१०२) प्राणीसृष्टीच्या अंतरंगात / लेखक मिलिंद आमडेकर

१०२) प्राणीसृष्टीच्या अंतरंगात / लेखक मिलिंद आमडेकर / उन्मेष प्रकाशन / पहिली आवृत्ती २५-१२-२०१० / रुपये १८० / पृष्ठे १९८ /

दोन शब्द लेखकाबद्दल

लेखक संरक्षण उत्पादन कारखान्यात कार्यरत आहेत. त्यांचे अंबरनाथ येथे वास्तव्य आहे. भटकंती हा त्यांचा ध्यास आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक राज्यात त्यांनी भटकंती केली आहे. सह्याद्रीतील १७०किल्ले व भारतातील ७५ किल्ले त्यांनी पाहिले आहेत. देशातील ४० अभयारण्याला त्यांनी भेटी दिल्या आहेत . ९००हून अधिक लेख आणि ९ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्याकडे ५००० पुस्तकांचा संग्रह आहे. हिमालयात २० वेळा पदभ्रमण केले आहे. त्यांना फोटो ग्राफिचा छंद आहे.

लेखकाने हे पुस्तक निसर्गाच्या अंतरंगात डोकावण्याची वाट दाखवणाऱ्या BNHS (Bombay Natural History Society ) ला अर्पण केले आहे.

पुस्तकाबद्दल

हे एक चाकोरी बाहेरचे पुस्तक आहे. आपल्या पैकी बऱ्याच जणांना प्रवासाची आवड असते. निसर्गाच्या सान्निध्यात सुद्धा आपण relaxation साठी जातो. जमेल तेव्हडी भटकंती करतो, निसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचे फोटो काढतो, LTA Claim करतो आणि आपला ह्या वर्षीचा प्रवास संपतो. परत एकदा आपण आपल्या दिनचर्येत मग्न होतो. निसर्गाबद्दल – तेथील मनुष्य जीवन – प्राणी जीवन ह्या संदर्भात फारसे प्रश्न – कुतूहल आपल्याला मनात रुंजी घालत नाही.

ह्या सीमारेषेपासून ह्या पुस्तकाचा प्रवास सुरु होतो. आपल्याला प्राण्यांबद्दल प्रश्न पडत नाहीत. तसेतर माणसां बद्दलचे प्रश्नही काही निमित्ताने मनात येतात, एव्हडे आपण आत्ममग्न असतो.

लेखकाला असे प्रश्न पडले आणि त्याने त्याची उत्तरे शोधण्याचा अप्रतिम प्रयत्न, अनुभवाने आणि जगभरातील ह्या संदर्भातील केलेले संशोधन वाचून केला आहे . निसर्गातील – प्राण्यांची निरीक्षणे यांची त्याने ६१ प्रकरणात विभागणी केली आहे. प्रत्येक प्रकरण ३-४ पानांचे आहे. पण प्रत्येक प्रकरणात त्या विषयातील संशोधनाचे दाखले दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे ह्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी Referencer -Manual आहे .

मित्रानो , वेळ काढून हे पुस्तक नक्की वाचा. पुस्तकातील माहिती खूप मजेशीरआहे. पुस्तकाचे मुखपृष्ट आकर्षक आहे. असे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल उन्मेष प्रकाशनचे आभार.

सुधीर वैद्य

२०-०४-२०१४

Advertisements

0 Responses to “१०२) प्राणीसृष्टीच्या अंतरंगात / लेखक मिलिंद आमडेकर”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

June 2014
M T W T F S S
« Apr   Jul »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: