२९६) सुप्रभात – एक चिंतन आणि खारुताई

P1110969

२९६) सुप्रभात – एक चिंतन आणि खारुताई

आज ( १८-०२-२०१४) अंगारखी संकष्टी चतुर्थी. पण आज बागेतील जास्वंदीचे फुल गणपतीला मिळाले नाही, कारण काल  बागेतील खारीनी  जास्वंदीच्या झाडाकडे मोर्चा काढला.

खारींचा दिवसभर बागेत पळापळीचा खेळ चाललेला असतो. पिण्यास पाणी ठेवलेले असते. भूक लागली कि बागेतील केळी, पपई, नारळ  आणि इतर लहान फुलझाडे यांच्यावर आक्रमण असते.

पण आज प्रथमच त्यांनी जास्वंदीच्या झाडाकडे मोर्चा  नेला. माझे सहज लक्ष गेले, पण मी त्यांना हटकले नाही. त्याबद्दल त्यांनी मला फोटो काढू दिले.
धन्यवाद खारुताई.
खारीची खाण्याची एकाग्रता पाहून सहज मनात विचार आला. आजची लहान मुले, तरुण मंडळी खाताना – जेवताना TV च्या समोर बसून जेवतात. कार्य मग्न अधिकारी संगणकावर काम करताना खातात-जेवतात. जेवताना एकाग्रता पाहिजे म्हणजे अन्नाचे चांगले पचन होते.

पण मग अशीच एकाग्रता स्वधर्माचे पालन करताना – आपले कर्तव्य पार पाडताना दाखविली तर, भारतीयांची सर्वांगीण विकासाची रम्य पहाट उगवायला वेळ लागणार नाही. (विकास म्हणजे मला फक्त GDP Growth अपेक्षित नाही ह्याची कृपया मित्रांनी नोंद घ्यावी.) 
मित्रानो आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, समाधानाचा, एकाग्रतेचा, कर्तव्य पूर्तीच्या आनंदाचा जावो.

सुधीर वैद्य
१८-०२-२०१४
Advertisements

0 Responses to “२९६) सुप्रभात – एक चिंतन आणि खारुताई”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

March 2014
M T W T F S S
« Jan   Apr »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: