९७) वार्धक्य / मंगला गोडबोले / Simone De Beauvoir

Old Age - Photo2522

९७) वार्धक्य / मंगला गोडबोले / Simone De Beauvoir यांच्या ओल्ड एज ह्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित / उत्कर्ष प्रकाशन / प्रथमावृत्ती जून १९९१ / द्वितीय आवृत्ती ऑगस्ट २००८ / रुपये १००/- पृष्ठे १२४

 मुळ पुस्तक फ्रेंच भाषेत आहे. पुस्तक कसले चांगला ६५० पानांचा ग्रंथ आहे. त्या पुस्तकाचे इंग्लिश मध्ये भाषांतर झाले व ह्या इंग्लिशमध्ये भाषांतर झालेल्या पुस्तकावर हा मराठी अनुवाद आधारित आहे.  ह्या पूर्वी केवळ वार्धक्य ह्या विषयावर खोलात जावून कोणी लिखाण केलेले नाही असे लेखिकेचे म्हणणे आहे.

मूळ  पुस्तक १९७० साली प्रसिद्ध झाले व त्यातील संदर्भ परदेशातील आहेत. ह्या ग्रंथातील निरीक्षणे विदेशातच नाहीत  तर आपल्या संस्कृतीतहि दिसतात. ग्रंथ जुना असला तरी आजहि ह्या निरीक्षणांत आमुलार्ग बदल झालेला दिसत नाही. पुस्तक वाचताना लेखिकेने  केलेली निरीक्षणे आपल्या अंगावर येतात. खरेतर  बरीचशी निरीक्षणे आपल्या परिचयाची असतात व त्यामुळे आपण पुस्तकात गुंतून जातो.  पुस्तकातील निरीक्षणांवर जर आपण विचार केला, भोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन केले, आपल्या आयुष्यात डोकावून बघितले तर आपल्याला खूप गोष्टी आपल्या घरापासूनच सुधारता येतील.

ह्या पुस्तकात वार्धक्याचा अनेक बाजूने अभ्यास करून निरीक्षणे नोंदवली आहेत.
वार्धक्य आणि जीवशास्त्र, मानववंश शास्त्रीय तपशील, वार्धक्य – इतिहास काळातून फेरफटका, वार्धक्य – समकालीन समाजामध्ये, वार्धक्याची जाणीव आणि स्वीकार, काळ -काम -वेग, वार्धक्य आणि दैनंदिन जीवन.

हा मूळ ग्रंथ १९७० साली परदेशात लिहिला गेला. त्यातील काही संदर्भ स्थळ – काळानुसार आज लागू होणार नाहीत, ह्याचा विचार करून लेखिकेने ह्या संदर्भहीन गोष्टी (भारतासाठी आणि काळानुसार) एका वेगळ्या प्रकरणात (निष्कर्ष लेखिकेचे, शेवटी थोडे अनुवादकाचे) नमूद केल्या आहेत.

पुस्तकात ‘ एक परिशिष्ट – दृष्टीक्षेपात वार्धक्य ‘  आहे. ह्या प्रकरणात पुस्तकचे सार दिले आहे. पण कृपया हे प्रकरण वाचून पुस्तकाची बोळवण करू नका.
 
बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बदल हा  निसर्गाचाहि नियम आहे. प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या आयुष्याचा प्रवास अंताकडे चालू असतो. पण आपण वार्धक्य आणि मृत्यू  हे शब्द हि निषिद्ध मानतो, तर त्याबद्दल विचार करणे आणि म्हातारपणाची तयारी करणे दूरच राहिले. हे पुस्तक आपल्याला शेवटचा दिवस गोड व्हावा ह्यासाठी मदत करते व आपल्या विचारांची दिशा बदलण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हे पुस्तक खरेतर  तरुण मंडळीनी वाचायला पाहिजे. पण जेष्ट नागरिक हि हे पुस्तक आता वाचून आपल्या मानसिकतेत बदल करण्याचा प्रयत्न करू शकतात.
जगभर गाजलेला हा ग्रंथ मराठी उपलब्ध केल्याबद्दल उत्कर्ष  प्रकाशनाचे आभार. मंगल गोडबोलेनी पुस्तकाचा भावार्थ छानच शब्दबद्ध केला आहे.

मित्रानो, वेळात वेळ काढून हे पुस्तक नक्की वाचा. तुमचा वेळ फुकट जाणार नाही ह्याची खात्री मी देतो.

सुधीर वैद्य

२८-१२-२०१३
Advertisements

0 Responses to “९७) वार्धक्य / मंगला गोडबोले / Simone De Beauvoir”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

January 2014
M T W T F S S
« Dec   Mar »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: