१००) आयुष्याचे धडे गिरवताना / सुधा मूर्ती

Aayushyache dhade - photo2705_001

१००) आयुष्याचे धडे गिरवताना / सुधा मूर्ती / अनुवाद लीना सोहोनी /
Mehta  Publishing House / रुपये १५०/- प्रथम आवृत्ती मे २०१३ /
अनुभव कथन / पृष्ठे १५५:

 दोन शब्द लेखिकेबद्दल:

खरेतर सुधा मूर्तींची ग्रंथप्रेमी मंडळीना ओळख करून देण्याची गरज नाही. इंग्लिश आणि कन्नड ह्या दोन्ही भाषेत त्यांनी विपुल लेखन केले आहे. सुधा मूर्ती ह्या इन्फोसिस foundation च्या chairperson आहेत.  पुस्तकाच्या शेवटी त्यांनी लिहिलेल्या साहित्याची सूची दिली आहे.

पुस्तकातील विषयाबद्दल:

आपल्या आयुष्यात अनेक घटना घडतात, अनेक माणसे  आपल्याला भेटतात.
ह्या घटना आणि माणसे आपल्याला काहीतरी शिकवून जातात. त्याचे रसग्रहण करायची आपली तयारी पाहिजे. हे प्रसंग, घटना , माणसे कधी आपल्यला आनंद देतात तर कधी दु:ख देतात. काहीवेळा मन हेलावून जाते. आपण बचैन होतो. काही घटना सुखकारक असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अनुभवायला मिळतात . थोडक्यात म्हणजे आपले आयुष्य प्रत्येक क्षणी समृद्ध होत असते.

लेखिकेने आयुष्यात भेटलेल्या काही व्यक्तींचे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. प्रत्येक घटना – व्यक्तिचित्र जेमतेम २-३ पानांचे आहे. अनुभवाच्या शेवटी कथेचे सार  दिले आहे. प्रत्येक अनुभव वाचताना कधी मन उदास होते , कधी डोळ्यात अश्रू दाटतात. त्या वेळेची  परिस्थिती आणि त्यात आजही काहीही न झालेली सुधारणा अंगावर  काटा उभा करते. मित्रानो , ह्या भावना मनात आल्या तर त्याचे स्वागतच करा . ह्याचा एकच अर्थ होतो कि तुमचे मन अजूनही संवेदनशील आहे.

दोन शब्द मुखपृष्ठाबद्दल:
पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप आकर्षक आणि संयुक्तिक आहे. लहानपणी दगडाच्या पाटीवर गिरवलेल्या मुळाक्षरांची आठवण आली. पुढील वाटचालीत – उच्च शिक्षणात ह्या मुळाक्षरांचे शब्द होतात आणि पदानुसार – परिस्थिती नुसार त्याचे सोयीस्कर अर्थ काढले जातात. वाईट ह्या गोष्टीचे वाटते कि त्यामुळे हळू हळू माणसातील माणूसपण हरवत आहे. हे माणूसपण परत मिळविण्यासाठी हे पुस्तक आद्रेखून वाचले पाहिजे. आपले पाय अजून जमिनीवर आहेत का हे तपासण्याची संधी हे पुस्तक देते.

लीना सोहोनी ह्यांनी अनुवाद सुरेख केला आहे. असे सुंदर विचारधारा संपन्न पुस्तक प्रदर्शित केल्याबद्दल प्रकाशकाचे आभार.
मित्रानो , वेळात वेळ काढून हे पुस्तक वाचा.
सुधीर वैद्य
१३-०३-२०१४
Advertisements

0 Responses to “१००) आयुष्याचे धडे गिरवताना / सुधा मूर्ती”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

March 2014
M T W T F S S
« Jan   Apr »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: