२८५) आदर्श नाव

285) Baby
२८५) आदर्श नाव

बायको : अहो ऐकले का ? आपल्या मुलाचे नाव काय ठेवायचे? आताच ठरवूया.
नवरा : काय घाई आहे. delivery ची तारीख एप्रिल – मे २०१४ मधील आहे.
बायको :  गेल्या वेळी घाई – घाईत पहिल्या मुलाचे नाव ठेवले. तसे नको व्हायला ह्यावेळी.
नवरा : मग तूच सुचव काही नावे. पण मुलगाच होईल कशावरून ?
बायको : पहिला मुलगाच आहे ना. मग ह्यावेळी सुद्धा मुलगाच होईल .

नवरा : बरे. झाले तुझे समाधान. आता नावे सुचवते आहेस ना ? असे नको व्हायला कि नाव आपण  ठेवायचे आणि मोठेपणी त्याचे गुण बघून लोक नावं ठेवायचे.

बायको : मी काही जुनी आणि काही नवीन नावे सांगते. (शरद, विश्वास, सुशील, प्रमोद, शंकर, महादेव, जितेंद्र, भास्कर, अरविंद, आदर्श, अशोक, राहुल, नरेंद्र, सचिन) आता तुम्ही सांगाल ते नाव आपण ठेवू.

नवरा : अग नावे सगळी चांगली आहेत, पण ह्यातील यादीतील नाव ठेवायला जरा  भीती वाटते. काही नावे  आहेत तशी विचार करण्यायोग्य.
बायको :मग सांगाना, कोणते नाव तुम्हाला पसंद आहे?

नवरा : नरेंद्र , अरविंद हि नावे मला जर बरी वाटतात. पण अजून थोडी वाट बघूया. ह्या दोन -तीन महिन्यात काही नवीन नावे कळू शकतील. तेव्हा तूर्तास हा विषय मार्च २०१४ पर्यंत स्थगित करू या. मुलगी झाली तर काय नाव ठेवायचे हे ठरवून ठेव. मला वाटते कि सुषमा, दुर्गा, प्रिया, सुप्रिया ह्या पैकी एक नाव चालेल.
बायको : ठीक आहे . तुमच्या शब्दाबाहेर मी कधी वागते का?
नवरा : 🙂 🙂 हा हा हा

मित्रानो, तुम्हाला काही नावे  सुचली तर नक्की कळवा ह्या जोडप्याला.

सुधीर वैद्य

२१-१२-२०१३

Advertisements

0 Responses to “२८५) आदर्श नाव”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

January 2014
M T W T F S S
« Dec   Mar »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: