९१) तप्तपदी / व पु काळे

Tapapadi - Photo2421
९१) तप्तपदी / व पु काळे / मेहता पब्लिशिंग हाऊस / रुपये १२० /- सहावी आवृत्ती मे २००६ / पृष्ठे १६४ / कथा संग्रह :
व पु काळे यांचे लेखन मला आवडते. त्यांच्या इतर पुस्तकांपेक्षा हे वेगळ्या पठडीतील पुस्तक आहे. पुस्तकाचा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा म्हणजेच संसार, त्यातील कटुता, स्त्रीचा त्याग, पुरुषाची मानसिकता वगैरे.
पुस्तकात ७ दीर्घ कथा आहेत . ह्या कथेतील परिस्थिती – नाट्य आपल्या परिचयातील आहे . कधी ते आपल्या घरात घडले असेल, नाहीतर आपण त्याबद्दल ऐकले असेल. ह्यामुळे आपण ह्या स्त्रियांच्या प्रश्नाशी लगेच जोडले जातो.
पुस्तकातील भाषा वजनदार आहे . बरेचसे कथानक संवादातून पुढे सरकते. त्यामुळे आपल्याला नाटक बघितल्याची अनुभूती होते.
आपण झपाटल्यासारखी कथा वाचून संपवितो, पण मनात अनेक प्रश्न पिंगा घालू लागतात. संसार जर दोघांचा असेल, तर संसार वाचवण्यासाठी बरेच वेळा बायकोलाच का नमते – पडते घ्यावे लागते ? संसार टिकवण्यासाठी बायकोलाच का त्याग करावा लागतो ? पुरुषांची मानसिकता कशी आणि कधी बदलणार?
मन हे मन असते तर मग पुरुषाचे मन आणि बाईचे मन ह्यात फरक का असतो?

मनाच्या  हत्याराला माहित असूनही पकडता येत नाही आणि पकडला तरी शिक्षाही देता येत नाही, असे का ?
पुस्तकात स्त्रीच्या पडते घेण्याच्या मानसिकतेवर फारसे भाष्य नाही, तसेच हि परिस्थिती बदलण्यासाठी काय केले पाहिजे (जरी प्रत्यक्षात ते करणे एव्हडे सोपे नसले तरी ) ह्याचे मार्गदर्शन नाही. माझ्या मनाला हि रुखरुख लागली. लेखकाने आपल्या लेखनातून परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मला नेहमी वाटते.
पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.
सुधीर वैद्य
२८-११-२०१३
Advertisements

0 Responses to “९१) तप्तपदी / व पु काळे”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2013
M T W T F S S
« Oct   Dec »
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: