३३३) पाऊस – डाग – मनाचे पेस्ट कंट्रोल

333) photo2999_001_2
333) Pest Control_2
३३३) पाऊस – डाग – मनाचे पेस्ट कंट्रोल:

अखेर तो आला. रमला. उशिरा येउन तोंडचे पाणी पळविले होते. आता रंगाचा बेरंग करून परत तोंडचे पाणी पळवू नको म्हणजे झाले.

दोन दिवस चांगला पाऊस पडतो आहे. रस्त्यात पाण्याची तळी  झाली आहेत. त्यामुळे हि तळी आणि रस्त्यावरून पाणी उडवत जाणारी वाहने ह्यांना चुकवून चालण्यासाठी  तारेवरची कसरत करावी लागत आहे. चिखल अंगार उडू नये व कपड्यांवर चिखलाचे डाग पडून नयेत म्हणून हि कसरत, नाहीतर ‘ डाग तो अच्छे होते है. ‘ 🙂 🙂

काल  रात्रभर पाऊस पडत होता. सकाळी थोडा कमी  झाला. नेहमीप्रमाणे मी आणि बायको फिरायला बाहेर पडलो . रस्त्यावर पाण्याची छोटी छोटी तळी  झाली होती. आम्ही हि तळी  चुकवून चाललो  होतो. तेव्हड्यात एक कार आमच्या बाजूने रस्त्यावरील पाण्यातून सुसाट गेली, आमच्या कपड्यांवर पाणी उडवून. driver ला कार रस्त्याच्या मधून नेता आली असती, पण त्याने रस्त्याच्या कडेला साठलेल्या पाण्यातून नेली व आमच्या कपड्यांवर पाणी उडाले.

बायको म्हणाली कि पहिल्या पावसानेच कामाला लावले. मी गंमतीने म्हणालो कि ठीक आहे , कपड्यावरील डाग काढता येतील. पण आप्तस्वकीयांनी मनावर पाडलेल्या डागांचे काय ? काळानुसार पुसट  झालेत पण नाहीसे मात्र नाही झालेत आजपर्यंत.

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी ‘ डाग तो अच्छे होते है ‘  असे सांगणारी साबणाची पावडर आहे, पण मनावरील डाग काढण्यासाठी अजून साबणाची पावडर उपलब्ध नाहीये. त्यासाठी मनाचे पेस्ट कंट्रोलच करावे लागेल. 🙂  मनाचे पेस्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे डाग थोडे पुसट  झाले आहेत.

मित्रानो, तुम्हाला करायचे आहे का  मनाचे पेस्ट कंट्रोल ? तुमच्या माहितीसाठी लिंक देत आहे.

लिंक:https://spandane.wordpress.com/2013/05/30/%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%AF-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2/#more-1371

थोडक्यात म्हणजे स्वत:ची काळजी घ्या.
सुधीर वैद्य
०९-०७-२०१४

Advertisements

0 Responses to “३३३) पाऊस – डाग – मनाचे पेस्ट कंट्रोल”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

July 2014
M T W T F S S
« Jun   Oct »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: