९२) नो प्रॉब्लेम / अंजली पेंडसे / अनुश्री प्रकाशन / पहिली आवृत्ती ०३-११-२००९ / रुपये १५० /-पृष्ठे १८३/समुपदेशन:
दोन शब्द लेखिकेबद्दल :
शिक्षण: B. Com., MSW, M.A. Clinical Psychology, HRM.
काही वर्षे बँक ऑफ इंडिया आणि पुणे विद्यापीठ येथे नोकरी.
वास्तव्य: मुंबई, पुणे, कॅनडा, अमेरिका / Clinics : मुंबई, पुणे
लेखन: पुस्तके, लेख , स्तंभ लेखन /International कंपन्यांच्या HRD सल्लागार,
अनेक कंपन्यांच्या मुलाखत समितीवर देहबोली तज्ञ म्हणून नेमणूक,
मानसिक स्वास्थ्या साठी अनेक कार्यशाळांचे आयोजन, हजारो गरजवंतांवर उपचार / २००८ साली Olympics मध्ये भाग घेणाऱ्या काही खेळाडूना मनाच्या स्वास्थ्य आणि व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण.
पुस्तकाबद्दल :
बालपण, विद्यार्थीदशा, उच्च शिक्षण, नोकरी – व्यवसाय, संसार, निवृत्ती असा आपल्या आयुष्याचा प्रवास होतो. ह्यातील प्रत्येक टप्प्यात आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो. समस्यांचे स्वरूप, तीव्रता, गांभीर्य प्रत्येक टप्प्यात जरी वेगळे असले, तरी शेवटी समस्या हि समस्याच असते. तिचा सामना करणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. अश्या वेळी समुपदेशकाची मदत घ्यावी लागते.
विद्यार्थीदशेतील समस्या व निराकरण हा ह्या पुस्तकाचा विषय आहे. प्रत्येक पाल्याचे काही तरी प्रश्न असतात – समस्या असतात. काही वेळा त्या पालकांना कळतात. त्यांच्या परीने त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्नही होतो. पण सध्याच्या काळात पालकांच्या स्वत:च्या समस्या – वेळेचा अभाव, त्यामुळे समस्या काही सुटत नाही. ज्या पाल्यावर जन्मापासून प्रेम केले ते प्रॉब्लेम child झालेले पाहून मनाला यातना होतात त्या वेगळ्याच.
शेवटचा उपाय म्हणून पाल्याला समुपदेशकाकडे जबरदस्तीने नेले जाते. मग प्रथम पालकांचीच शाळा घेतली जाते व नंतर पाल्याची. 🙂
ह्या पुस्तकात विद्यार्थ्यांच्या ४६ समस्यांबद्दल उहापोह केला आहे. प्रत्येक पालकाने वेळात वेळ काढून हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे मला वाटते. विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व कसे हे आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी पुस्तकच्या आरंभी प्रश्नावली दिली आहे.
सुधीर वैद्य
०३-१२-२०१३
Advertisements
0 Responses to “९२) नो प्रॉब्लेम / अंजली पेंडसे”