२५७) नागपंचमी – ११-०८-२०१३, रविवार

257) Nag-1

 

२५७) नागपंचमी – ११-०८-२०१३, रविवार

सर्वाना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

आमच्या परिसरात नागाचे एक मंदिर होते. काही वर्षापूर्वी मंदिरामागील वृक्ष सुसाट्याचा वारा  येत असताना थोडा उन्मळला आणि मंदिरावर विसावला. मंदिराचे नुकसान झाले. त्यानंतर ते मंदिर नव्याने बांधण्यात आले. सकाळी यथासांग पूजा अर्चा केली जाते. भाविकही नियमितपणे दर्शनाला येतात. आरती करतात. आज नागपंचमी असल्यामुळे खूप गर्दी होईल.

त्या देवळासमोरून जाताना माझ्या मनात  एक विचार येतो कि जर का खरा नाग भक्तांना दर्शन देण्यास मंदिरात अवतरला तर काय होईल ?  भाविकांची काय प्रतिक्रिया असेल ? कृपया माझ्याबद्दल गैरसमजूत करून घेऊ नका . मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत. मनातील विचार फक्त ह्या पोस्टमध्ये मांडला आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

नाग – साप स्वत:हून हल्ला करत नाही, तर स्वत:चे रक्षण करण्यासाठी फणा काढतो. आपल्या इतकाच तोही घाबरलेला असण्याची शक्यता आहे.

जगात नाग चावून माणसे फार कमी मरतात ….पण नाग चावलाय ह्या भीतीनेच मरणारी लोकं जास्त आहेत..
~~~~~ आणि माणसाच्या विषारी बोलण्याने मात्र बरीच दुखावली जातात.

नागाचे मुख्य खाणे म्हणजे उंदीर. पिकाचे रक्षण करून शेतकऱ्यांना तो मदत  करतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी त्याची पूजा केली जाते.  आपला धर्म सर्व समावेशक आहे.  तो सर्व प्राणी – मात्रांवर, निसर्गावर प्रेम करा अशी शिकवण आपल्याला देतो. निदान एक दिवस त्याची आठवण आपल्याला होते यातच समाधान मानायची वेळ आली आहे . 😦

नागाबद्दलची शास्त्रीय माहिती उपलब्ध असूनही त्याला दुध पाजले जाते. सापाला – नागाला स्मरणशक्ती नसते तरी तो डूख धरतो अशी सुद्धा समजूत आहे. आज खरेतर नागाची -सापाची शास्त्रीय माहिती शोधून वाचली पाहिजे. पुराणातील माहिती आणि शास्त्रीय माहिती ह्याची सांगड घातली पाहिजे. सर्वच साप विषारी नसतात. आपल्या शहरात snake park असेल तर त्याला भेट दिली पाहिजे. अनेक वर्षांपूर्वी मद्रास आणि पुणे येथील snake park ला माझ्या प्रत्येक ऑफिस ट्रीपच्या वेळेस मी भेट देत असे, ह्याची आठवण झाली.

आजही मला बालपणी आईने पाटावर चंदनाने  काढलेली नागीण आणि तिची पिल्ले ह्यांचे चित्र आठवते. आई त्या चित्राची मनोभावे पूजा करायची.

आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा, सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो….

सुधीर वैद्य

११-०८-२०१३

Advertisements

0 Responses to “२५७) नागपंचमी – ११-०८-२०१३, रविवार”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

August 2013
M T W T F S S
« Jul   Oct »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: