३००) स्पंदने आणि कवडसे – नातेसंबंध

300) Spandane & Kavadase - RelationshipP1050215-tile

३००) स्पंदने आणि कवडसे – नातेसंबंध

स्पंदने म्हणजे vibrations, मनातील कंपने. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. काही विचार मनात घर करतात. वाचताना – दुसऱ्याशी  बोलताना हि विचार धारा सुरु होते आणि काही काळ मनात हि विचारांची कंपने जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्यासारखी शब्दरूप धारण करतात. अशीच काही नातेसंदर्भातील मनातील विचारांची कंपने आणि कवडसे  आपल्या समोर सादर करत आहे.

नातेसंबंध हा खूप गहन विषय आहे. रक्ताचे नाते असताना सुद्धा संबंध बरेच वेळा चांगले नसतात. त्या उलट रक्ताचे नाते नसताना सुद्धा संबंध खूप चांगले असतात. असे का होते?

नातेसंबंध का जुळतात, कसे जुळतात, कधी तुटतात, का तुटतात ह्या विषयाचा कितीही अभ्यास केला, तरी नेमके उत्तर मिळेल ह्याची खात्री देता  येत नाही. त्यामुळे आपण नातेसंबंध तोंडापुरते का होईना म्हणून टिकविण्याचा प्रयत्न करतो.
माझ्या मते नातेसंबंध मनात उमलले पाहिजेत. मनात उमललेले नातेसंबंध आपल्याला आयुष्यभर साथ देतात आणि आपले आयुष्य सुगंधी करतात .
मित्रानो, तुमचे काय मत आहे?

माझ्या मते जर नाते संबंध टिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतील, तर हे नेतेसंबंध तुटलेलेच बरे. नातेसंबंध हि दोन हातानी वाजवायची टाळी  आहे, एका हातानी वाजवायची चुटकी नाही. जी चटकन दुरावतात ती नातीच नसतात.असो. माझी मते तुम्हाला पटली पाहिजेत असा माझा अजिबात हट्ट नाही.

THE RELATIONS WHICH REQUIRE EFFORTS TO MAINTAIN ARE NEVER TRUE AND IF THE RELATIONS ARE TRUE…THEY NEVER REQUIRE ANY EFFORTS FOR MAINTAINING.

आपल्या आयुष्यात वाद विवादाचे प्रसंग बरेच वेळा येतात. काही वेळेला वाद विवाद करताना मुळ विषय बाजूला पडतो आणि ह्या वाद विवादाला वेगळेच वळण लागते. भांडण वैयक्तिक पातळीवर उतरते. आपला इगो दुखावला जातो. अश्या वेळी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कि आरोप प्रत्यारोप न करता, शांतपणे चर्चा केली पाहिजे. कारण आरोप प्रत्यारोपाचा उद्देश कोण बरोबर हे ठरवण्याचा असतो. त्यात कोणाचाच फायदा नाही. चर्चा केल्यानंतर नेमके काय बरोबर हे कळू शकते. बघा विचार करुन.

“Argument is bad but Discussion is good,

Because Argument is to find out WHO is right.. &

Discussion is to find out WHAT is right..”

काही प्रसंगात उलटा – दुसऱ्या बाजूने विचार करून प्रश्न सुटू शकतात.

उलट्या बाजूने विचार सुरु केला तर कदाचित समोरच्या माणसाची बाजूपण समजून घ्यायला मदत होते…..

“MOST PEOPLE DO NOT LISTEN WITH THE INTENT TO UNDERSTAND; THEY LISTEN WITH THE INTENT TO REPLY…

think about  it…”

ह्या जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, अपवाद फक्त जन्माबरोबर मिळणाऱ्या नात्यांचा आणि फेसबुकवरील मित्रांचा. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते, कधी पैशात किवा इतर रीतीने .

दुसऱ्याला प्रेमाने जिंकता येते असे म्हणतात. पण मला वाटते कि दुसऱ्याला डोक्याने सुद्धा जिंकता येते, कारण डोक्याच्या वापरात हृदयाचा विचार घेतला जातोच असे माझे मत आहे. मी सर्व निर्णय डोक्यानेच घेतो आणि आजपर्यंतच्या आयुष्यात तरी माझा अनुभव चांगला आहे. हृदयाने घेतलेले निर्णयच काही वेळा लाभदायक ठरले नाहीत. असो. आपला काय अनुभव ?

दुसऱ्याला गृहीत धरण्याची सवय अनेक लोकांना असते, कारण त्यांना मी आणि माझे ह्यात जास्त रस असतो. इतर सर्व लोक हे केवळ आपल्याला सेवा देण्यासाठी आहेत असा त्यांचा ग्रह असतो. मी गृहीत धरतो म्हणजे माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे असा युक्तिवादही केला जातो. जेव्हा आपल्याला दुसऱ्याकडून गृहीत धरले जाते, तेव्हा आपण नेमके कसे वागतो ? असा विचार केला पाहिजे. असे झाले तर परिस्थितीत नक्की सुधारणा होईल.

दुसऱ्याच्या चुका सांगताना, आपणही चुका करतो का? हे तपासले तर बरे होईल. आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे दाखवितो तेव्हा तीन बोटे आपणाकडे असतात, ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

चूक कबूल करायला धैर्य लागते. चूक कबूल करताना आपल्या मनाला ज्या वेदना होतात, तीच आपली कालांतराने शक्ती बनते आणि आपण नवीन चुक करण्यापासून परावृत्त होतो.

नाते आणि पैसा दोन्हीही आपापल्या जागी योग्यच. पण नात्यात पैसा आला किवा पैशात नाते लुडबुड करायला लागले कि प्रश्न निर्माण होतो.

संवाद करायला माणूस २ वर्षांचा असताना शिकतो. पण काय बोलावे , कसे बोलावे, काय बोलू नये वगैरे शिकायला कधी कधी एक जन्म सुद्धा अपुरा पडतो.

मन मारून काहीही करू नये. जे करायचे ते मनापासून आणि मनाचा कौल जाणून. जे आपल्या मनाला पटते तेच करावे, पण त्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे

जगात नाग चावून माणसे फार कमी मरतात ….पण नाग चावलाय ह्या भीतीनेच मरणारी लोकं जास्त आहेत..

~~~~~ आणि माणसाच्या विषारी बोलण्याने बरीच दुखावली जातात.

कित्येक वेळा परिस्थिती माणसाला मासिक दृष्ट्या स्वावलंबी बनवते. पण कोणीही हे करू शकतो. ह्याची सुरवात लहान लहान सुखे नाकारून करता येते. मनाची शक्ती आपोआप वाढते. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करणे हा दुसरा उपाय. जेव्हा तुम्ही फार कमी गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहता, तेव्हा तुमची बरीच tension साहजिकपणे कमी होतात.

आपण जेव्हडे दुसऱ्यावर अवलंबून राहतो (प्रेमाचा बुरखा पांघरून) तेव्हडे आपण स्वत:चे नुकसान करत असतो. मी माझ्या संपर्कात येणाया लोकांना ‘ मानसिक दृष्ट्या ‘ स्वावलंबी’ होण्यास प्रवृत करतो. मी स्वत: कोणाच्यात गुंतत नाही आणि कोणाला माझ्यात गुंतू देत नाही.

सुखी होण्याचा एक मार्ग म्हणजे आपले कोणावाचून अडता कामा नये. हा नियम मी माझ्या ४० वर्षांच्या  career मध्ये पाळला आणि घरात सुद्धा पाळतो. आपण दुसऱ्याची मदत जरूर घ्यावी पण अवलंबून राहू नये. हि विचार धारा एकदा समोरच्याला कळली की तुम्हाला कोणीच त्रास देत नाही. My results are Gr8. 🙂 प्रत्येकाला आयुष्यात एखादे प्रेरणा स्थान असावे असे वाटते. प्रेरणा स्थानाशिवाय हि यश मिळू शकते. पण आपली साथ देणारे कोणी असेल तर त्या यशाला सोनेरी किनार लाभते. पण सगळ्यात मुख्य म्हणजे दुसऱ्याला क्रेडीट देणे.

We are very good Lawyers for our mistakes. Very good Judges for other’s mistakes……….!! दुसऱ्याला सांभाळून घेण्यासाठी स्वत:चा इगो आकारात असणे गरजेचे आहे. जेव्हा नम्रता हि तुमची कमजोरी आहे, असा चुकीचा पवित्रा समोरच्या कडून घेतला जातो आणि तुम्ही गप्पा बसता, तेव्हा नम्रता हा दोष ठरतो असे मला वाटते. नात्यांचे गणित सोडविणे हे बरेच वेळा  अवघड असते .

चांगुलपणा बरोबर unpredictable पणा  जपला, तर गोष्टी थोड्या सोप्या होतात .

आपले आयुष्य म्हणजे असंख्य घटनांची साखळी असते. काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण त्याची वेळ माहित नसते, काही घटनांची वेळ माहित असते. प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ‘ प्रतिक्रिया ‘ (Reaction ) देत असतो . त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते. अर्थात ह्या साठी त्या घटनेवर आधी विचार करावा लागतो. ह्या  विषयी अधिक जाणून घेण्यासाठी माझा मराठी लेख वाचावा लागेल . लिंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/38-ThankGod.pdf


उजेडात असणारी सोबत हि नेमकी किती खरी आणि किती खोटी हा प्रश्न उरतोच. अंधारात सोबत नसते पण आपले मन आपल्याला कधीच सोडून जात नाही.माझ्या मते, कोणी विचारल्यानंतरच आपले मत द्यावे . अश्यावेळी आपण जर ‘ श्रेयस्कर मत ‘ (समोरच्यासाठी श्रेयस्कर – पण त्याला ऐकायला कदाचित आवडणार नाही ) देणार असो तर फारसा प्रश्न पडत नाही . पण लोकांना        ‘ प्रिय मत’ आवडते . प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा Your Right is at the cost of My Right ‘ अशी परिस्थिती येते  तेव्हा संघर्ष अटळ असतो.

नाती तुटायला कोणते कारण लागतेच असे नाही.

माझ्या मते चांगले वागणे आणि वाईट वागणे हे समोरचा  माणूस कसा आहे हे बघूनच ठरवावे लागते.  जास्त चांगुलपणा हा तुमची कमजोरी असे समजले जाते. आपण वाईट वागू शकतो हा आभास समोरच्याला मनात  असणे आवश्यक असत.

समोरच्यासाठी श्रेयस्कर वागणे आणि प्रिय समोरच्यासाठी वागणे ह्याची सीमा रेषा ठरवावी लागतेच.

आपण  काय बोलतो हे आपल्याला कळणे  जास्त महत्वाचे असते . इतरांचा विचार करू नये.

काही नाती एखाद्या कारणासाठी निर्माण होतात. काही नाती काही काळापुरती साथ देतात. तर काही नाती जन्म भरासाठी निर्माण होतात. सर्वच नाती संपताना मनाला चटका लावून जातात. आयुष्य असेच चालू राहते म्हणून तर जगण्यात गंमत  आहे.

जर आपल्या वागणुकीचा त्रास दुसर्यांना  होत नसेल, तर आपल्या मनाप्रमाणे वागायला हरकत नाही . लोगोका काम है कहेना !!!

आपले अस्तित्वच ह्या जगात शाश्‍वत नाही, तेथे शाश्‍वत आधार मिळणे दुरापास्तच आहे.

संवादाशिवाय माणूसाचे जगणे सुसह्य नसते.  त्याचा मनाशी संवाद सतत सुरु असतो  पण जगाशी संवाद साधल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. मनातील भावनांचा निचरा कुटुंबात झाला नाही, तर तो मित्र जवळ करतो. फेसबुकने तर संवाद साधायची खूप मोठी सोय केली आहे . प्रश्न असा आहे कि आपण एकमेकांशी का बोलतो.? ह्याचा काही काळापूर्वी मी खूप विचार केला व मला जे काही सुचले ते शब्दबद्ध केले. लिंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/124_Why_we_speak_with_others.html

चांगला माणूस बनण्यासाठी सुद्धा आपल्याला feedback आवश्यक असतो.मनातल्या भावनेनुसार एका नात्याची प्रतिमा मनात अनुभवणं याला वयाचं काही बंधन नसावे असे मला वाटते. कित्येक वेळा लहान मुले मोठ्या माणसासारखी बोलतात – सल्ला  देतात . तेव्हा ते  बोलणे गांभीर्याने घेतले पाहिजे. आपला मुद्दा जर बरोबर असेल तर मोठ्या माणसांसमोर बोलताना घाबरायचे काहीच कारण नाही, फक्त नम्रपणे व  ठामपणे बोलावे . मी हेच आजपर्यंत करत आलो.

Generally there are fights between two rights rather than right & wrong. The only precaution one has to take is that your Right should not be at the cost of my RIGHT. With this basic understanding, the dispute can always be resolved.

It is also necessary to understand as to why conflict takes place between the persons. Friends may read my article. Link: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/68-conflict.pdf

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मुलभुत गरजा  आहेत. पण त्याच बरोबर माणसाला भावनिक आधाराची सुद्धा गरज लागते. असा आधार तो नेहमीच शोधत असतो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मध्ये हि गरज चटकन पुरी होत असे. आताच्या घकाघकीच्या आयुष्यातही हि गरज शिल्लक राहतेच. आज प्रत्येक जण  busy असतो, त्यामुळे प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आहेत. त्यामुळे हल्लींच्या जमान्यात फेसबुक हि गरज भागविते. पण फेसबुक चे  व्यसन लागता कामा नये. मित्रानो, तुम्हाला काय वाटते?एखादा माणूस आपल्याला का आवडतो ह्याचे विश्लेषण करता आले पाहिजे. खरेतर असे मत एका ठराविक काळानंतरच देता  येते कारण आपली समोरच्या माणसाबद्दलची मते काळानुसार, अनुभवावरून बदलत असतात. आपले पहिले मत हे बरेच वेळा ‘व्यक्तीचे दिसणे’ यापुरते मर्यादित असते. जसा सहवास वाढतो तेव्हा आपण मत बनवू लागतो. आपण स्वत:च नकळतपणे आपली एक प्रतिमा बनवत असतो. समोरच्या  व्यक्तीने जर त्या प्रतिमेला धक्का दिला नाही तर ती व्यक्ती आपल्याला आवडू लागते. पण जर आपल्या प्रतिमेला धक्का लागला आणि विचारांती त्याचे वागणे बरोबर आहे असे आपण मनोमन कबुल केले, तर ती व्यक्ती आपल्याला आणखीन जवळची वाटू लागते.

माणसाने कळपातून फुटणे हा  अतिरेकी  व्यक्ती स्वातंत्र्याचा परिणाम आहे बहुतेक.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, मी काय करू शकतो, मी काय करणार, किती – कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की हवे.

किती बरं वाटतं जेव्हा……..जवळच माणुस भेटतं !.
आणि मनाला उभारी आणतं !!!!!!
आणि काळाचे अंतर पुसून टाकत !!!!!
किती बरं वाटतं जेव्हा……..जवळच माणुस भेटतं !.
पण थोड्याच वेळात भेटलं नसतं ……. तर बर झालं असतं असं वाटत.
मनावरील खपली काढून आपल्याला अस्वस्थ करून जात.
किती बरं वाटतं जेव्हा……..जवळच माणुस भेटतं !.

अहंकार हा माणसाचा मोठा शत्रू आहे. अभिमान आणि अहंकार ह्यातील सीमारेषा खूप धुसर आहे. माणसाला अहंकार वाटू लागला कि समोरची व्यक्ती, परिस्थिती आणि वस्तू यांचे आकलन करण्याची शक्ती धुसर होते. निर्णय चुकतात, पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.

ह्या सगळ्याची सुरवात मिळालेले यश न पचवता आल्यामुळे होते. प्रथम ह्या यशाचा अभिमान वाटू लागतो. कालांतराने अभिमानाची जागा अहंकार घेतो. त्यामुळे यश पचवायला शिका म्हणजे अहंकाराचा प्रश्नच निर्माण होणार नाही.मनातील अवस्थता वाणीत  – बोलण्यात उतरते आणि पुढे प्रत्यक्ष कृतीत परावर्तीत होते. त्यामुळे हाच तो क्षण –  हीच  ती वेळ असते स्वत:ला सावरण्याची.

माणूस प्रेमाचा भुकेला असतोच, पण त्याहून जास्त संवाद साधण्यासाठी भुकेला असतो. चेहऱ्या मागील चेहरा हि ओळख जर तुमच्या वर्तनातून लोकांना दिसली तर त्यांचे तुमच्या चेहऱ्याकडे लक्षच जाणार नाही. तुमचा चेहरा कदाचित ते कालांतराने विसरतील, पण तुमचा खरा चेहरा मात्र त्यांच्या मनात कायमचा कोरला जाईल .

माणसाने स्वत:चा विचार जरूर करावा. पण त्याच बरोबरीने आपला विचार करणाऱ्या माणसाच्या मनाचा विचार केला, तर आपल्या आयुष्यात सुखाची बरसात होऊ शकते

कुटुंब व्यवस्थेचा पाया हा कुटुंबातील व्यक्तीच्या उपयुक्ततेवर ठरतो असे माझे मत आहे.

माणसाला लहानपणी मिळालेल्या वागणुकीतून त्याच्या जगण्याच्या कलेचा जन्म होतो.

आयुष्यात अनेक घटना घडतात. प्रत्येक घटनेचे निरनिराळ्या  मापदंडाप्रमाणे विश्लेषण करता येतेच असे नाही, असे माझे मत आणि अनुभव आहे.

i) माणसाने वागताना आत एक आणि बाहेर एक असे वागू नये.
ii ) जे बोलाल, तेच मनात असुदे.
iii ) You should mean what you say but you may not say what you mean unless called for.
iv) कर्म करताना मनाचा आणि शरीराचा मेळ असुदे. यालाच भगवत गीता ‘विकर्म ‘ म्हणते. कर्मात विकर्म ओतले कि अकर्म होते. याच अर्थ हा कि कर्म केल्यासारखेच वाटत नाही. त्यामुळे कर्माचा बोजा वाटत नाही. (अध्याय चौथा)मौनव्रत सुरु कधी करावे असा प्रश्न काही लोकांना पडणे स्वाभाविक आहे. जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुम्हाला आनंद मिळत नाही किवा त्रास होतो त्यावेळी त्या माणसाबरोबर मौनव्रत सुरु करायची वेळ आली असे समजावे. तसेच जेव्हा तुमच्या बोलण्याचा गैर अर्थ काढला जातो त्यावेळी त्या माणसाबरोबर मौनव्रत सुरु करायची वेळ आली असे समजावे. बरेच वेळा तुमचे बोलणे तरुण वर्गाला रुचत नाही तरी तुम्ही कर्तव्यापोटी जे त्यांच्यासाठी ‘श्रेय’ आहे ते बोलले पाहिजे. कारण सरते शेवटी त्यांच्या चुकांचा तुम्हालाच त्रास होतो.

न बोलण्यातून आपली भावना दुसऱ्याला चांगल्या व प्रभावीपणे समजतात. एकदा सांगितल्यानंतर मौनव्रताचा  प्रयोग करून बघा. काही माणसे संवेदनाक्षम स्वभावानुसार स्वत:च्या समस्येने किंवा  दुसऱ्याच्या समस्येने हळवी होतात. आयुष्यात असे चालत नाही. प्रत्येकाला नशिबानुसार वेगळे दान पडत असते, ह्याचे भान प्रत्येकाला ठेवावे लागते असे मला वाटते. आयुष्यात दु:ख असूच नये असे सुद्धा ह्या माणसांच्या बोलण्यात डोकावते. पण आयुष्य म्हणजे सुख आणि दु:खाचा खेळ असतो. सुखाची मजा दु:ख शिकवते.मुलगा आणि मुलगी ह्यांच्या ability / capacity  मध्ये फरक नसतो. पण मुलीला घडवले जाते हि शोकांतिका आहे. तिच्या वागणुकीचे मापदंड ठरवले जातात.प्रत्येक माणसाचा अग्रक्रम असतो आणि त्याच्यासाठी तो बरेच वेळा बरोबरही असतो. जेव्हा अग्रक्रमाचा मेळ कुटुंबात, समाजात, बसत नाही, तेव्हा झगडा सुरु होतो.असो.जर प्रत्येक माणसाला सहवेदनेचे महत्व कळले आणि त्याने हि भावना अंमलात आणली, तर जगात सुख -शांती नांदायला वेळ लागणार नाही.

नातेसंबंध हा खूप गहन विषय आहे. रक्ताचे नाते असताना सुद्धा संबंध बरेच वेळा चांगले नसतात. त्या उलट रक्ताचे नाते नसताना सुद्धा संबंध खूप चांगले असतात. असे का होते?  व्यावसाईक रीतीने नाते संबंध कसे ठेवता येतील – नातेसंबंध का बिघडतात यासंदर्भातील माझे विचार वाचण्यासाठी हि लिंक बघा. http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/102_Tips_for_establishing_improving_relationship.pdf
आयुष्यात कविता भेटली कि आयुष्याचीच कविता होते. पण आयुष्यात कविता भेटली नाही तर आयुष्याची गझल होते.  🙂

सुधीर वैद्य

२१-०३-२०१४
Advertisements

2 Responses to “३००) स्पंदने आणि कवडसे – नातेसंबंध”


  1. 1 Aparna P Gaikwad November 1, 2014 at 5:40 pm

    Khupch Chan & Barobar ahe]


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

March 2014
M T W T F S S
« Jan   Apr »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: