३१०) २३-०४-२०१४ ची शहाणी सकाळ :

310) Photo2840

३१०) २३-०४-२०१४ ची शहाणी सकाळ :

मित्रानो, सुप्रभात.

आजच्या शहाण्या सकाळचे फिरायला गेलो असताना काढलेले हे काही फोटो.

आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा, सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो…

माझ्या आयुष्यात २३ एप्रिलला खूप महत्व आहे. ह्याच तारखेला माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले.

३ वर्षापूर्वी ह्याच तारखेला माझ्या उजव्या डोळ्यात Retina च्या नभात काळे ठिपक्यांचे ढग (Floaters ) दाटून आले. हा अनुभव अनपेक्षित होता, पण खूप धक्कादायक नव्हता. कारण त्यापूर्वी २००४ साली डाव्या डोळ्यात हीच समस्या उदभवली होती.

परंतु २०११ हे माझे निवृत्तीचे वर्षे होते. १५ मे पर्यंत सर्व कामे उरकायची होती. घरात कोणीच नव्हते. सर्व कुटुंबीय २ दिवसासाठी बाहेर गावी गेले होते. मी शांतपणे संगणक बंद केला आणि डोळे मिटून विश्रांती घेतली. मागील अनुभवामुळे प्राथमिक उपचार जे मला माहित होते, ते सर्व उपचार केले. दुसऱ्या दिवशी त्रास थोडा कमी झाला होता.

मी देवाची प्रार्थना केली कि माझे काम पूर्ण होईपर्यंत माझे डोळे शाबूत ठेव. देवाने माझी विनंती ऐकली. माझे Audit Reports चे काम वेळेत पूर्ण झाले. असो. आजही त्रास आहेच पण निवृत्तीमुळे संगणकावरील काम कमी झाले आहे. त्यामुळे एका वेळी मी फार काळ संगणकावर काम करत नाही.

२० वर्षापूर्वी २३-०४-१९९४ ची सकाळ मात्र माझ्यासाठी शहाणी नव्हती. सकाळ सकाळ आयुष्याच्या प्रांगणात काळे भोर ढग दाटून आले. हा अनुभव खूप धक्कादायक होता. देवाने माझी लहानपणापासून करत असलेली विनंती ऐकली म्हणून मला आनंदही होत होता. परंतु माझ्या डोळ्यासमोर दिवसभरातील appointments – अपूर्ण राहिलेले Audit चे काम दिसत होते. ह्या अनुभवातून मी जगेन कि नाही अशी परिस्थिती होती. Office ला न जाता वाटेतूनच मी परतलो.

Family डॉक्टर कडे गेलो. मामला गंभीर होता. पण माझ्या Family डॉक्टरची आश्वासक catch line असायची कि Nothing to worry. मला थोडा धीर आला. पत्नी घरी नव्हती. मी घरी जाऊन पूर्ण आराम केला. हि सर्व परिस्थिती normal होण्यास ४८ तास लागले. सर्व वैद्यकीय चाचण्या झाल्या, पण कारण गुलदस्त्यात राहिले.

मी परत कामाला जुंपून घेतले. दर वर्षी ह्याच २३ तारखेला मला हि घटना आठवून कापरे भरायचे. पण जसजसा काळ निघून गेला आणि २४-०७-१९९६ ला परत जेव्हा जीवघेणा अपघात झाला तेव्हा २३ एप्रिलचा अनुभव फिका पडला. असो.

पुढे १९९७-९८ साली मी वैद्यकीय शिक्षण घेतले व २३ एप्रिल १९९४ च्या परिस्थितीचे कारण शोधले. त्यावर उपाय सुचविण्यासाठी PPT तयार केला. माझ्या संकेत स्थळावर तो आजही उपलब्ध आहे.

मित्रानो, आजच्या प्रसन्न सकाळी मी हा अनुभव share केल्याबद्दल मला माफ करा. आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा, सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो…आणि असा प्रसंग तुमच्या आयुष्यात येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुधीर वैद्य
२३-०४-२०१४

Advertisements

0 Responses to “३१०) २३-०४-२०१४ ची शहाणी सकाळ :”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

June 2014
M T W T F S S
« Apr   Jul »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: