३३४) गुरुपोर्णिमा १२-०७-२०१४

३३४) गुरुपोर्णिमा १२-०७-२०१४

आज गुरु पोर्णिमा
. आपले  आयुष्य घडवण्यात गुरूंचा  वाटा मोठा असतो. गुरूंचे  हे ऋण कधीही न फिटणारे  आहे.

आज सकाळीच ध्यान करून बसलो आणि लहानपणापासूनच्या सर्व गुरूंचे स्मरण केले. त्यांना वंदन केले. प्रथम गुरु म्हणून आई -वडिलांचे स्मरण केले. (आज दोघेही हयात नाहीत ह्याचे क्षणभर वाईट वाटले) त्यानंतर शाळेतील शिक्षक, कॉलेजमधील प्रोफेसर, नोकरी-व्यवसायातील मार्गदर्शक, ज्योतिषशास्त्र शिकवणारे माझे मित्र, पर्यायी वैद्यकशास्त्र शिकवणारे डॉक्टर, आणि इतर बरेच जण ज्यांच्याकडून मी शिकलो, त्या सर्वांचे मी स्मरण केले. आशीर्वाद मागितले.

हे स्मरण अगदी फेसबुक मित्रांपर्यंत येऊन संपले. हो, तुम्ही वाचले ते बरोबरच आहे. आज मी कित्येक गोष्टी फेसबुकच्या मित्रांकडून शिकलो. माझ्या लेखनशैलीला चांगले वळण लागले. काही मित्रांच्या संपर्कामुळे मी कविताही करायला लागलो. माझ्या फोटोग्राफीतहि सुधारणा झाली.

आयुष्यात आपला जीवन प्रवास अनेक वळणावरून होतो. (बालपण, शिक्षण, उच्चशिक्षण, नोकरी-व्यवसाय, निवृत्ती, म्हातारपण, वैराग्य वगैरे ) ह्या साऱ्या टप्प्यातील शिक्षणाचा काळ मी आयुष्यभर जोपासला. आपले जरी Academic शिक्षण झाले असले तरी ह्या जगात शिकण्यासारखे खूप काही आहे. जीवन प्रवासात शिक्षणाचा काळ जोपासला, तर हा प्रवास खूप आनंदी – मजेशीर होतो. आपल्या मनोभूमिकेत चांगला बदल होतो. मन संवेदनशील बनते. त्यामुळे मी अति उच्च शिक्षण पूर्ण केल्यावर सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकत राहिलो – निरीक्षण करत गेलो. ह्या शिक्षणाचा नोकरी – व्यवसायात फायदाच झाला. आयुष्यभर मी विद्यार्थी म्हणून राहणे पसंद केले. त्याचवेळी माझ्याकडील ज्ञान, माहिती आयुष्यभर share केली.

वडिलांचा सहवास कळायला लागल्यापासून जेमतेम दहा वर्षे मिळाला. ह्या सहवासात चांगला माणूस म्हणून जे गुण लागतात ते मला वडिलांकडून त्यांचे वागणे बघून आणि त्यांच्याशी बोलून शिकता आले. 

माझ्या आईकडून सुद्धा मला शिकायला मिळाले. वडिलांच्या आजारपणामुळे आईची उमेदीची वर्षे दडपणाखाली गेली. तिच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. अकारण ती माणसांच्यात अति गुंतवणूक करत गेली. परिस्थितीमुळे स्पष्टवक्तेपणा तिला जोपासता आला नाही. ह्यातून अर्थबोध घेऊन मी कधीही कोणत्याही गोष्टीचे दडपण घेतले नाही. स्पष्टवक्तेपणा जोपासला. माणसांच्यात अति गुंतवणूक केली नाही त्यामुळे अपेक्षा भंगाचे मला दु:ख टाळता आले.

मी अनेक गोष्टी प्राण्यांच्याकडूनही शिकलो. प्राणीसुद्धा आपल्याला खूप काही शिकवतात. माझे लेख वाचा म्हणजे माझ्या बोलण्याचा उलगडा होईल.
लिंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/11-Camel.pdf
लिंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/12-Tortoise.pdf

काही वर्षापूर्वी मी एक महत्वाचा निर्णय घेणार होतो. मला माझ्या सोनीची (पोमेरिअन कुत्री) आठवण आली. तिची एक लकब माझ्या स्मरणात कायमची कोरली गेली होती. सोनी ठराविक वेळानंतर डोके हलवीत असे. मी तिला प्रेमाने म्हणायचो कि सोनी तू काय करतेस ? मनातील विचार झटकते आहेस का ? निर्णय जवळ जवळ मनाशी नक्की केल्यानंतर मला सोनीची आठवण आली. मी खरेच डोके झटकले. माहित नाही पण त्यानंतर विचारपूर्वक ठरवलेला निर्णय मी घेतला नाही. मी हा निर्णय न घेतल्यामुळे माझ्या पुढील काळातील समस्या टळल्या. Thank you Soni. (सोनी आज हयात नाही. पण आमच्या स्मृतीत ती आजही जिवंत आहे)

मी निर्जीववस्तू कडून सुद्धा शिकायचा प्रयत्न करतो. निसर्ग, प्राणी, झाडे हे तर आपल्याला नेहमीच शिकवत असतात. विश्वास बसत नाही. मग वेळ काढून निसर्ग हा माझा जवळचा मित्र आहे. खालील लेख वाचा.
Link:http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/04-FrogChick
&BambooTree.pdf

संगणक keyboard सुद्धा आपल्याला खूप काही शिकवतो. हे वाचून तुम्ही नक्की चक्रावला असाल. थोडा वेळ काढा आणि माझा लेख वाचा म्हणजे तुमची खात्री पटेल. लिंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/05-Computereducation.pdf
काही key board shortcuts मी माझ्या छोट्या बालमित्रांकडून शिकलो.

आज प्रकर्षाने मला ज्योतिष शास्त्र शिकवणाऱ्या दोन मित्रांची (प्रभाकर आगाशे आणि सुरेश पालकर) ह्यांची आठवण येत आहे. आज दोघेही हयात नाही. त्यांची उणीव मला नेहमी जाणवेल.

पर्यायी वैद्यक शास्त्र शिकवणाऱ्या डॉक्टर धीरेन आणि डॉक्टर शशिन यांचे कितीही आभार मानले तरी कमी आहेत. कुटुंबासाठी आणि सहनिवासातील जेष्ठ सभासद यांच्यासाठी गेली १५ वर्षे ह्या शिक्षणाचा मी उपयोग करत आहे.

माझा लेख My Teachers   वाचण्यासाठी ह्या लिंक वर click करा. http://bit.ly/jczOVL  ह्या लेखा शिवाय माझे  आत्मचरित्र पूर्णच होऊ शकले नसते.

काय मित्रानो, तुम्ही गुरूंचे स्मरण केले की नाही?  मनाची शक्ती जबरदस्त आहे.  फार वेळ लागणार नाही, काही मिनिटात तुम्ही आपल्या गुरुना भेटून येऊ शकता.

जगायला शिकवणाऱ्‍या गुरुंना – निसर्गाला – प्राणी मात्रांना साष्टांग दंडवत…!!!

आजचा दिवस तुम्हा सर्वाना आनंदाचा आणि सुखाचा जावो.

सुधीर वैद्य
१२ -०७ -२०१४

Advertisements

0 Responses to “३३४) गुरुपोर्णिमा १२-०७-२०१४”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

July 2014
M T W T F S S
« Jun   Oct »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: