२५८) स्पंदने आणि कवडसे – भाग २
मित्रानो, सुप्रभात,
स्पंदने म्हणजे vibrations मनातील कंपने. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. काही विचार मनात घर करतात. वाचताना – दुसऱ्याशी बोलताना हि विचार धारा सुरु होते आणि काही काळ हि विचारांची कंपने मनात जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्यासारखी शब्दरूप धारण करतात. अशीच काही मनातील विचारांची कंपने आणि कवडसे भाग २ आपल्या समोर सादर करत आहे.
======================================================
आयुष्यात मानसिक शांती हवी असेल तर नाही ऐकायची आणि नाही म्हणण्याची सवय केली पाहिजे .
======================================================
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, मी काय करू शकतो, मी काय करणार, किती – कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की हवे.
======================================================
बरेच वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.
======================================================
आपल्या चिंता कमी होण्यासाठी माणूस देवळात जातो पण देवावर पूर्ण विश्वास नसल्यामुळे बाहेर काढलेल्या चपला बुटांची चिंता मनात बाळगत दर्शन घेत राहतो.
======================================================
सुखी वैवाहिक जीवनासाठी त्याग करायची तयारी आहे का ? असल्यास किती ह्याची सीमा रेषा आखा आणि त्याग करण्याची सवय अंगी बाणवा. त्यानंतरच लग्नाचा विचार करा.
======================================================
प्रत्येक प्रेम विवाह यशस्वी होत नाही कारण निर्णय बरेच वेळा फक्त चांगल्या बाजूचा विचार करून, बेनिफिट ऑफ doubt देवून घेतलेला असतो. प्रेम जरी आंधळे असले तरी लग्नाचा निर्णय घेताना बुद्धी आंधळी होणार नाही ह्याची काळजी जरूर घ्या.
======================================================
जोडीदाराला गुण आणि दोषांसकट स्वीकारले तरच वैवाहिक आयुष्य सुखाचे जाते. अर्थात काही दोष स्वीकारण्याच्या पलीकडचे असतात हे मान्य करावेच लागेल.
======================================================
समस्येवर उपाय शोधत असाल तर प्रथम त्या समस्येचा मनापासून स्वीकार करा. ज्या क्षणी तुम्ही समस्येचा स्वीकार कराल, त्या क्षणी त्या समस्येचा तुमच्या मनावरील ताण कमी झालेला आढळेल. त्यानंतर समस्या सोडविण्यासाठी तुम्ही यशस्वी प्रयत्न करू शकाल.
======================================================
मित्राच्या मुलाने खूप वर्षापूर्वी विचालेल्या एका प्रश्नाची आज मला आठवण झाली. एक दिवस रमेश घावत येउन म्हणाला कि काका मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. बँक ऑफिसर म्हणून माझा बाबा मोठा कि CA म्हणून तुम्ही मोठे?
मी क्षणभर चक्रावलो. चटकन मी उत्तर दिले कि वयाने तर तुझा बाबा माझ्यापेक्षा मोठा आहे. आम्ही दोघेही मोठे आहोत. प्रत्येक माणूस एकाच वेळेला मोठाही असतो आणि लहानही असतो. त्याच्यासाठी हि वर्गवारी खरीही असते.
पण जेव्हा ह्या मोठेपणाचा उपयोग इतरांना होतो किवा लहानपणाचा त्रास होतो, तेव्हा हा समाजच तुम्ही लहान कि मोठे हे ठरवत असतो.
रमेशने जेव्हडा कठीण प्रश्न विचारला होता तेव्हडेच माझे उत्तरही समजणे त्याच्यासाठी कठीण होते. एक छानसे smile देऊन तो खेळायला पळाला.
======================================================
आपल्या हातून चांगल्या गोष्टीच घडतील असा आपण आग्रह धरला पाहिजे. मग लोकानी ती गोष्ट वाईट ठरवली तरी हरकत नाही.
======================================================
काही वेळा हरण्यात सुद्धा मजा असते. सतत जिंकण्याचा सवयीने कालांतराने मनावर ताण येतो. त्यामुळे काही वेळा झालेली हार किवा मनासारखे न मिळालेले यश सुद्धा enjoy करा. जेव्हा तुम्ही जिंकत होतात तेव्हा कोणीतरी हरत होतेच किवा नंबर २ वर होते. !!!!!!! बघा विचार करून. !!!!!!
======================================================
किती बरं वाटतं जेव्हा……..जवळच माणुस भेटतं !.
आणि मनाला उभारी आणतं !!!!!!
आणि काळाचे अंतर पुसून टाकत !!!!!
किती बरं वाटतं जेव्हा……..जवळच माणुस भेटतं !.
पण थोड्याच वेळात भेटलं नसतं ……. तर बर झालं असतं असं वाटत.
मनावरील खपली काढून आपल्याला अस्वस्थ करून जात.
किती बरं वाटतं जेव्हा……..जवळच माणुस भेटतं !.
======================================================
अहंकार हा माणसाचा मोठा शत्रू आहे. अभिमान आणि अहंकार ह्यातील सीमारेषा खूप धुसर आहे. माणसाला अहंकार वाटू लागला कि समोरची व्यक्ती, परिस्थिती आणि वस्तू यांचे आकलन करण्याची शक्ती धुसर होते. निर्णय चुकतात, पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.
ह्या सगळ्याची सुरवात मिळालेले यश न पचवता आल्यामुळे होते. प्रथम ह्या यशाचा अभिमान वाटू लागतो. कालांतराने अभिमानाची जागा अहंकार घेतो. त्यामुळे यश पचवायला शिका म्हणजे अहंकाराचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
======================================================
ग्राहकसेवा
काही दिवसापूर्वी मनसोक्त पाऊस बरसत होता. सकाळी पाऊस थोडा कमी होता म्हणून नेहमीप्रमाणे बाहेर पडलो. धनादेश भरण्यासाठी बँकेत गेलो. शाखाधिकारी मला म्हणाला कि वैद्य सर आज एव्हडा पाऊस असताना कसे काय बाहेर पडलात ? मी हसून म्हणालो कि साहेब एव्हडा पाऊसअसताना सुद्धा तुम्ही आणि तुमचे सहकारी घरातून लवकर निघून ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून बँकेत आला आहात, आणि आम्ही गावातल्या गावात पाऊस आहे म्हणून घरी बसणे बरोबर नाही. तुम्ही घेतलेल्या त्रासाला सलाम करण्यासाठीच मी आज आलो आहे. धनादेश काय उद्याही भरता आला असता.
मित्रानो, पावसामुळे काही कर्मचारी रजाही घेऊ शकेल असते. पण पावसाचा, वाहतुकीचा त्रास सहन करत हि मंडळी बँकेत ग्राहकांना सेवा मिळावी म्हणून आपलेपणाने कामावर आली होती. जे दुसऱ्याबद्दल विचार करून कर्तव्यात कसूर करत नाहीत असे सेवाकर्मी कौतुकास नक्कीच पात्र असतात. अश्यावेळी आपणही खुल्या दिलाने त्यांचे कौतुक केले पाहिजे . मित्रानो, तुम्हाला काय वाटते?
======================================================
पाठीचा कणा ताठ असणारी माणसे दीर्घायुषी असतात असे पर्यायी वैद्यक शास्त्राचा अभ्यास करताना वाचले आहे. मनात एक शंका आली कि पाठीचा कणा खरेच सर्वार्थाने ताठ असतो का? पाठीचा कणा वाकलेल्या माणसाचा कणाही ताठ असू शकतो ह्यावर तुम्ही विश्वास ठेवाल का ?
माझी शंका तुम्हाला बुचकळ्यात टाकणारी आहे हे निश्चित. मित्रानो विचार करून बघा नाहीतर माझ्या लेखाची वाट बघा. सुप्रभात आणि शुभदिन.
======================================================
बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शारीरिक बालपण सर्वांचेच संपते. पण मनातील बालपण आणि निरागसता हरवणार नाही हि काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.
======================================================
आपले आयुष्य म्हणजे जन्मापासून – मृत्यू पर्यंत येणाऱ्या अनेक क्षणांचे एक जाळे असते. हे क्षण आनंदाचे, सुखाचे, दुःखाचे, समाधानाचे, यशाचे, अपयशाचे, इच्छापूर्तीचे, अपेक्षापूर्तीचे, समस्येचे, काळजीचे, हुरहुरीचे, प्रेमाचे, रागाचे, अहंकाराचे, वेदनेचे …. ……असतात . (हि यादी कितीही लांबू शकेल…………………… )
आपले आयुष्य म्हणजे अश्या असंख्य क्षणांची – घटनांची, साखळी – जाळे असते. काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण वेळ माहित नसते. आपण ह्या क्षणाना – घटनांना कसे सामोरे जातो ह्या गोष्टीवर आपल्या आयुष्याचा डोलारा उभारलेला असतो प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ‘ प्रतिक्रिया ‘ ( Reaction ) देत असतो. त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते.
मित्रानो, बघा विचार करून
======================================================
संवेदनशीलता माणसाबरोबर जन्म घेते आणि त्याच्याच बरोबर नाहीशी होते असे मला वाटते.
======================================================
आपले आयुष्य म्हणजे पानावरच्या पाण्याच्या थेंबासारखे आहे.
======================================================
सुधीर वैद्य
१२-०८-२०१३
0 Responses to “२५८) स्पंदने आणि कवडसे – भाग २”