३०३) सिंह कधी गवत खात नाही ……. गवत खाणाऱ्याला खातो ……

303) photo2749_001

३०३) सिंह कधी गवत खात नाही ……. गवत खाणाऱ्याला खातो ……

लेख लिहायला घेतला आणि ह्या वाक्याची आठवण झाली, म्हणून तेच नाव ठेवले. असो.

सकाळी फिरायला गेलो असताना एक भटका कुत्रा गाईच्या गवतात तोंड खुपसुन गवत खात होता. लहानपणी मांजर आणि कुत्रा पोट बिघडल्यावर हिरवे गवत खातात असे आई – आजीकडून ऐकले होते. त्यानंतर काही वेळा मांजर गवत खाताना बघितले सुद्धा होते. पण कुत्रा गवत खाताना बघितल्याचे स्मरत नाही. माझ्या घरी १४ वर्षे सोनी नावाची पोमेरिअन कुत्री होती. तिचे पोट दुखत असले – बिघडले असले कि आम्ही तिला पुदिन्याचा अर्क देत असू. तसेच पोटाला पेन बाम लावत असू.

माणूस काय काय खातो किंवा काय काय खात नाही, हा एका वेगळ्या लेखाचा स्वतंत्र विषय आहे, त्यामुळे त्या विषयावर न बोललेलेच बरे .

पण ह्या कुत्र्याकडून माणसांनी शिकण्यासारखे बरेच आहे. समस्या (आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, शारीरिक वगैरे ) आल्यानंतर योग्य तोच उपचार – उपाय केला पाहिजे. स्वत:ला निर्णय घेता येत नसेल, तर तज्ञ मंडळींवर हि जबाबदारी टाकली पाहिजे व त्यांच्या सल्ल्यानुसार वागले पाहिजे. अर्धवट माहितीवर उपाय करून किंवा गुरु – देव – व्रत – वैकल्य यांच्या आहारी जाऊन स्वत:चे आणि कुटुंबाचे नुकसान करू नये.

गवत हे काही कुत्र्याचे खाणे नाही पण वेळ आली तर आहे ती परिस्थिती स्वीकारून त्याने डोक्याने निर्णय घेऊन गवत खायला मागेपुढे पाहिले नाही. हि अक्कल त्याला उपजत मिळालेली आहे . त्याचा त्याने योग्य वेळी उपयोग केला, इतकेच.

सिंह कधी गवत खात नाही ……. गवत खाणाऱ्याला खातो …….हा म्हणजे बळी तो कान पिळी अश्यातला प्रकार आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रामाणिक – कायद्याचा आदर करणाऱ्या माणसालाच जास्त त्रास होतो, असा सर्वत्र अनुभव आहे.

मित्रानो, काही वेगळा विचार सुचला तर जरूर कळवा.

सुधीर वैद्य
२७-०३-२०१४

Advertisements

0 Responses to “३०३) सिंह कधी गवत खात नाही ……. गवत खाणाऱ्याला खातो ……”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

March 2014
M T W T F S S
« Jan   Apr »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: