२८९) स्पंदने आणि कवडसे – भाग ४

289) Spandane & Kavadase

२८९) स्पंदने आणि कवडसे – भाग  ४

स्पंदने म्हणजे vibrations, मनातील कंपने. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. काही विचार मनात घर करतात. वाचताना – दुसऱ्याशी  बोलताना हि विचार धारा सुरु होते आणि काही काळ मनात हि विचारांची कंपने जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्यासारखी शब्दरूप धारण करतात. अशीच काही मनातील विचारांची कंपने आणि कवडसे भाग ४ आपल्या समोर सादर करत आहे.
————————————————————————————————-

प्रत्येक माणसाने प्रत्येक क्षणी (सुखाच्या, दु:खाच्या, वेदनेच्या वेळी ) जर  पुढील ४ शब्द लक्षात ठेवले, तर त्या माणसाचे पाय आपोआपच आयुष्यभर जमिनीवर राहतील, जेणेकरून माणूस म्हणून जन्म मिळाला असला तरी त्याचे माणूसपण सिद्ध होईल. ते जादूचे शब्द आहेत ” This too will pass.” ( हे हि दिवस जातील )

मित्रानो, बघा विचार करून आणि ह्या शब्दांचा उपयोग करायला लागा. ह्या शब्दांमुळे माणसाला कधीही कोणत्याही क्षणी अति आनंद , अति दु:ख, अति वेदना होणार नाहीत.
——

 सत्य लोकांना पटण्यासाठी साक्ष – पुरावे लागतात. नाहीतर त्याला  सत्य म्हणून मान्यता मिळत  नाही . मग समाज अश्या वेळी त्या गोष्टीला – माणसाला असत्य – खोटा  मानू लागतो. पण सत्य हे सत्यच रहाते.
भूतकाळ, वर्तमानात जगण्यासाठी प्रेरणा देईलच ह्याची खात्री नाही , त्यासाठी वर्तमान काळातील ध्येयच लागते, असे माझे मत आहे.

संसार जर दोघांचा असेल, तर संसार वाचवण्यासाठी बरेच वेळा बायकोलाच का नमते – पडते घ्यावे लागते ? संसार टिकवण्यासाठी बायकोलाच  का त्याग करावा लागतो ?

मनातील अवस्थता वाणीत  – बोलण्यात उतरते आणि पुढे प्रत्यक्ष कृतीत परावर्तीत होते. त्यामुळे हाच तो क्षण –  हीच  ती वेळ असते स्वत:ला सावरण्याची.

मन हे मन असते तर मग पुरुषाचे मन आणि बाईचे मन ह्यात फरक का असतो?
हा फरक ज्या जोडप्याला कळतो, त्यांचा संसार सुखाचा होतो.

सहवासातून होणाऱ्या संस्कारातून माणूस थोडा फार सुधारू शकतो, पण मुलभुत अवगुण सुधारणे कठीण असते.

प्रेमाचे दुसरे नाव म्हणजे त्याग.

यशाचे मोजमाप करताना ‘ काय मिळवले ‘ ह्या विचाराबरोबर हे यश मिळविण्यासाठी ‘ काय गमावले ‘  ह्याचाही विचार झाला पाहिजे.

मन:शांती मिळवायची असेल तर आयुष्यात जे मिळाले आहे, त्यावर प्रेम करा. कारण आपल्याला जे हवे असेल ते मिळेल ह्याची खात्री नसते.

ज्या माणसाकडे सर्व सुखसोई – गोष्टी आहेत त्याला समाज सुखी आणि श्रीमंत मानतो, पण खरेतर ज्याला सुखी होण्यासाठी कोणत्याही गोष्टीची गरज पडत नाही तो खरा सुखी आणि श्रीमंत, असे मला वाटते.

Common sense is most uncommon.

फेसबुक वर फक्त लेखक, कवी, समीक्षक, टीकाकार, वाचक यांची उठबस असते . 🙂

कोणी तरी म्हटले आहे …. कोणी नाहीहो … माझ्याच आतल्या आवाजाने म्हटले हे आहे …. 🙂

जेव्हा आयुष्य हीच एक परीक्षा आहे, याचे भान येते  तेव्हा आयुष्यभर विद्यार्थी दशेला पर्यायच उरत नाही.

नातेसंबंध हा खूप गहन विषय आहे. रक्ताचे नाते असताना सुद्धा नातेसंबंध बरेच वेळा चांगले नसतात. त्या उलट रक्ताचे नाते नसताना सुद्धा संबंध खूप चांगले असतात. असे का होते?  व्यावसाईक रीतीने नाते संबंध कसे ठेवता येतील – नातेसंबंध का बिघडतात यासंदर्भातील माझे विचार लवकरच एका स्वतंत्र लेखात मांडणार आहे.
माणूस प्रेमाचा भुकेला असतोच, पण त्याहून जास्त संवाद साधण्यासाठी भुकेला असतो .
 
चेहऱ्या मागील चेहरा हि ओळख जर तुमच्या वर्तनातून लोकांना दिसली तर त्यांचे तुमच्या चेहऱ्याकडे लक्षच जाणार नाही. तुमचा चेहरा कदाचित ते कालांतराने विसरतील, पण तुमचा खरा चेहरा मात्र त्यांच्या मनात कायमचा कोरला जाईल .
 
कोळ्याच्या जाळ्याप्रमाणेच आपल्या आयुष्यातही मोहाचे अदृश्य जाळे असते. कीटक जेव्हा कोळ्याच्या जाळ्यात अडकतो तेव्हा त्यातून सुटणे खूप कठीण असते. माणसाची सुद्धा ह्याहून वेगळी अवस्था नसते. मोहावर विजय मिळवा. मनाचा संयम आणि निग्रह वाढवा.

आयुष्यात अनेक वेळा विनाकारण नकारात्मक विचार येतात.  नकारात्मक विचार हे पावसासारखे असतात. आधी शिंतोडे पडतात, मग भूर भूर चालू होते आणि मग कोसळायला सुरवात होते. पाऊस सुरु झाला कि आपण कसे चटकन छत्री उघडतो, तसेच जेव्हा नकारात्मक विचार मनात येऊ लागले कि त्यांना झिडकारा, मनाचा गाभारा सकारात्मक विचारांनी भरा आणि बघा  – अनुभवा जादू.

स्त्री – पुरुष समानतेच्या गोष्टी फक्त केल्या जातात – चर्चा सत्र रंगतात, पण ती चर्चा अंमलात आणण्याची मानसिक तयारी मात्र नसते. 😦

माणसाने स्वत:चा विचार जरूर करावा. पण त्याच बरोबरीने आपला विचार करणाऱ्या माणसाच्या मनाचा विचार केला, तर आपल्या आयुष्यात सुखाची बरसात होऊ शकते.

असे म्हटले जाते कि कळते पण वळत नाही. ‘ कळणे ‘ हे बौद्धिक  पातळीवर घडते.
‘ वळणे ‘ हे मात्र शारीरिक पातळीवर घडावे लागते.  आता भारतातील मतदार कळते पण वळत नाही ह्या स्थितीतून बाहेर पडले आहेत असे वाटते.

आजची तारीख : १२-१२-१३: All are equal but some are more equal than the others. ……. Georg Orwell

No News is Good News.

कुटुंब व्यवस्थेचा पाया हा कुटुंबातील व्यक्तीच्या उपयुक्ततेवर ठरतो असे माझे मत आहे.

जो पर्यंत जेष्ट पालक दुसऱ्या पिढीला उपयुक्त असतो (आर्थिक, नातवंडांची – घराची जबाबदारी – घरातील कामे वगैरे ) तो पर्यंत त्याची किंमत ठेवली जाते.  त्याने कामे करायची पण योग्य सल्ले सुद्धा द्यायचे नाहीत हे अपेक्षित असते. नातवंडांच्या – सुनेच्या तक्रारी करायच्या नाहीत. नातवाला शिस्त लावण्याच्या भानगडीत पडायचे नाही. थोडक्यात तोंड बंद ठेवायचे.

नकारात्मक विचार हे काही अपवाद वगळता नकारात्मक नसून ठरवलेली गोष्ट कशी योग्य रीतीने (सकारात्मक) साध्य होईल याची पूर्वतयारी असते. आयुष्याचा प्रवास हा नकारात्मक (वजा चिन्ह ) ते सकारात्मक (अधिक चिन्ह ) हा जास्त सहजपणे होतो. जेव्हा फक्त सकारात्मक दृष्टीकोन ठेवला जातो तेव्हा वाटेतील खाच – खळगे नजरेतून सुटण्याची शक्यता असते. वजा चिन्हाचे (-) अधिक चिन्ह (+) करणे खूप सोपे असते. पण + चिन्हातून – चिन्हा पर्यंतचा प्रवास हा हा वेदनामय असतो. बघा विचार करून.

फेसबुक मंडळींचे व्यसन कमी करण्यासाठी अधूनमधून  नेट स्लो केले जाते . आपण MTNL – BSNL चे आभारच मानले पाहिजेत. 🙂 आपली सहनशक्ती वाढते, ज्याचा आपल्याला आयुष्यात फायदाच होतो. कधी कधी आपली व्यथा उलट दिशेने तपासणे  गरजेचे असते. 🙂 🙂

माणसाला लहानपणी मिळालेल्या वागणुकीतून त्याच्या जगण्याच्या कलेचा जन्म होतो.

आयुष्यात अनेक घटना घडतात. प्रत्येक घटनेचे निरनिराळ्या  मापदंडाप्रमाणे विश्लेषण करता येतेच असे नाही, असे माझे मत आणि अनुभव आहे.


सुधीर वैद्य

२७-१२-२०१३
Advertisements

0 Responses to “२८९) स्पंदने आणि कवडसे – भाग ४”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

January 2014
M T W T F S S
« Dec   Mar »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: