३२४) उठ बस

 

P1120649-1

 

३२४) उठ बस

सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. पाऊस पडत होता म्हणून ह्या वर्षी विकत घेतलेले पावसाळी बूट घातले. काल  थोडा वेळ नवीन बूट घालून बघितले होते. पण थोडे अंतर चालल्यानंतर लक्षात आले कि बूट कालच्यापेक्षा जास्त लागत आहेत . म्हणून मी वाटेतच थांबायचा  निर्णय घेतला. बायको नेहमी सारखी फिरून आली.

माझ्या बाजूला एक तरुण पाठीवर मोठी bag घेऊन बसला होता. बाजूलाच दोन जेष्ट नागरिक पाऊस  पाण्याच्या गप्पा मारत होते. मी का बसलो असेन ह्याचा सुद्धा विचार करत असावेत असे मला उगीच वाटले. काही वेळाने तो तरुण झटकन उठला. त्याची ऑफिस ची बस आली होती. सकाळच्या वेळी school बस दिसतातच. चटकन ‘ उठ बस’ हा शब्दाचा व्यापक अर्थ मनात उमटला.
हे शब्द आपण अनेक वेळा बोलताना वापरतो. ए बाळा लवकर उठ – शाळेची बस चुकेल. उशीर झाला तर शिक्षक उठा – बशा काढायला लावतील. मुलगा मोठा होतो. लहानपणासारखेच पाठीवर दफ्तर घेऊन कॉलेजला जातो मग मोठेपणी laptop आणि bag घेऊन ऑफिसला जातो. बॉस समोर उठा  बशा काढतो.
घराची गृहिणी संसारासाठी – नवऱ्या साठी – मुला-बाळांसाठी उठा-बशा काढीतच असते. कधी कर्तव्य म्हणून तर कधी प्रेमाने – कधी मजबुरीने. जो पुरुष लहानपणापासून वर नमूद केल्याप्रमाणे उठाबशा काढत असतो, त्याला मात्र घरातील गृहिणीच्या – आईच्या – बायकोच्या उठा-बशा कळतातच असे नाही. ज्या दिवशी उठा-बशा ह्या शब्दाचा खरा अर्थ पुरुष जातीला कळेल, तेव्हा महिला दिन साजरा करायची गरजच उरणार नाही.
विषय कोठून सुरु झाला आणि कुठे भरकटला. :)उठा  बशा सारखे काही शब्द आहेत त्यांचा अर्थ शब्द कोशात समजावता येईलच असे नाही. त्यासाठी निरीक्षण  हवे.

हा लेख वाचून   कुटुंबासाठी उठा  बशा काढण्याची प्रेरणा मिळाली, तर माझ्यालेखाचे सार्थक होईल असे मला वाटते. कोणालाही दुखविण्याचा माझा हेतू नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी.

सुधीर वैद्य

१६-०६-२०१४
Advertisements

0 Responses to “३२४) उठ बस”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

June 2014
M T W T F S S
« Apr   Jul »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: