३२०) माझ्या संकेत स्थळाचा ६ वा वाढदिवस (२३-०५-२०१४)

P1050215

३२०) माझ्या संकेत स्थळाचा ६ वा  वाढदिवस (२३-०५-२०१४)

मित्रानो, सुप्रभात

२३ मे २०१४ रोजी माझ्या संकेत स्थळाने (www.spandane.com)  ६ वर्षे पूर्ण
केली. (Hosted २३-०५-२००८) आजपर्यंत ह्या संकेत स्थळाला १,६५,००० लोकांनी
भेट दिली आहे . १३,५०,००० हिट्स रेकॉर्ड झाल्या  आहेत. ह्या  संकेत
स्थळाला अंदाजे ७० देशातील वाचक भेट देतात.

हे संकेत स्थळ म्हणजे एका अर्थाने माझ्या आयुष्याचा लेखा जोखा आहे.
आयुष्यातील वैयक्तिक आणि व्यावसाईक अनुभव ह्याचे अनुभव कथन आहे. आयुष्यात
जोपासलेले छंद (लिखाण, वाचन medical, astrology , photography वगैरे)
ज्याचा  समाजाला उपयोग होईल, share केले आहेत.

मी लिहिलेली अनेक विषयांवरची पुस्तके अपलोड केली आहेत. मला खात्री आहे कि
संपूर्ण संकेत स्थळ एका  भेटीत बघून होणार नाही. एकदा भेट द्या आणि आवडले
तर मित्रांना सांगा.

ह्या संकेत संकेत स्थळासाठी मी अंदाजे १ लाख रुपये आजपर्यंत खर्च केले
आहेत. संकेत स्थळावर एकही जाहिरात नाही त्यामुळे रसभंग होत नाही. पैसा
मिळवणे हा ह्या संकेत स्थळाचा कधीच हेतू नव्हता. आपल्याकडील ज्ञान व
अनुभवाचा समाजाला फायदा व्हावा ह्याच हेतूने ह्या संकेत स्थळाची निर्मिती
केली आहे.

संकेत स्थळावरील असंख्य पोस्ट माझ्या व्यावसाईक career च्या वेळी तयार
केल्या आहेत. तीच गोष्ट मी लिहिलेल्या पुस्तकांची. वरील छंद सुद्धा
गेल्या १५ वर्षाहून अधिक काळाचे आहेत. त्यामुळे व्यवसायातून निवृत्त
झाल्यानंतर सुद्धा माझा वेळ मजेत जातो आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम आहेच.

आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा, सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो….

सुधीर वैद्य
१३-०६-२०१४

0 Responses to “३२०) माझ्या संकेत स्थळाचा ६ वा वाढदिवस (२३-०५-२०१४)”



  1. Leave a Comment

Leave a comment




Archives

June 2014
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.