२९९) सुखांशी भांडतो आम्ही !!!

299) P1090352

२९९) सुखांशी भांडतो आम्ही !!!

मित्रानो तुम्ही कधी सुखांशी भांडला आहात? आपण सर्वजण दु:खाशी भांडतो. दु:ख देणाऱ्या देवाशी भांडतो. पण सुखांशी भांडल्याचे चटकन आपल्याला आठवत नाही हे मात्र खरे.

माणूस फक्त सुखाचा शोध घेत असतो. बालपणी आपले पालक आपल्याला सुख मिळावे म्हणून झगडत  असतात. आपण थोडे मोठे  होतो  आणि मग सुखाची चटक लागल्यामुळे आपण सुखासाठी पालकांशी भांडायला लागतो. कधी ते सुख ओरबाडून घेण्यासही आपण मागेपुढे पाहत नाही.

बरेच वेळा सुख म्हणजे नेमके काय? ह्याचा शोध लागलेला  नसतो. आपण कधी तसा विचारही गांभीर्याने केलेला नसतो. त्यामुळे आपल्याकडे जे नाही आणि  जे दुसऱ्याकडे आहे ते मिळवणे म्हणजे सुख मिळवणे अशी ढोबळ व्याख्या करून आपण मार्गक्रमणा करतो.

स्वप्नं बघणे हा माणसाचा स्वभाव आहे. हि स्वप्नं पालक मुलांच्यासाठी सुद्धा  बघतात. त्यांच्या स्वत:च्या स्वप्नाच्या मागे ती धावत असतातच. आपण पालकांची स्वप्ने साकार करावी म्हणून आपल्याला सर्व सोई सवलती पुरवण्यात येतात. किती तरी वेळा हे सर्व स्वत:च्या पोटाला चिमटा काढून केले जाते. आपण मोठे होतो आणि स्वत:च स्वप्नं बघायला लागतो, बरेच वेळा पालकांच्या जीवावर. पण आपल्या स्वप्नांच्यात आई-वडील असतातच असे नाही. जेव्हा आपली वेगळी स्वप्ने आई-वडिलांना कळतात, तेव्हा ते वेडेपिसे होतात. पण मग त्याना  कळते की आपल्या तरुणपणी आपण हेच तर  केले होते. कदाचित भाषा वेगळी असेल, स्थळ वेगळे असेल पण स्वप्नाचा गाभा तोच आहे.

स्वप्नासाठी किवा ध्येयासाठी लहानपणापासून आपण धावत असतो. एकप्रकारची शर्यतच जणू. त्याचे TRACK आई-वडिलांनी ठरविलेले असतात. नव-नवीन ध्येय गाठताना आपण बरेच काही गमावत असतो. सुरवातीला आपल्याला ह्याची थोडीफार जाणीव असते. पण आपण जस जसे मोठे होतो, तसे आपण ‘ आतला आवाज’ दाबून टाकण्याची कला अवगत करत जातो. त्याचे justification हि करतो. काळाच्या ओघात जेव्हा आपले ‘ मन ‘ बंड करून उठते, तेव्हा आपल्या मनात बुद्धी आणि मन ह्यांचा  झगडा सुरु होतो. सुखाच्या शोधात घावताना अनेक सुखाच्या जागा निसटून गेलेल्या असतात ह्याची प्रकर्षाने आठवण होत राहते. आपण वेडेपिसे  होतो. आपला आदर्शवाद कधीच आपली साथ सोडून गेलेला  असतो. आदर्शवाद पुस्तकजमा झालेला असतो. मग जाणवत राहते की आपण फक्त आयुष्यभर तडजोड करत राहिलो. खऱ्या सुखाकडे डोळेझाक करत राहिलो. हेच आपले सुखाशी केलेले भांडण असते पण हे भांडण आपल्याला फार उशिरा कळते हे आपले दुर्भाग्य असते.

आपला  रस्ता चुकीचा आहे हे सांगणारे हि आपल्याला पूर्वी भेटलेले  असतात पण आपण त्यांचे बोलणे कधीही मनावर घेतलेले नसते. उलट आपला पाय मागे खेचतात म्हणून आपण त्यांच्याशी भांडलेले सुद्धा असतो. काही दु:खे सुखाच्या बरोबर आपल्या आयुष्यात चंचू प्रवेश करतात.

ह्या सर्व विवेचनाचे तात्पर्य म्हणजे आपला ‘आतला आवाज ‘ वेळेवर  ओळखा. सुख म्हणजे नेमके काय ह्याचा हि एका वळणावर शोध घ्या. सुख हे चौरस आहारासारखे पाहिजे. ह्या सुखात आपली स्वप्ने, ध्येय, कुटुंब, मित्र, शरीरस्वास्थ्य, शिक्षण, प्रतिष्ठा ह्या सर्वाचा समावेश आहे का नाही हे तपासून बघा. असे झाले तर मला नाही वाटत तुम्हाला कधी सुखांशी भांडावे लागेल.सुधीर वैद्य

२१-०३-२०१४
Advertisements

0 Responses to “२९९) सुखांशी भांडतो आम्ही !!!”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

March 2014
M T W T F S S
« Jan   Apr »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: