८४) अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम

Ravan - Ram - Photo2321

 

८४) अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम / मूळ गुजराती लेखक दिनकर जोषी / अनुवाद सुषमा शाळीग्राम / मेहता पब्लिशिंग हाउस / ऑक्टोबर २०११ / रुपये १२० / पृष्ठे १२६ / कादंबरी:

दोन शब्द लेखकाबद्दल :

दिनकर जोषी / जन्म १९३७.
देना बँकेच्या staff Training College चे Principal म्हणून निवृत. १९५४ पासून त्यांनी लिखाणास प्रारंभ केला. आतापर्यंत त्यांची १४७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे या महान ग्रंथांचा अभ्यास करून त्यावर आधुनिक संदर्भात त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचे १० भाषात अनुवाद झाले आहेत. एकच वेळी ११ पुस्तके ६ भाषांमध्ये प्रकाशित होण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे.

पुस्तकाचा विषय:

रामायण – महाभारतातील गोष्टी ऐकून आपण सर्व जण  मोठे होतो. ह्या सर्व गोष्टी आपण  आजी – आई – मामाकडून ऐकलेल्या असतात. आपल्या बालमनाने त्या स्वीकारलेल्या असतात. काळाच्या ओघात आपण मोठे झाल्यानंतर ह्या गोष्टीतील आपल्या शिक्षित बुद्धीला न पटलेला भाग मनात डोकावतो. आपण काही वेळा विचार करतो, सम विचारी मित्रांशी चर्चा करतो आणि तो विषय संपतो .

परंतु लेखकाने ह्या ग्रंथांकडे डोळसपणे  बघायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. स्वत:चे विचार उपलब्ध माहितीच्या आधाराने तर्काच्या कसोटीवर तपासून आपल्या पुढे मांडले आहेत. कोणाच्या भावना दुखावण्याचा लेखकाचा हेतू नाही. तसेच लिखाणात मी म्हणतो तेच खरे असा अविर्भावहि नाही.

पुस्तकाच्या शीर्षकावरून आपल्याला अंदाज येतो कि हे पुस्तक नक्की चाकोरीबाहेरील आहे. पुस्तकाला वैचारिक बैठक आहे.

प्रत्येक माणसात गुण आणि अवगुण कमी अधिक प्रमाणात असतात. परंतु आपण मात्र ह्या ग्रंथातील पात्रांची चांगली  – वाईट, चूक – बरोबर, नायक – खलनायक अशी वर्गवारी करून मोकळे होतो. आपल्यासाठी असे करणे सोयीचे असते. त्यामुळे आपण ह्या पात्रांच्याकडे ह्याच संकुचित दृष्टीकोनातून बघतो. असे करणे हे दुसऱ्या पात्रावर अन्याकारक असते हे आपल्या ध्यानातही येत नाही. अश्या  विचारसरणीला लेखकाने छेद दिला आहेत .

मोकळ्या मनाने हि कादंबरी वाचली तर त्यातील विचार आपल्याला विचार करायला नक्की प्रवृत्त करतात. याचा दुसरा फायदा म्हणजे व्यवहारात आपली विचारांची दिशा कशी असली पाहिजे ह्याचे शिक्षणसुद्धा होते.

कादंबरीचा font चांगला आहे. कादंबरी एका बैठकीत सहज वाचून होते. असे वैचारिक पुस्तक लिहिल्याबद्दल – प्रकाशित केल्याबद्दल लेखकाचे आणि प्रकाशकाचे आभार.
मित्रानो, वेळात वेळ काढून हि कादंबरी नक्की वाचा. तुमचा वेळ सार्थकी लागेल ह्याची खात्री मी देतो.
सुधीर वैद्य
१६-१०-२०१३
Advertisements

0 Responses to “८४) अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2013
M T W T F S S
« Oct   Dec »
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: