७८) शहाण्यांचा Psychiatrist / डॉ. आनंद नाडकर्णी

Photo2031

 

 

 

७८) शहाण्यांचा Psychiatrist  / डॉ. आनंद नाडकर्णी / समकालीन प्रकाशन / १६ मार्च २०१० / रुपये २५० / पृष्ठे २७७ 

माणसाला मनोविकार हा शब्द ऐकायला सुद्धा नको असतो. मनोविकार झालेला माणूस म्हणजे वेडा  आणि त्याच्यावर उपचार करणारा म्हणजे वेड्यांचा डॉक्टर, हे समीकरण  आजही बऱ्याच  प्रमाणात अगदी सुशिक्षित समाजातही रूढ आहे. खरेतर हल्लींचे दिवस – सामाजिक परिस्थिती – आयुष्यातील ताण  तणाव – कौटुंबिक कलह, ह्यामुळे  कोणत्याही शहाण्या माणसाच्या मनावर आघात – परिणाम होईल. कित्येक वेळा मनोविकार झाला आहे असा संशयही येतो – कळते, पण आपले मन हा रोग स्वीकारायला तयार होत नाही. रोगाकडे दुर्लक्ष केले जाते आणि मग काही वेळा परिस्थिती हाताबाहेर जाते, असे आपण बघतो. ह्या रोगाबद्दलची गैरसमजूत दूर करण्याचा हे पुस्तक प्रयत्न करते आणि म्हणूनच डॉक्टरनी ह्या पुस्तकाचे नाव ‘ शहाण्यांचा psychiatrist ‘ असे ठेवले आहे.

पुस्तक वाचायला घेतल्यानंतर आपणाला एका मागून एक धक्के बसत जातात. मनात भावनांचा कल्लोळ माजतो. कधी हुरहूर लागते, तर कधी आपण दु:खी होतो, माणसांच्या वागणुकीने रागही येतो, डॉक्टरांची स्वप्ने बघून आपण अवाक होतो. डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण होण्याआधीपासून मनाच्या कोपऱ्यात  दडलेल्या स्वप्नाचा पाठपुरावा म्हणजे हे  पुस्तक.  अर्थात हा प्रवास वाचताना डॉक्टरांचे आयुष्यच उलगडत जाते. वैयक्तिक आयुष्यात  समस्या असूनही डॉक्टर आपल्या ध्येयापासून विचलित होत नाहीत, हे माणूस म्हणून ते किती ग्रेट आहेत हे आपल्याला कळते.

समाजाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे आणि त्यासाठी मनोविकार ह्या विषयाकडे संकुचित नजरेने बघत येणार नाही हि समज डॉक्टरांकडे तरुण वयात असते आणि ह्यासाठी ते आपल्या जीवाचे रान करतात. त्यांच्या ह्या प्रवासात त्यांना अनेक मान्यवरांची साथ मिळते. मनाचे आजार असणारी माणसे  मुळात शहाणीच असतात हे गृहीत धरून मनोविकारांबद्दल समाजात जागृती करण्याचे कार्य डॉक्टर करतात . मनोविकारासाठी नेहमीच्या उपचाराबरोबर डॉक्टर इतरहि  कलांचा (साहित्य , संगीत , चित्रकला . संवाद ) सुरेख उपयोग करतात.

समाजाच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेल्या आणि त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्यपणाला लावणाऱ्या डॉक्टरना माझा प्रणाम.  असे छान  पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल समकालीन प्रकाशनचे अभिनंदन.

पुस्तक नक्की वाचनीय आहे. ह्या विषयासंबंधी आपले विचार प्रगल्भ व्हावेत असे वाटत असेल, तर हे पुस्तक जरूर वाचा. पुस्तकाचा font थोडा लहान आहे त्यामुळे ईच्छा असूनही एकावेळी जास्त वेळ वाचन होत नाही.

पण पुस्तक वाचून झाल्यानंतर मुखपृष्टावरील आरश्यात बघायला विसरू नका.

सुधीर वैद्य
२२ – ०६ – २०१३

Advertisements

0 Responses to “७८) शहाण्यांचा Psychiatrist / डॉ. आनंद नाडकर्णी”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

August 2013
M T W T F S S
« Jul   Oct »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: