३२१) मनातला आतला आवाज – चिंतन

321) Mind - 1
३२१) मनातला आतला आवाज – चिंतन

गेल्या काही दिवसात अश्या घटना घडल्या कि मला ह्या विषयवार परत एकदा चिंतन करावेसे वाटले.

आतला आवाज खरेच असतो का ?
आतला आवाज असलाच तर, सगळ्यांकडे  असतो का?

समजा  काही लोकांना आतला आवाज असला, तरी त्यापैकी प्रत्येकाला हा आतला आवाज ओळखता येतो का ?

आतला आवाज ओळखता आला, तरी त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची ताकद असते का ?

अशी ताकद नसेल, तर तो आवाज आयुष्यभर दडपला जातो का ? दडपता येतो का ? कि नकोत्या वेळी, नकोत्या माणसाकडे व्यक्त केला जातो?
असे करताना त्या माणसाचा दोष नसताना, त्याला त्रास होईल हा विचार का बरे मनात येत नाही?
त्या माणसाचे आयुष्य गढूळ करण्याचा तुम्हाला काय हक्क असतो?
आतला आवाज वेळेवर  योग्य माणसाकडे व्यक्त  न करून आपण समाजाचे काही नुकसान तर करत नाही ना?
लहानपणापासून आपण निर्णय घेतो. कालांतराने हि निर्णयक्षमता आपल्या शिक्षणाने, अनुभवाने वाढत असते. आपण प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्याचा बौद्धिक बाजूने विचार करतो, इतरांचा विचार करतो, भावनांचा विचार करतो. परंतु कसोटीच्या प्रसंगी जेव्हा निर्णय घेणे अवघड  जाते, तेव्हा आपण आपल्या आतल्या आवाजाचा कौल घेतो का?

मित्रानो, तुम्ही मनाची ताकद अनुभवली आहेत का? सशक्त मन नेहमी अनेक बाजूने विचार करते व अनेक वेळा बरोबर निर्णय देते. फक्त ह्या मनाच्या निर्णय घेण्याच्या प्रोसेस मध्ये लुडबुड करायची नाही. जो निर्णय असेल त्याप्रमाणे वागायचे नाहीतर तो निर्णय नाकारायचा. तो निर्णय आपल्या अपेक्षेप्रमाणे नसेल तर परत परत आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करणे वेडेपणाचे असते.

अनेक वेळा तुम्हाला असे आढळेल कि  समस्या उद्भवल्यानंतर आतला आवाज आपल्याला लगेच ऐकू येतो. कालांतराने आपल्या विचारांची सरमिसळ झाली कि वेगळा आवाज ऐकायला येण्याची शक्यता असते. परंतु अश्या प्रसंगी अनेक वेळा ऐकू आलेला पहिला आवाजच बरोबर असतो.

आतला आवाज कधी ऐकायचा, कोणत्या निर्णयासाठी, कोणत्या वेळी  त्याचा कौल घ्यायचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे, कारण प्रत्येकाची जडण घडण वेगळी असते.

फक्त हि प्रोसेस एकदा अनुभवून बघा,  हेच माझे सांगणे आहे. मी अनेक वेळा आतल्या आवाजाप्रमाणे निर्णय घेतो व आजपर्यंत तरी मला त्याचा फायदाच झाला आहे. 🙂
काही वर्षांपूर्वी ‘ आतला आवाज ‘ ह्या विषयावर मी दोन लेख लिहिले होते . त्याची लिंक खाली देत आहे.

आपले  अनुभव वाचायला मला आवडतील.

सुधीर वैद्य
१३-०६-२०१४
Advertisements

0 Responses to “३२१) मनातला आतला आवाज – चिंतन”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

June 2014
M T W T F S S
« Apr   Jul »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: