८१) परत मायभूमीकडे / डॉ. संग्राम पाटील

Parat Maybhumikade-Photo2106

८१) परत मायभूमीकडे / डॉ. संग्राम पाटील / समकालीन प्रकाशन / पहिली आवृत्ती ०६-०३-२०११ / रुपये १२५/ पृष्ठे १०७ / आत्मकथन

हे पुस्तक म्हणजे एका तरुण डॉक्टर दांपत्याच्या  वेगळ्या प्रवासाची सत्यकथा –  आत्मकथा आहे. आज ह्या डॉक्टरचे वय अंदाजे ३५ वर्षे आहे. म्हणजे हा आत्मकथेचा भाग १ असेच समजावे लागेल. डॉक्टरांचे नाव पाटील असले तरी ते राजपूत आहेत.

हि गोष्ट एका तरुणाची  आहे. त्याचा जन्म खेड्यात झाला, तिथेच  तो लहानाचा मोठा झाला. त्याने बालपणाचा पुरेपूर आनंद घेतला. पण त्याच वेळी मनाने मात्र अनेक गोष्टी टिपल्या.  (गावातील दारिद्र्य, साथीचे आजार, रोगराई, पाण्याचे दुर्भिक्ष, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वैद्यकीय सेवा उपलब्ध नसणे, जात-पात, गावातील घाण, शिक्षणाची सोय नसणे वगैरे ) ह्या सर्वांचा त्याचा  कोवळ्या मनावर खोलवर परिणाम झाला. अडचणींचा सामना करत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले. त्याने डॉक्टर व्हावे असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते.

वैद्यकीय शिक्षण घेताना लेखक  नुपूरच्या प्रेमात पडतो.  नुपूर सुद्धा डॉक्टर झाल्यानंतर ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्याचे स्वप्न गोंजारत असते.  दोघांची स्वप्ने सारखीच असल्यामुळे त्यांची मने कधी जुळतात हे त्यांचा कळत नाही. लेखकाच्या आई -वडिलांना जातीबाहेरील हे लग्न मान्य नसते. लेखकाला जाती बाहेर काढण्यात येते. पण नुपुरचे आई-वडील त्यांना पूर्ण पाठींबा देतात. ते मुलीच्या मनाचा विचार करणारे असतात, त्यामुळे त्यांचा विरोध नसतो . डॉक्टर झाल्यानंतर ते  विवाह करतात.

पुढे उच्च शिक्षणासाठी दोघेही UK ला जातात.  नुपूर डोळ्यांची डॉक्टर होते. तर संग्राम अतिदक्षता आणि भूल तज्ञ म्हणून शिक्षण घेतो. तेथील हॉस्पिटल मध्ये इमाने इतबारे काम करून अनुभव घेतात, शिक्षणासाठी घेतलेली कर्जे फेडतात. ह्या दरम्यान त्यांना २  मुलगे होतात .

UK  चा पासपोर्ट मिळण्याची शक्यता  असते. अश्या वेळी त्यांच्या मनात सदैव घोळत असलेली स्वप्ने त्यांना बचैन करतात. वैद्यकीय कॉलेजमध्ये असताना डॉ  अभय बंग ह्यांचे ऐकलेले भाषण त्यांना आठवते. UK चा पासपोर्ट  न स्वीकारता, ते भारतात परत येण्याचा निर्णय घेतात. पासपोर्ट मिळण्यासाठी ‘ Long Live the Queen ‘ हे राष्ट्रगीत म्हणायची त्यांची तयारी नसते. ते भारतात परतल्यानंतर एप्रिल २००९ मध्ये डॉ  अभय बंग ह्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेतात व एरंडोल  येथे कार्य सुरु करतात. (एरंडोल परिसर हा खानदेश मधील एक अविकसित भाग आहे )

ह्या  सामाजिक कामात लेखकाचा भाऊ डॉ राहुल आणि त्याची बायको डॉ  स्नेहल ह्यांची त्यांना साथ मिळते. पहिल्या दिवसापासून लोकांचा प्रचंड पाठींबा मिळतो. लेखक त्या भागात शाळा सुद्धा  काढतो.  Trust च्या माध्यमातून त्या भागातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू लागतो. सरकारकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. त्याच्या मित्रांची आणि चांगल्या लोकांची त्यांना ह्या कार्यात साथ मिळते.

कार्य सुरु केल्यानंतर एक-दीड वर्षांनी हे पुस्तक लिहिले आहे, म्हणून मी हा आत्मकथेचा भाग १ आहे असे सुरवातीला म्हटले आहे.

हे आत्मकथन करताना पुस्तकात अनेक विषय येतात. आपल्याकडील वैद्यकीय सोयींची  दुरावस्था, राजकारण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती, जात पात, UK मधील वैद्यकीय सोई – जेष्ठ नागरिकांना देण्यात येणारी वागणूक – श्रम प्रतिष्ठा आणि त्या अनुषंगाने भारताबरोबर न टाळता येणारी तुलना. लेखक आणखी एक  विदारक सत्य सांगून जातो. ते म्हणजे काही शिकलेले डॉक्टर, MBA, UK मध्ये आपल्या शिक्षणापेक्षा कमी लायकीचे काम केवळ पैसा मिळविण्यासाठी  करत आहेत. हे  खूप लाजिरवाणे आहे.

मित्रानो हे पुस्तक वाचनीय आहे. तरुण मंडळीनी हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे. आयुष्यात पैसा हेच सर्वस्व नाही. चांगले काम, स्वधर्म ह्याची कस धरली तर तुम्हाला पैसा कधीच कमी पडणार नाही हा विश्वास हे पुस्तक तुम्हाला देते . Money is not end in itself. It is means to an end.

असे motivational अनुभव लिहिल्या बद्दल लेखकाचे अभिनंदन आणि त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!

सुधीर वैद्य
२९-०७-२०१३

Advertisements

0 Responses to “८१) परत मायभूमीकडे / डॉ. संग्राम पाटील”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

August 2013
M T W T F S S
« Jul   Oct »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: