेल. हे कागदपत्रे त्याला दिल्याची पोच पावती घ्यावी.

१३) नुकसान भरपाई साधारणपणे Insurance Surveyor चा अहवाल आल्या नंतर एक महिन्यात मिळते. Insurance Surveyor व कंपनी बरोबर संपर्कात राहा.

१४) आपल्या दुकानातील प्रत्यक्ष मालसाठा आणि विमा policy मध्ये नमूद केलेला मालसाठा ह्यात जास्त तफावत असल्यास, नुकसान भरपाई  मिळण्यास अडचण येऊ शकते.

सुधीर वैद्य
२७-०४-२०१४

अनेक वर्षे Insurance Surveyor म्हणून मी कार्यरत होतो. तो अनुभव मी share केला आहे.

Advertisements

0 Responses to “३४९) विमा कंपनी कडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी काही सूचना”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

October 2014
M T W T F S S
« Jul   Nov »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: