९३) पैठणी / लेखक शं. ना. नवरे

Paithani - Photo2443
९३) पैठणी / लेखक शं. ना. नवरे / नवचैतन्य प्रकाशन/ दुसरी आवृत्ती १३-११-२००५ / रुपये १२५ / पृष्ठे १४३ / कथा संग्रह:

शं. ना. नवरे हे माझे आवडते लेखक आहेत. कॉलेजांत (१९६७ -१९७१) असताना, त्यांचे कथा कथनाचे कार्यक्रम मी कधीच चुकवले नाहीत.

ह्या कथा संग्रहात दीर्घ कथा आहेत. कथा संवाद रुपात उलगडत जाते. त्यामुळे आपण एखादी एकांकिका बघत आहोत असा भास होतो. प्रत्येक कथेचा बाज वेगळा आहे. कथा वाचून संपते, पण कथा संपता संपता आपल्याला धक्का देऊन जाते आणि आपली विचार धारा सुरु होते . कथेतील पात्रे  – कथानक आपल्याला प्रत्यक्ष अनुभवल्यासारखा फील येतो. त्यामुळे  दुसऱ्या कथेचे वाचन लगेच सुरु करता येत नाही. माझ्या मते लेखकाचे हेच मोठे यश आहे.

दिलासा ह्या कथेत उच्च शिक्षित आजोबा आणि त्यांचा  मुलगा – सून -नात ह्यांच्या बरोबरचे नाते संबंध छान शब्दबद्ध केले आहेत .

वीक एन्ड ह्या कथेत नवरा – बायकोतील space आणि त्यातून उद्भवणारी गंमत मांडली आहे. नवरा – बायकोच्या व्यवहारात – बोलण्यात पारदर्शकता  हवी असे अप्रत्यक्ष सुचवायला लेखक विसरत नाही.

तिघांची गोष्ट ह्या कथेमध्ये पुरुष आणि बाई ह्याच्या मनातील फरक सुरेख  रीतीने मांडला आहे. मन हे मन असते तर मग पुरुषाचे मन आणि बाईचे मन ह्यात फरक का असतो? हा फरक ज्या जोडप्याला कळतो, त्यांचा संसार सुखाचा होतो असा सुंदर विचार सहजपणे मांडला आहे.

तुमचा पुस्तकातील रस टिकून राहावा म्हणून येथेच थांबतो.  उरलेल्या कथा सुद्धा वाचनीय आहेत.

पुस्तक खरेतर एका बैठकीत वाचून होईल.

सुधीर वैद्य

०६-१२-२०१३
Advertisements

0 Responses to “९३) पैठणी / लेखक शं. ना. नवरे”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

December 2013
M T W T F S S
« Nov   Jan »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: