२७४) कौतुक:

 

 

274) Photo2151

 

२७४) कौतुक:

काही दिवसांपूर्वीची हि गोष्ट आहे. मी दिवाळीपूर्वीच मित्र – आप्तांकडे भेट देतो. ह्याचा फायदा असा  असतो कि दिवाळीचा फराळ फारसा खावा लागत नाही. नुकताच एका  मित्राकडे जाऊन आलो. चहा – ताज्या चकलीचा आस्वाद घेतला आणि गप्पांची मस्त मैफिल जमली. मित्राचा मुलगा – सून सुद्धा गप्पात सामील झाले. मित्राचा नातू खूप चळवळ्या आहे .इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ६ वीत आहे.  गप्पा त्याच्यापासूनच सुरु झाल्या.

नुकतीच त्याची परीक्षा पार पडली होती.  Result सुद्धा लागला होता. ग्रेड घसरली होती. कारण नेहमीचेच — धांदरटपणा. लक्ष देवून प्रश्न पत्रिका न सोडविण्याचा परिणाम होता. त्याच्या बद्दलची हि तक्रार लहानपणापासूनची आहे. Concentration – एकाग्रता कमी. अनेक वेळा त्याला meditation ची आवश्यकता आहे  असे मी सांगून बघितले.

सून म्हणाली कि त्याला समज चांगली आहे . विषयाचे ज्ञान त्याला आहे पण गडबड्या स्वभावामुळे परीक्षेत कमी मार्क मिळतात. मी म्हणालो कि आपल्या शिक्षण पद्धतीत ज्ञानाची कसोटी ही मिळवलेल्या मार्कांवर अवलंबून असते. विषय किती चांगला कळला आहे, त्याचे वेगळे प्रमाणपत्रक मिळत नाही.

मग विषय निघाला कि नातू किती बोलघेवडा आहे . तो कसा अनोळखी माणसाशी सुद्धा सहज संवाद साधू शकतो वगैरे. त्याने नुकतेच २० रुपये कसे मिळविले त्याची गोष्ट सुरु झाली. त्याने व त्याच्या मित्राने घरातील अतिरिक्त खेळण्यांचा Tower च्या आवारात stall लावला व खेळणी विकली. त्याच्या salesmanship चे कौतुकही काही रहिवाश्यांनी सुनेकडे केले.

त्या कोणालाच ह्या प्रकारात काही नाव ठेवण्यासारखे आहे असे वाटले नाही. मी मात्र थोडा अस्वस्थ झालो. मी  म्हणालो कि मोठेपणी हा चांगला Sales Manager होईल. सून चटकन म्हणाली हि Sales Manager नाही Marketing Manager होईल . मी हसलो व म्हणालो कि जाऊदे. ह्या शब्दांचा उहापोह करण्यासाठी वेगळा लेख लिहावा लागेल.

मी सुद्धा नातवाचे कौतुक केले पण घरातील मंडळीना बजावले कि त्याचे हे बोलण्याचे कौशल्य चांगले आहे पण घरातील कोणती वस्तू  विकायला घेवून जात आहे हे त्याने आईला सांगायला हवे होते पण ह्या business ची सवयही मोडून काढली पाहिजे, कारण पुढे भविष्यात एक नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतो ह्याचे भान ठेवा म्हणजे झाले. माझ्या मित्राने मान हलवून मुद्दा पटल्याची पावती दिली.

मित्रानो,  तुम्हाला कळला का पुढील धोका?

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि प्रत्येक कौतुकात भविष्यातील  समस्या दडलेली असू शकते ह्याचे भान सुटता कामा नये. त्याच वेळी काही समस्या कमी कौतुक किंवा कौतुक न केल्यामुळे निर्माण होत असतात.

सुधीर वैद्य
०३-११-२०१३
Advertisements

0 Responses to “२७४) कौतुक:”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2013
M T W T F S S
« Oct   Dec »
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: