२७३) संभाषणाचे मापदंड – सत्य , चांगले , उपयोगी

२७३) संभाषणाचे मापदंड – सत्य , चांगले , उपयोगी
संवाद:

संवादाशिवाय माणूसाचे जगणे सुसह्य नसते.  त्याचा मनाशी संवाद सतत सुरु असतो, पण जगाशी संवाद साधल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. मनातील भावनांचा निचरा कुटुंबात झाला नाही, तर तो मित्र जवळ करतो. फेसबुकने तर संवाद साधायची खूप मोठी सोय केली आहे. प्रश्न असा आहे कि आपण एकमेकांशी का बोलतो.? ह्याचा काही काळापूर्वी मी खूप विचार केला व मला जे काही सुचले ते शब्दबद्ध केले.

आपण एकमेकांशी का बोलतो?

गेल्या काही दिवसात अश्या घटना अनुभवल्या कि मला ह्या प्रश्नाचा मागोवा घ्यावा लागला. इतरही अनेक प्रश्न आहेत जसे कि आपण एकमेकांशी काय बोलतो? आपण न बोलता राहू शकतो का? (निदान काही तास, दिवस.) अर्थात बोलणे म्हणजे नक्की काय हा  प्रश्न कधी तरी तपासून पहावा लागेल. असो.

माझ्या मनात आपण एकमेकांशी का बोलतो ह्याची बरीच कारणे घोळू लागली. (Not necessarily in the order of importance)

१)  आपल्या कडील माहिती दुसऱ्याला सांगण्या साठी. ह्यातही प्रकार आहेत. —दुसऱ्याने विचारल्यानंतर आणि दुसऱ्यांनी न विचारता. अशा संभाषणात बरेच उद्देश असू शकतात. उ.हा. आपण किती शहाणे आहोत, श्रीमंत आहोत, भाव खाण्यासाठी, आपले कौतुक करून घेण्यासाठी, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी.

२)  तिसऱ्या माणसाच्या बद्दल चांगले – वाईट बोलण्यासाठी. बरेच वेळा वाईटच. (Gossip) बरेच वेळा तिसऱ्या माणसाबद्दल बोलले जाते. बऱ्याच वेळा ह्याचे प्रमाण अति असते. हे टाळले पाहिजे. विपश्यना तरी होईल.

३)  Office  त कामाच्या माहितीची देवाण घेवाण करावीच  लागते.

४) आदेश देण्यासाठी. (Military, Crisis management, ऑफिस  & even  in  family etc.)

५) शिक्षण क्षेत्रात बोलण्या वाचून पर्याय नाही.

६)  दुसऱ्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठी. (कुटुंबात, समाजात वगैरे)

७)  कुटुंबात एकमेकांचे प्रश्न सोडविण्यासाठी. कुटुंबात आज किती प्रमाणात संभाषण होते हा संशोधनाचा विषय आहे. आई-वडिलांचे बोलणे  मुला -सुनेला पटत नाही. बरेच वेळा तुम्ही जुन्या पिढीचे म्हणून बोलण्या आधीच बोळवण केली जाते. बोलण्याची वेळ येते कारण तरुण पिढी स्वत:चे प्रश्न सोडवू शकत नाही व त्याचा त्रास म्हाताऱ्या माणसाना होतो.

८)  दुसऱ्या माणसाला सल्ला देण्यासाठी. हे सल्लागाराचे  कामच आहे. पण आपण सर्व जण एकमेकांना सल्ला देता असतो. काही वेळा स्थळ – काळाचे भानहि राहत नाही. सल्ला देण्यासाठी आपल्याकडे शिक्षण, अनुभव आहे का हे हि लक्षात घेतले जात नाही. प्रथम स्वत:ला प्रश्न कर्त्याच्या जागी कल्पून मगच सल्ला द्या.

९) आपल्याला एकटेपणा सहन होत नाही म्हणून. माणूस खरे तर एकटाच असतो. चार माणसात राहूनही माणूस एकटाच असतो. वृद्धांची तर हि खास समस्या आहे. मग ते नातवंडांशी, नोकर मंडळींशी, पाळीव प्राण्याबरोबर, पोस्टमनशी वगैरे संभाषण साधतात.

१०)  एखाद्या समान आवडीच्या विषयाने झपाटलो असता. हा  अनुभव cricket  match, युद्ध, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती, अपघात वगैरे.

११)  दुसऱ्याला जाणून घेण्यासाठी. (पती – पत्नीचे संभाषण) लग्नापूर्वी होणाऱ्या पती – पत्नीने एकमेकाला जाणून घेण्यासाठी बोलले पाहिजे. हल्लीची मुले -मुली बोलतात, पण quality talk होते का? हे तपासून घेतले पाहिजे. आवडी -निवडी, अपेक्षा, assumptions वर चर्चा अपेक्षित आहे. माझ्या सल्लागाराच्या अनुभवावरून प्रेम विवाहात तर फारच कमी quality talk  होते. अधिक माहिती साठी माझ्या website ला भेट द्या. (www.spandane.com)

१२)  चर्चा सत्र (कोणत्याही विषयावर)

१३)  चांभार चौकशा करणे.

खरेतर हि यादी कितीही लांबू शकेल. ……………………………………..

काही लोक विपश्यना करण्यासाठी इगतपुरीला जातात. काही दिवस ते एक महिना एकमेकांशी न बोलता राहतात. मग परत बोलायला मोकळे.  अर्थात विपश्यनेचे फायदे आहेत. पण त्यासाठी इतरही उपाय आहेत. दिवसातील काही ठराविक काळ न बोलणे. दुसऱ्याचे वाईट न बोलणे,   स्वत: विषयी कमीत कमी बोलणे. माणसाच्या पाठीमागे न बोलणे. Gossip टाळणे. न बोलण्यातून आपल्या भावना दुसऱ्याला चांगल्या व प्रभावीपणे समजतात. एकदा सांगितल्या नंतर हा प्रयोग करून बघा. माझा अनुभव ह्या बाबतीत  चांगला आहे. विचारल्यानंतरच एखाद्या विषयावर मत प्रदर्शन करणे व योग्य (श्रेय) सल्ला देणे.

संभाषणाचे मापदंड – सत्य , चांगले , उपयोगी:

ह्या विवेचनानंतर संभाषणाचे मापदंड पाळले जातात का हे पाहणे महत्वाचे  आहे. माझा अनुभव असा आहे कि हे मापदंड पाळले जात नाहीत. किंबहुना हे मापदंड कोणते  आहेत हे सुद्धा अनेकांना माहित नसेल.
संभाषणाचे मापदंड म्हणजे – सत्य, चांगले, उपयोगी. माझ्या मते ह्या तीनही कसोटीवर प्रत्येक संभाषण उतरेल असे नाही.

बरेच वेळा आपण स्वत:विषयी बोलतो किवा जो माणूस त्या ठिकाणी हजर नाही त्याच्या संदर्भात बोलतो. अश्यावेळी आपण अनेक वेळा ऐकीव माहितीच्या आधारे बोलत असतो . हि माहिती आपण प्रत्यक्ष ऐकलेली नसते  किवा त्या माहितीची आपण खातरजमा केलेली नसते. पण आपण मात्र बेधडकपणे बोलून मोकळे  होतो. मित्रानो तुमच्या लक्षात आलेच असेल कि आपण सांगत असलेली माहिती सत्य आहे का हे मनाशी तपासून मगच बोलले पाहिजे. आपण माणसाच्या पाठीमागे न बोलण्याचा व Gossip टाळण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे.
आपण दुसऱ्या माणसाबद्दल जे बोलतो ते चांगले आहे का हे सुद्धा महत्वाचे आहे. अर्थात काहीवेळा हि माहिती चांगली नसेल तरी संस्थेच्या – कुटुंबाच्या हितासाठी बोलली पाहिजे. एकमेकांना सांगितली पाहिजे.
आपण सांगत असलेली माहिती समोरच्या माणसासाठी उपयुक्त आहे का हे सुद्धा महत्वाचे आहे. आपण एकमेकांशी का बोलतो ह्याच्या जंत्री वरून लक्षात येईल कि अनेक वेळा आपले बोलणे हे समोरच्या व्यक्तीसाठी उपयुक्त असतेच असे नाही. असे बोलणे टाळले पाहिजे.
मित्रानो, तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव ऐकायला मला आवडेल.

सुधीर वैद्य

१०-१०-२०१३

Advertisements

0 Responses to “२७३) संभाषणाचे मापदंड – सत्य , चांगले , उपयोगी”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

November 2013
M T W T F S S
« Oct   Dec »
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: