२६७) स्पंदने आणि कवडसे – भाग ३

252) Spandane & Kavadase


स्पंदने आणि कवडसे – भाग १ वाचण्यासाठी लिंक: https://spandane.wordpress.com/2013/06/28/%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87/  


———————————————————————————————
 

स्पंदने आणि कवडसे – भाग २ वाचण्यासाठी लिंक: 

https://spandane.wordpress.com/2013/08/30/%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%AE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/
———————————————————————————————
स्पंदने आणि कवडसे – भाग ३

मित्रानो, सुप्रभात,
स्पंदने म्हणजे vibrations, मनातील कंपने. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. काही विचार मनात घर करतात. वाचताना – दुसऱ्याशी  बोलताना हि विचार धारा सुरु होते आणि काही काळ मनात हि विचारांची कंपने जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्यासारखी शब्दरूप धारण करतात. अशीच काही मनातील विचारांची कंपने आणि कवडसे भाग ३ आपल्या समोर सादर करत आहे.

==========================================================

आपल्या आयुष्यात समस्या येतात आणि जातात.

समस्या कश्या आणि कोठून येतील  हे काही वेळेला माहित असते. काही वेळेला अमुक गोष्टीमुळे समस्या येणार नाही असा आपला ठाम विश्वास असतो  आणि आपण गाफील राहतो. पण समस्या बरोबर त्याच मार्गाने येते आणि आपण अवाक होतो.

त्यामुळे जर का तुम्ही भविष्यात येऊ शकणाऱ्या समस्येचा मुकाबला कसा करायचा याची पूर्व तयारी करत असाल, तर समस्या निर्माण करणाऱ्या सर्व शक्यतांचा विचार करून व्युह रचना करा. बघा विचार करून …….

रक्षाबंधन. ……एक चिंतन रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला  राखी बांधते, त्याचे औक्षण करते. भाऊ बहिणीचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. वगैरे वगैरे …. असो . रक्षाबंधन साजरे करणाऱ्या सगळ्याच भावा – बहिणी मध्ये प्रेमाचे – जिव्हाळ्याचे संबंध असतात का?

रक्षाबंधन साजरे न करणाऱ्या सगळ्याच भावा – बहिणी मध्ये प्रेमाचे – जिव्हाळ्याचे संबंध नसतात का? मित्रानो तुम्हाला काय वाटते ? तुमचा काय अनुभव आहे ? मनाची कवाडे उघडी ठेवून उत्तर द्या. कोणाच्याही भावना दुखविण्याचा माझा हेतू नाही. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
‘ सुरक्षा ‘ ह्या शब्दाचीच ‘ सुरक्षा ‘ धोक्यात आली आहे का?
ओव्हलच्या खेळपट्टीवर केली लघुशंका. (मटा २७-०८-२०१३). सभ्यतेने जर असभ्यतेशी मैत्री केली तर दोष कोणाचा ?
 आयुष्य कसे जगायचे हे समजून घेतो तो खरा सुखी.


कसं जगायचे? शरीरावर, स्वत:वर प्रेम करायला हवं. मन आणि देह प्रसन्न राहायला पाहिजेत. Enjoyment म्हणजे वर्तमानात सुखी राहायला पाहिजे. कालच्या कटू आठवणी नकोत व उद्याची चिंता नको. मनाच्या शक्तीच्या माध्यमातून विविध गोष्टींवर नियंत्रण करण्याची शक्ती प्राप्त होते. त्यासाठी तपश्चर्या हवी. समतोल साधण्याची शक्ती हवी. आलेल्या स्थितीला हसतमुखाने स्वीकारा. तणाव निर्माण करू नका. अंधाराचा सुद्धा आनंद घेता येतो. ते तंत्र यायला हवे. मनाची साधना – समृद्धता साधावी लागते. सगळ्याच गोष्टीत adjust करण्याची शिकवण मनाला यायला हवी. मी मध्ये एकटे राहू नये. बायको, मुले, नातेवाईक , समाज आहे हे विसरू नये. मग बुद्धी विवेकाने काम करू लागते. मनाला प्रसन्न ठेवायला हवे. विघ्नकर्ता फक्त मार्ग दाखवितो.

~~~~ संग्रहित.माणसाने जीवनात कितीही उंची गाठली पैशाने असो,प्रसिद्धीने असो,कर्तृत्वाने असो …. पण जर आचरणात सुद्धा साधेपणा,नम्रपणा ठेवला तर त्या उंचीचा मान समाजात नक्कीच अधिक वाढतो.  स्त्री हि खरेतर पुरुषा पेक्षा जास्त काटक  असते. स्त्री हि व्यवस्थापन गुरु असते. पण हि वस्तुस्थिती पुरुष मान्य करत नाहीत,  हे दुर्भाग्य आहे.

आपल्या आयुष्यात अनेक कठीण वळणे येतात. हि कठीण वळणे कशी पार करायची, हे  झाडाकडून आणि पाण्याकडून शिकण्यासारखे आहे .

दिसणे आणि असणे ह्यातील नेमका फरक जेव्हा माणसाला कळेल तो सुदिन.
मन स्वच्छ ठेवले तर समाजातील अनेक समस्या आपोआप सुटतील. 

घर लहान असले तरी मोठे मन हि उणीव भरून काढू शकते.

काही दिवसापूर्वी मी समस्येचे निराकरण ह्या बद्दल काही टिप्स दिल्या होत्या. त्यानंतर एका फेसबुक मैत्रिणीने मला message पाठविला कि सर, जर समस्या हीच समस्या असेल तर काय ? मी जे तिला उत्तर दिले ते तुमच्या माहितीसाठी देत आहे .
” जर समस्या हीच समस्या असेल तर काय ? … तूच समस्येची समस्या हो.  जर कोणी माणूस तुझ्या समस्येचे कारण असेल तर तू सुद्धा त्याच्या समस्येला कारणीभूत असू शकतेस, ह्याचे भान ठेव. ” मित्रानो, तुम्हाला काय वाटते .

खरेतर नवरा -बायकोनी  माप ओलांडून गृहप्रवेश केला पाहिजे, कारण कुटुंबाचे सुख , शांती आणि मर्यादा सांभाळण्याची  जबाबदारी दोघांची आहे . आयुष्य म्हणजे सुख आणि दु:खाचे कापड आहे . आपले  कापड थोडे मळकट रंगाचे आहे इतकेच.  जे मिळाले आहे त्यावर प्रेम करणे म्हणजेच सुखी जीवन . आयुष्यात प्रत्येकाला समस्या असतात. काही समस्या सांगता येतात तर काही सांगता येत नाहीत.

कमी शिक्षण – गरिबी हा काही गुन्हा नाही. जन्म आपल्या हातात नसतो पण जगणे नक्कीच आपल्या हातात असते .

शितावरून भाताची परीक्षा करता येते. नाते संबंधात अशी परीक्षा घेतली तरी आपले मन सहजासहजी अप्रिय निर्णय असला तर मानायला तयार होत  होत नाही हा खरा प्रश्न आहे .

माणसाचे आयुष्य म्हणजे सुख आणि दु:ख यांचा  झोका असतो. मन ह्या झोक्यावर मनसोक्त बागडत असते.

यशाचे मोजमाप हे माणूस  कोठे पोचला ह्या वरून ठरविले जाते. पण त्याचबरोबर मुल्यमापन करताना हा प्रवास कोठून सुरु झाला हे विचारात घेणे ही महत्वाचे असते.

तुम्ही स्वत:ला सामान्य स्त्री का समजता ? मी साधी गृहिणी आहे असे तुम्ही म्हणता. खरेतर साधी गृहिणी होणे हे खूप कठीण असते. कोणतीही स्त्री हि आद्य  management गुरु असते.मरण ह्या शब्दाला माणूस घाबरतो. माझ्या मते मरणा सारखी सुंदर गोष्ट नाही. आयुष्यातील अंतिम सत्य आहे. असो.

मरणाने अनेक समस्या सुटण्यास मदत होते / किवा त्या समस्या सुटतात. परंतु काही वेळा अनेक समस्या तात्पुरत्या जन्म घेतात.

संवेदनशीलता माणसाबरोबर जन्म घेते  आणि त्याच्याच बरोबर नाहीशी होते असे मला वाटते.

आपले आयुष्य म्हणजे  पानावरच्या पाण्याच्या थेंबासारखे आहे.


सुधीर वैद्य
08-09-2013

 

 

 

Advertisements

0 Responses to “२६७) स्पंदने आणि कवडसे – भाग ३”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

November 2013
M T W T F S S
« Oct   Dec »
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: