३३६) मोर आणि More …… एक चिंतन

DSCN3461
३३६) मोर आणि More …… एक चिंतन

ह्या चिंतन लेखाचे शीर्षक वाचून आश्चर्य वाटले का? हे नाव सुचण्याचे कारण म्हणजे शनिवारी (१९-०७-२०१४) माझी बायको मुलीबरोबर मोराची चिंचोली  येथे वर्षासहलीसाठी गेली. त्यामुळे मोराचे फोटो मिळणार होतेच. ह्या गावात भरपूर मोर आहेत . गावकऱ्यांनी त्यांचे संवर्धन केले आहे. गावात मोरांना कोणीही मारत नाही.

माझ्या गावाला सुद्धा एका ग्रामस्थाने मोर पाळला होता. सकाळी तो मोर रानात जात असे व संध्याकाळी घरी परतत असे. त्यामुळे ह्या मोराला बघण्यासाठी मी फिरण्याच्या वेळा adjust करत असे. त्या मोराचे काही फोटो शनिवारी (१९-०७-२०१४) मोर आणि More …एक चिंतन ह्या पोस्ट बरोबर अपलोड केले होते. गेल्या वर्षी तो मोर गायब झाला. त्याला कोणीतरी मारले असे कानावर आले. 😦

शहरी लोक प्राणी संग्रहालयातच मोर बघतात.  लहान मुलांनी तर मोर फोटोत किंवा संगणकावर बघितला असेल. मुलांचे  More हे ब्रीद वाक्य असते पण त्याचा मोर या पक्षाशी काही संबंध नाही.

दोन्ही शब्दांचे उच्चार सारखे, पण त्यातील एक मराठी भाषेतील आणि एक इंग्लिश भाषेतील. काय गंमत आहे नाही?

मोर किंवा मोराचा फोटो जरी बघितला असता  खूप गाजलेल्या मराठी गाण्यांची आठवण येते. (नाच रे मोरा …। ) दुसरे एक गाणे आहे.  (बाई  बाई  मन मोराचा कसा पिसारा फुलला)  मोर हे कार्तिकेयाचे (शंकराचा सुपुत्र) वाहन होते, हे फार थोड्या लहान मुलांना माहिती असेल. तसेच सरस्वती (बुद्धीची देवी) बरोबर नेहमी मोर असतो. हे शिक्षण घेणाऱ्या मुलांना माहित असेल का? मोरेश्वर गणपती मात्र नक्की माहित असेल. बायकांना पैठणीवरील मोर आठवतो. 🙂 असो.

आज सर्वसाधारणपणे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट More हवी असते. ते मिळण्यासाठी आपण लायक आहोत का ह्याचा विचार मनात येतोच असे नाही.

आपल्याला काय काय More हवे असते ह्याची जंत्री करण्याचा प्रयत्न करतो, पण मला कल्पना आहे कि हि केवळ नमुना जंत्री असेल. कारण व्यक्ती तेव्हड्या प्रकृती असे म्हणतात. 🙂

More (जास्त) सुख, पैसा , शिक्षण, सुंदर बायको, मोठे घर, सोई, मौज – मजा, सुटी, भेटवस्तू, प्रवास. हि जंत्री कितीही वाढू शकते. ………

ह्या More (जास्त) च्या मागे एकदा माणसाचा पाठलाग सुरु झाला कि मग त्याचे भान हरपते. More  म्हणजे किती More हे त्याला कळतच नाही, कुठे थांबावे हे कळत नाही आणि मग मिळालेल्याचा उपभोग घेण्याचे भान – वेळ त्याच्याकडे शिल्लक राहत नाही. तो विसरून जातो कि वयाच्या आधी आणि लायकी पेक्षा जास्त काही मिळत नाही. समजा  मिळाले तरी ते टिकवता येत नाही. अर्थात ह्या नियमाला काही अपवाद असू शकतात याची मला पूर्ण कल्पना आहे.

More चा विचार आणि पाठलाग करताना, देशात – समाजात Less काय आहे ह्याचा विचार मनाला शिवला तर आपले पाय जमिनीवर राहतील.  More च्या मागे पळताना ज्यांच्या कडे Less आहे असे सुद्धा म्हणू न शकणारे लोक ह्या समाजात आहेत ह्याचे भान सुटता कामा नये. (Jobless , Homeless , Money less)

आपल्या ग्लासात निदान अर्धे पाणी आहे (बाकीची हवा) तर अनेक लोकांकडे ग्लास आहे पण पाणी  नाही अशी अवस्था आहे. समाजातील बहुसंख्य वंचित वर्गाकडे तर ग्लास हि नाही आणि ओंजळीने पिण्यास पाणीही नाही. 😦

Poverty in the midst of Plenty अशी आपल्या भारताची अवस्था आहे. प्रत्येक सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे, पण स्वातंत्र्य मिळून एव्हड्या वर्षांनी सुद्धा अशी अवस्था बघून तरी ह्या More  चा हव्यास कमी केला पाहिजे.

आपल्या मनात जे MORE आहे ते मिळेल याची खात्री नसते. अर्थात त्यासाठी प्रयत्न करत राहणे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्याला जे LESS  मिळाले आहे, त्यावर प्रेम करायला शिका. असे झाले तर मोरच sorry देव पावला असे म्हणावे लागेल. 🙂

मित्रानो, विषय फारच गंभीर झाला नाही. खरेतर लेखाचे शीर्षक बघून तुम्हाला अंदाज आला असेलच.

तुम्हाला मोरांचे फोटो बघायचे असतील ना? फोटो बघून झाल्यावर लेख परत नजरेखालून घाला म्हणजे माझे म्हणणे तुम्हाला नक्की पटेल.

कवी मित्रांना खास विनंती:
एखाद्या कवितेद्वारे  माझे विचार जास्त चांगल्या रीतीने लोकांपर्यंत पोचतील. त्यामुळे शक्य असल्यास कविता अपलोड करावी हि नम्र विनंती.

सुधीर वैद्य
२१-०७-२०१४
Advertisements

0 Responses to “३३६) मोर आणि More …… एक चिंतन”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

July 2014
M T W T F S S
« Jun   Oct »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: