३२८) येरे येरे पावसा — चिंतन

328) P1100040
328) P1100037
३२८) येरे येरे पावसा — चिंतन

उन्हाळा संपला, पावसाचा महिना सुरु झाला.
पण पाऊसच नाही आला.
तसा एकदोनदा शिडकावा झाला.
पण सगळ्यांनाच कोड्यात टाकून  गेला.

शेतकऱ्याला कळेना की पेरणी करावी का नाही?
शहरवासियांना कळेना की पुढील वर्षापर्यंत पाणी मिळेल का –  पुरेल का ?
सरकारला कळेना की Package द्यावे लागेल की नाही?
मला कळेना की Tanker मध्ये जमिनीतून पाणी येईल की नाही?

हे पावसा मी तुझ्यावर रागावलो आहे.
जगात इतरत्र हजेरी लावलीस पण  माझ्या लाडक्या भारताला मात्र कोरडाच ठेवलास.

पाऊस म्हणजे तुझे पृथ्वीवरील प्रेम.
पण तू तर नटखट प्रियकरासारखा प्रेयसीला विव्हळ करू लागलास.
हे प्रेम सिद्ध करण्यासाठी तरी तू ये. …

शेतकऱ्याचा दुबार पेरणीचा खर्च आणि श्रम वाचविण्यासाठी तरी तू ये. …
पाणी अडवा – पाणी जिरवा ह्यासाठी बांधलेले बांध  – लहान धरणे ह्याचे काम बरोबर झाले आहे कि नाही ह्याची तपासणी करण्यासाठी तरी तू ये ……
पाऊस  सुरु न झाल्यामुळे प्रासंगिक आजार वाढले आहेत, मुला बाळांच्या शाळा बुडत आहेत, त्यांना बरे करण्यासाठी तरी तू ये.

धरणे, विहिरी भरण्यासाठी तरी तू ये …….
पाण्याच्या Tanker चे इंधन वाचविण्यासाठी तरी तू ये ……

भोलानाथ भोलानाथ पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे होऊन सुट्टी मिळेल काय?

खरेच असे पाणी साठल्यामुळे मुलांना पावसाळी सुटीचा आनंद देण्यासाठी तरी तू ये.
पाऊस पडताना गरमा  गरम भाजी – वडा  खाण्यातली आणि वाफाळलेला चहा पिण्यातली मजा अनुभवता  यावी म्हणून तरी तू ये.
माणसाने निसर्गावर भरपूर केला आहे अत्याचार.
त्याचाच बदला तू घेतो आहेस आमच्यावर.
पण हे पावसा, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली नाहीये.
सामान्य माणूस मात्र भरडला गेलाय तुझ्या ह्या बदल्यात.

परत एकदा लहानपणाचे गाणे म्हणतो.
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा.
(पैसा त्याकाळीच खोटा झाला होता. आतातर रुपया हि घसरला.
पावसा तुला डॉलर दिला असता, पण काय करणार परकीय गंगाजळी सुद्धा पुरेशी नाहीये.)

पावसा आता तूच काय ते ठरव. आता वेळ न  दवडता लगेच ये आणि मोठ्या अंत:कारणाने आम्हाला माफ कर.

नाहीतर आम्हाला शंकराला साकडे घालावे लागेल.
त्यापेक्षा मीच येतो तुझ्याकडे. सर्वांच्या वतीने साकडे घालायला.

येरे येरे पावसा ” ” ” ” ”

सुधीर  वैद्य

२४-०६-२०१४

Advertisements

0 Responses to “३२८) येरे येरे पावसा — चिंतन”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

June 2014
M T W T F S S
« Apr   Jul »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: