८७) डिसिजन्स / डॉ राजेंद्र बर्वे

Decision - Photo2390

८७) डिसिजन्स / डॉ राजेंद्र बर्वे / मनोविकास प्रकाशन / द्वितीय आवृत्ती २२-०३-२०११ / रुपये २००/- पृष्ठे २१६ / निर्णय क्षमता वाढविण्यासाठी सल्ला:

LIFE is all about the  little decisions you make everyday. You  can’t change the decisions of the past, but every new day offers opportunity to  make ‘Right’ decisions.

खरेतर आपण क्षणोक्षणी निर्णय घेत असतो. आपल्या दिनचर्येचा तो एक भाग असतो. एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया असते आणि आपल्याला कधी निर्णय घेतला गेला आणि कधी त्याची कार्यवाही झाली, हे अनेक वेळा समजत सुद्धा नाही. कोणताही निर्णय घेणे म्हणजे दोन पर्यायातून एका पर्यायाची निवड करणे.

पण ह्या जीवन प्रवासात काही प्रश्न असे असतात कि त्याचे उत्तर निव्वळ बुद्धीने – मनाने चटकन मिळत नाही.    (उ. ह. शिक्षण , नोकरी – व्यवसाय, विवाह, भीती, व्यसन ) दुसऱ्याचा सल्ला घेऊन सुद्धा निर्णय घेता येत नाही. मनात एकाकीपणाची भावना दाटून येते. अश्यावेळी आपण नेमके कसे वागले पाहिजे – कसा निर्णय घेतला पाहिजे ह्याचे  मार्गदर्शन हे पुस्तक करते. अश्या वेळी हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.

ह्यातील अनेक निर्णय  आयुष्यातील कोणत्यातरी टप्प्यावर प्रत्येकाला घ्यावे लागतात. त्यामुळे हे पुस्तक आपल्या मनाची पकड घेते. त्यावेळची आपल्या मनातील तगमग पुस्तकात शब्दरूप झालेली पाहून आपण आश्चर्य चकित होतो.

आपले आयुष्य म्हणजे असंख्य क्षणांची – घटनांची – निर्णयांची, साखळी – जाळे असते. काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण वेळ माहित नसते. आपण ह्या क्षणाना – घटनांना – निर्णयांना  कसे सामोरे जातो ह्या गोष्टीवर आपल्या आयुष्याचा डोलारा उभारलेला असतो. प्रत्येक निर्णयाच्या – घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ‘ प्रतिक्रिया ‘ ( Reaction ) देत असतो. त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते. आपल्या आयुष्यात समस्या येतात आणि जातात.

समस्येवर उपाय शोधत असाल तर प्रथम त्या समस्येचा मनापासून स्वीकार करा. ज्या क्षणी तुम्ही समस्येचा स्वीकार कराल, त्या क्षणी त्या समस्येचा तुमच्या मनावरील ताण कमी झालेला आढळेल. त्यानंतर समस्या सोडविण्यासाठी तुम्ही यशस्वी प्रयत्न करू शकाल. मन जेव्हा अस्वस्थ असेल तेव्हा मनाचे मन व्हा आणि मनाची समजूत काढा म्हणजे सर्व गोष्टी सोप्या होतात.

मित्रानो, हे पुस्तक वेळात वेळ काढून नक्की वाचा.

सुधीर वैद्य

०८-११-२०१३
Advertisements

0 Responses to “८७) डिसिजन्स / डॉ राजेंद्र बर्वे”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

November 2013
M T W T F S S
« Oct   Dec »
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: