१०१) संध्याचं सीक्रेट / शोभा डे

S's secret - Photo2733

१०१) संध्याचं सीक्रेट / शोभा डे / S ‘s  secret ह्या कादंबरीचा श्रुती पंडितनी  केलेला अनुवाद / Popular Prakashan / पहिली आवृत्ती २०१० / रुपये ९५ /- पृष्ठे १३०

शोभा  डे  यांच्या कादंबऱ्या जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी मुलांसाठी लिहिलेली हि पहिलीच कादंबरी आहे. मराठी अनुवाद श्रुती पंडित यांनी केला आहे.

प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात अपत्य हा एक महत्वाचा टप्पा असतो. अपत्य असल्याशिवाय आयुष्याला अर्थ प्राप्त होत नाही अशी प्रत्येक जोडप्याची मानसिकता असते. परंतु मुल वाढविताना होणाऱ्या तारांबळीमुळे  त्यांचा जीव मेटाकुटीला येतो. आजच्या गतिमान जीवनात त्यांची दमछाक होते. एकत्र कुटुंब पद्धती शहरात फारशी दिसत नाही. मुलांना पैशाने मिळणाऱ्या सोई – सवलती देता  येतात, पण पुरेसा वेळ मात्र देत येत नाही. त्यामुळे मुलांचे बालपण आणि त्यांचे बाल विश्व पालकांना  परिचित  नसते. त्यामुळे  आपले मुल विचित्र वागू लागले तर हि समस्या कशी सोडवायची हे त्यांना कळत नाही. अश्या पालकांनी  हि कादंबरी नक्की वाचली पाहिजे.

कादंबरीचे कथानक संवादातून उलगडत जाते. बरेचसे संवाद आपण ऐकलेले असतात तर अनेक संवाद आपणही बालपणी म्हटलेले  असतात. ह्या संवादामुळे आपण कादंबरीच्या कथानकात गुंतत जातो. काही वेळा हे कथानक आपल्या घरात घडतेय असे वाटू लागते.

हि कादंबरी प्रत्येक जोडप्याने वाचली पाहिजे असे माझे मत आहे. कादंबरीने समाजाला एक सुंदर message दिला आहे. कुटुंबाचे महत्व, कुटुंबातील सर्व लहान थोर सभासदांचा परस्परावरील विश्वास किती महत्वाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी १३-१४ वयोगटातील मुला – मुलीनी सुद्धा वाचायला हरकत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या पालकांची बाजूही समजण्यास मदत होईल.
हि कादंबरी दोन पिढीतील अंतर नक्की कमी करू शकेल असे मला वाटते.
सुधीर वैद्य
१८-०३-२०१४
Advertisements

0 Responses to “१०१) संध्याचं सीक्रेट / शोभा डे”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

March 2014
M T W T F S S
« Jan   Apr »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: