१०५) लग्नानंतर / लेखिका मेधा राजहंस

Lagnanantar - Photo3060

१०५) लग्नानंतर / लेखिका मेधा राजहंस / उन्मेष प्रकाशन / रुपये १२० /
पृष्ठे १५८ / प्रथमावृत्ती ०७-१२-२००२ / कथा

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. विनोदाने असे म्हटले जाते कि लग्न हा एक असा लाडू आहे कि जो खातो त्यालाही पश्चात्ताप होतो आणि ज्याला खायला मिळत नाही तोही पस्तावतो. लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधतो, पण त्या गाठी आपल्याला सोडवाव्या लागतातहि वस्तुस्थिती आहे. असो.

ह्या पुस्तकातील  कथा दै. प्रभात मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे ह्या कथा आकाराने लहान आहेत पण आशयगर्भ आहेत. ह्या पुस्तकात ३२ कथा आहेत. पुस्तकाला विजया राजाध्यक्ष यांनी प्रस्तावना दिली आहे.

आपल्याला अनुभव येतो – आपण बघतो कि लग्ने होतात, मुलेबाळे होतात, रूढ अर्थाने संसार सुखाचा होतो. परंतु त्या जोडप्याचे सहजीवन सुखकारक असते का ? हा प्रश्न अनेक वेळा अनुत्तरित राहतो. अश्या सहजीवनाचा आढावा घेण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे. एका अर्थाने लेखिकेने हा कथारूपी आरसा प्रत्येका समोर धरला आहे. पुस्तक वाचा आणि स्वत:च ह्या आरश्यात बघा आपले प्रतिबिंब असा हा प्रकार आहे.

पुस्तकातील कथांचा आवाका खूप मोठा आहे, त्यामुळे पुस्तकातील समस्या प्रातिनिधिक आहेत. पुस्तक्त लग्नठरल्यापासून ते लग्नाला अनेक वर्षे पूर्ण होण्यापर्यंतच्या सहजीवनाचा आढावा घेते. प्रेम विवाह, ठरवून केले लग्न या संदर्भातील सहजीवनातील समस्या दाखविल्या आहेत. ह्या समस्या गरीब- श्रीमंत असाही भेद करत नाहीत.

मोजक्या शब्दात लेखिका सहजीवनावर भाष्य करते. आज अश्या पुस्तकांची गरज आहे. प्रत्येक विवाहित जोडप्याने आणि लग्नाळू वधू  – वरांनी  हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे.

लग्नाचा – सहजीवनाचा प्रवास खालील मार्गावरून होतो.
There are three stages of Marriage namely

MAD for each other /
MADE for each other /
MAD because of each other.

Friends may read my Article on http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/Three_Stages_of_Marriage.pdf

हा प्रवास ह्या कथात नक्की डोकावतो. ह्या सर्व कथात टोकाची भूमिका घेतली जात नाही. हे सध्याच्या काळात थोडे विसंगत वाटते. हल्ली घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. ह्याचे कारण लग्न म्हणजे एक तडजोड आहे ह्याचा विचार केला जात नाही. व्यक्ती स्वातंत्र्य लहानपणापासून मिळालेले असते त्याचा त्याग करणे सोपे नसते. खरेतर दोघांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झालेला असतो. पण बरेच वेळा स्त्रीला जास्त तडजोड करावी लागते हे मात्र सत्य आहे.

हे सहजीवन कसे सुखकारक करता येईल ह्याचे मार्गदर्शन हे पुस्तक करत नाही. माझ्या मते कोणत्याही कलाकृतीत (लेख, कादंबरी, कथा, नाटक, सिनेमा) समस्या आणि परिस्थितीवर भाष्य असते आपण हि परिस्थिती टाळण्यासाठी काय केले पाहिजे ह्याचे मार्गदर्शन करण्याचे टाळले जाते. अर्थात हे माझे व्यैयक्तिक मत आहे.

एक हौशी समुपदेशक म्हणून ‘लग्न – सहजीवन’ हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्या संकेत स्थळावर आणि ब्लॉग वर ह्या विषयावर भरपूर लिखाण उपलब्ध आहे. प्रत्येक लग्नाळू वधू  – वरांनी किंवा विवाहित जोडप्याने एकमेकांशी Professionally कसे वागावे ह्यासाठी अनेक टिप्स दिल्या आहेत. त्याच वेळी सासू सासऱ्यांनी सुद्धा कसे वागावे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे कि असे वागण्याने नाते संबंध फुलायला वेळ मिळेल. असे नाते संबंध फुलले तर चांगलेच आहे पण नाहीतर हेच सहजीवेन नक्की सुसह्य  होऊ शकेल.
————————————————————————————————
लग्नातील – सहजीवनातील समस्या टाळायच्या असतील तर पुढील विवेचन वाचायला विसरू  नका.
एका मर्यादे पर्यंत पुरुषांना बायकांची भावनिक गुंतवणूक आवडते. पण त्याचा अतिरेक होता कामा नये. कुठे -कधी – कसे थांबावे (व्यापक अर्थ अपेक्षित) हे जर स्त्रीला कळले, तर वैवाहिक जीवनात प्रश्नच निर्माण होणार नाहीत.

बायकांनी सुद्धा नोकरी करत नसल्यास, स्वत:चे विश्व निर्माण केले पाहिजे. छंद निर्माण केले पाहिजेत. दोघांनी एकमेकाना space देणे आवश्यक आहे.

नवरा-बायकोचे प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते. खूप प्रेम – खूप प्रेम म्हणून ओंजळ बंद करायला गेलात, तर space न मिळाल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रश्न निर्माण होतात.

दुसऱ्याच्या चुका सांगताना, आपणही चुका करतो का? हे तपासले तर बरे होईल. आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे दाखवितो तेव्हा तीन बोटे आपणाकडे असतात, ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

आपण जेव्हडे दुसऱ्यावर अवलंबून राहतो (प्रेमाचा बुरखा पांघरून) तेव्हडे आपण स्वत:चे नुकसान करत असतो.
खऱ्या प्रेमात त्याग करायची तयारी असावी लागते. हिंमती शिवाय प्रेम सफल होत नाही. दुसऱ्याला सांभाळून घेण्यासाठी स्वत:चा इगो आकारात असणे गरजेचे आहे.

जेव्हा नम्रता हि तुमची कमजोरी आहे, असा चुकीचा पवित्रा समोरच्या कडून घेतला जातो आणि तुम्ही गप्प बसता, तेव्हा नम्रता हा दोष ठरतो असे मला वाटते.
चांगुलपणा बरोबर unpredictable पणा  जपला, तर गोष्टी थोड्या सोप्या होतात .

संसाराच्या चक्रात अडकले तरी संसारात गुंतता कामा नये. कारण शेवटी संसार हा असार आहे.
आपले आयुष्य म्हणजे असंख्य घटनांची साखळी असते. काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण त्याची वेळ माहित नसते, काही घटनांची वेळ माहित असते. प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ‘ प्रतिक्रिया ‘ (Reaction ) देत असतो . त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते.
भांडणामुळे नवरा – बायकोचे नाते ताजे राहते. भांडणाचे सुद्धा एक शास्त्र आहे.
ज्या वेळी महिलांना बरोबरीचा दर्जा खऱ्या अर्थाने प्राप्त होईल, त्या वेळी जागतिक महिला दिन साजरा करण्याची गरज भासणार नाही.
एखाद्या गोष्टीबाबत सगळ अगदी जमून आलंय असं कधी होतंच नाही…..काहीतरी राहूनच जात, नकळत……!! कदाचित ह्यामुळेच आपल्या जगण्याला संजीवनी मिळत असेल.
नवरा – बायकोच्या नात्यात इतर लोकांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो. तेव्हा लग्नापूर्वी एकमेकांच्या मुलभुत अपेक्षांची चर्चा करा. इतरांच्या कोणत्या अपेक्षा आहेत याचाही विचार करा, पण त्या अपेक्षांना अवाजवी महत्व देऊ नका. अश्या अपेक्षांच्या बाबतीतील कृती योजना तयार करा. कुटुंबियांना सुद्धा तुम्ही व तुमची पत्नी कोणत्या अपेक्षा पूर्ण  करू शकणार नाही किवा कशा रीतीने पूर्ण कराल याची कल्पना द्या.

आयुष्यात मानसिक शांती हवी असेल तर नाही ऐकायची आणि नाही म्हणण्याची सवय केली पाहिजे .

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, मी काय करू शकतो, मी काय करणार, किती – कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की हवे.

बरेच वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.

सुखी वैवाहिक जीवनासाठी त्याग करायची तयारी आहे का ? असल्यास किती ह्याची सीमा रेषा आखा आणि त्याग करण्याची सवय अंगी बाणवा. त्यानंतरच लग्नाचा विचार करा.

प्रत्येक प्रेम विवाह यशस्वी होत नाही कारण निर्णय बरेच वेळा फक्त चांगल्या बाजूचा विचार करून, बेनिफिट ऑफ doubt देऊन घेतलेला असतो. प्रेम जरी आंधळे असले तरी लग्नाचा निर्णय घेताना बुद्धी आंधळी होणार नाही ह्याची काळजी जरूर घ्या.

जोडीदाराला गुण आणि दोषांसकट स्वीकारले तरच वैवाहिक आयुष्य सुखाचे जाते. अर्थात काही दोष स्वीकारण्याच्या पलीकडचे असतात हे मान्य करावेच लागेल.

स्त्री हि खरेतर पुरुषा पेक्षा जास्त काटक  असते. स्त्री हि व्यवस्थापन गुरु असते. पण हि वस्तुस्थिती पुरुष मान्य करत नाहीत,  हे दुर्भाग्य आहे.

खरेतर नवरा -बायकोनी  माप ओलांडून गृह प्रवेश केला पाहिजे, कारण कुटुंबाचे सुख , शांती आणि मर्यादा सांभाळण्याची  जबाबदारी दोघांची आहे.

तुम्ही स्वत:ला सामान्य स्त्री का समजता ? मी साधी गृहिणी आहे असे तुम्ही का म्हणता? खरेतर साधी गृहिणी होणे हे खूप कठीण असते. कोणतीही स्त्री हि आद्य  management गुरु असते.

मित्रानो हे चाकोरी बाहेरील पुस्तक नक्की वाचा आणि आपल्या जोडीदाराला वाचायाल द्या. मग हळूच पुस्तकरूपी आरश्यात बघा आणि काय तो अर्थबोध घ्या.

सुधीर वैद्य
१३-०७-२०१४

Advertisements

0 Responses to “१०५) लग्नानंतर / लेखिका मेधा राजहंस”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

July 2014
M T W T F S S
« Jun   Oct »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: