३०६) ओळखा पाहू ?

P1070405-tile

३०६) ओळखा पाहू ?

प्रश्न जेव्हा सोपा वाटतो, तेव्हा उत्तर काही वेळा कठीण शकते, असा माझा अनुभव आहे.

काल १०-०४-२०१४ रोजी मी वरील पोस्ट आणि काही फोटो अपलोड केले होते. काही मित्रांनी पोस्टला like केले तर काही मित्रांनी पोस्टला उत्तर दिले. उत्तरे बरोबर होती. पण मला अपेक्षित असलेले एक उत्तर मात्र मिळाले नाही. तेच उत्तर देण्यासाठी हि पोस्ट.

आमच्या बागेत आवळ्याचे झाड आहे. दर वर्षी भरपूर आवळे लागतात, पण बरेचसे आवळे सहनिवासातील मुले काढून नेतात. परंतु सध्या परीक्षा असल्यामुळे आवळे झाडावर शिल्लक राहिले. झाड आवळ्यांनी लगडले होते. त्यामुळे आम्हीच बरेच आवळे काढले. अजूनही बरेच आवळे मुलांसाठी ठेवले आहेत.

आवळे पाडून खाण्यातील गंमत काही वेगळीच असते. 🙂 काय मित्रानो, आठवले का आपले बालपण ? असो.

हे झाड बायकोला तिच्या एका मैत्रिणीने दिले आहे . मैत्रिणीच्या झाडाला ह्या वर्षी काही कारणांनी आवळे लागले नाहीत. हि मैत्रीण आवळ्यापासून wine बनविते व आम्हाला wine ची एक लहान बाटली दरवर्षी देते. बायको दर वर्षी हे आवळे मिठात घालते, त्याचे लोणचे बनविते किंवा सरबत करते . ह्या वर्षी मैत्रिणीच्या सांगण्यावरून आवळ्याची wine बनविण्याचा प्रयत्न आहे.

दोन लहान बाटल्यात (लाल झाकणाच्या) मिठाच्या पाण्यात आवळे टाकले आहेत. काल संध्याकाळी आवळे बाटलीच्या बुडाशी जमा झाल्यानंतर मिठाचे पाणी काढून टाकले व आवळे शीतकपाटात ठेवण्यात आले.

मोठ्या बरणीत wine बनविण्यासाठी आवळे , पाणी, साखर, दोन लवंगा, एक दालचिनीचा तुकडा असे मिश्रण ठेवले आहे. रोज सकाळी हे मिश्रण चमच्याने ढवळायचे. असे ३० दिवस केल्यानंतर wine तयार होते. ह्या wine ची चव काय वर्णावी ?

हि पोस्ट लिहिता लिहिता मिठातील आवळे तोंडाची चव वाढवीत आहेत. 🙂

सुधीर वैद्य
११-०४-२०१४

Advertisements

0 Responses to “३०६) ओळखा पाहू ?”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

June 2014
M T W T F S S
« Apr   Jul »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: