३०१ ) माझ्या लेखन प्रवासाचा आढावा

251) Writer
३०१ ) माझ्या  लेखन प्रवासाचा  आढावा :
मित्रानो, मी काही हाडाचा लेखक नाही. त्यामुळे लेखन प्रवासाचा  आढावा असे जरी लेखाचे शीर्षक असले तरी घाबरून जाऊ नका. मराठीशी माझा संबंध फक्त SSC पर्यंत होता. त्यानंतर प्रथम & द्वितीय वाणिज्य शाखेत मराठीच्या दोन कादंबऱ्या अभ्यासाला होत्या. त्यानंतर उच्च शिक्षणामुळे मराठी लेखनाचा संबंध तुटला. मराठी वाचन करायला हि फारसा वेळ मिळत नसे.  शाळेत असताना मी मराठी निबंध चांगले लिहित असे. सर माझा निबंध वर्गात नेहमी वाचून दाखवीत. उगाच अंगावर  मुठभर मास चढल्यासारखे वाटे. आमच्या शाळेत प्रत्येक वर्ग एक मराठी मासिक (हस्तलिखित) स्वरुपात प्रसिद्ध करत असे. ह्या कामात माझा पुढाकार असे. माझे अक्षर चांगले – वळणदार असल्यामुळे मासिकाचे हस्तलिखित करण्याची जबाबदारी मी आणि माझ्या दोन मित्रांवर असे. (आमची शाळा फक्त मुलांची होती. ) बरीच वर्षे आमच्या वर्गाला बक्षीस मिळत असे. असो.

कालांतराने उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर(CA ) मोठ्या कंपनीत नोकरी (१९७५) करू लागलो. तेव्हाही मराठीसाठी वेळ काढू शकलो नाही कारण नोकरी बरोबर उच्च शिक्षण (ACS, DMA, DFM, DORM, DEM. ) चालू होते.

त्यानंतर १९८१ साली Indo -Japanese प्रोजेक्ट मध्ये Financial Controller म्हणून रुजू झालो. हि नोकरी प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर सोडायची असे सुरवातीला ठरवून टाकले होते. ह्या नोकरीत सर्व पत्रांवर मी मराठीत सही करू लागलो. त्यानंतर १९८३ साली प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि मी नोकरी सोडली.

त्यानंतर मी परत एकदा दुसऱ्या  कंपनीत Financial Controller  & कंपनी सेक्रेटरी म्हणून रुजू झालो. ह्या कंपनीतहि मी पत्रांवर मराठीत सही करू लागलो. हि नोकरी स्वीकारताना मनाशी ठरवले कि फक्त दोन वर्षे नोकरी करायची आणि त्यानंतर CA Profession स्वीकारायचे.

१९८५ ला मी हि नोकरी सोडली आणि CA Practice सुरु केली. पुढे व्यवसायात अनेक प्रकारच्या assignments पार पाडून ठरविल्याप्रमाणे १५  मे २०११ रोजी व्यवसायातून निवृत्ती स्वीकारली.

त्याआधी काही वर्षे मी Professional काम कमी करत होतो आणि वाचवलेल्या वेळात Astrology आणि Alternate  Medicine  ह्या विषयांचा अभ्यास करू लागलो. परत एकदा मराठीशी संबंध आला. मराठीत Notes काढू लागलो.

त्याच वेळी २००७ पासून मराठी लिखाणाची उर्मी आली व मी लिहू लागलो. सुरवातीला Audit विषयावरील पुस्तके लिहू लागलो (इंग्लिशमध्ये) मग संकेत स्थळाची निर्मिती करावी असा विचार आला आणि २००८ साली ह्या विचाराची अंमलबजावणी झाली.  त्यानंतर दर ३ महिन्यांनी नवीन लेख संकेतस्थळावर अपलोड करू लागलो. कालांतराने ब्लॉगची केली. पुस्तके आणि लेख लिहिण्याचे जणू वेडच लागले.

मला लहानपणातील गोष्ट आठवली . माझ्या वडिलांनी SSC झाल्यानंतर त्यांच्या ज्योतिष मित्राला माझी पत्रिका दाखविली होती. त्याने सांगितले कि मी Commerce चे शिक्षण घ्यावे. मी मोठेपणी लिखाण करीन असेही ते म्हणाले होते. मी असेच समजत होतो कि माझे Audit Reports, Insurance Survey Reports, Management Reports म्हणजेच माझे लिखाण. पण माझ्या हातून खरेच लिखाण झाले.

१५  मे २०११ ला  निवृत झाल्यानंतर लिखाणाला थोडा वेग आला. नवीन विषय सुचत गेले. फेसबुकवरील कविता वाचून मी सुद्धा कविता करू लागलो. पुस्तक परीक्षण लिहू लागलो. आज हे सर्व तुम्हाला सांगण्याचे कारण कि काल  मी ३०० वा  लेख अपलोड केला. गेल्या ७वर्षात मी ३०० लेख, १०१ पुस्तक परीक्षणे, २५ *लहान – मोठी पुस्तके, माझ्या फोटोवरील लेखमाला आणि ५८ कविता असे लिखाण केले, ह्यावर माझाच विश्वास बसत नाहीये. हे सर्व मी केवळ माझ्या वाचकांच्या प्रोत्साहनामुळे करू शकलो. माझ्या संकेत स्थळाला आणि ब्लॉगला जगभरातून वाचक वर्ग  लाभला आहे.

वयाच्या ६० व्या वर्षी नातवंडांसाठी ४०० पानाचे आत्मचरित्र लिहून ठेवले. (त्यांना जर मोठे झाल्यावर आजोबाला जाणून घ्यावे असे वाटले तर मीच ती सोय करून ठेवली आहे. )

वरील सर्व लेखन माझ्या संकेत स्थळावर आणि ब्लॉग वर उपलब्ध आहे. माझ्या संकेत स्थळाला आजपर्यंत १३ लाखाहून अधिक hits मिळाल्या आहेत. तसेच ६० हून अधिक देशातील १८५००० हून अधिक लोकांनी संकेत स्थळाला भेट दिली आहे. ह्या लिखाणामुळे मला फेसबुकवर अनेक माझ्याहून चांगले लिहिणारे मित्र मिळाले, हे मी माझे भाग्य  समजतो. वेळोवेळी त्यांनी माझ्या लिखाणावर प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. Linked in वरील काही मित्रांनी माझे writing skill endorse केले आहे . परंतु सध्या मी Linked in खाते deactivate केले आहे.
असा हा माझा लेखन प्रवास. तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या सूचना वाचायला मी अधीर आहे.

* Books written / compiled on Audit, Insurance, Inspection, Training, Management, Medical, Stress Management, Naturopathy, Marriage, Life Philosophy, Investment in share Market, IS Audit, Astrology, Medical Astrology etc.*

सुधीर वैद्य
२३-०३-२०१४
Advertisements

0 Responses to “३०१ ) माझ्या लेखन प्रवासाचा आढावा”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

March 2014
M T W T F S S
« Jan   Apr »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: