२५४) ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक – दिग्दर्शक : संजय पवार

 

254) Photo2090

 

२५४) ठष्ट  (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक – दिग्दर्शक : संजय पवार

ठष्ट हे ज्वलंत नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखकाचे मनापासून अभिनंदन.

नाटकाचा विषय:

नाटकाचा विषय चाकोरीबाहेरचा आहे. हा विषय खरेतर समाजाला नवीन नाही.  पण उघडपणे बोलण्यावर अलिखित बंदी आहे, ह्या अर्थाने हा विषय चाकोरीबाहेरचा आहे. प्रत्येक माणसासाठी लग्न हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. स्त्री साठी हा टप्पा जरा जास्तच महत्वाचा असतो. लग्न न झालेल्या मुलींची बाजू कोणी विचारात घेतच नाही. समजा विचारात घेतली तरी सामाजिक रीत म्हणून तुलाच तडजोड करायची आहे, त्यामुळे स्त्री जन्माला दोष देवून आपले  आयुष्य का बरबाद करायचे? हाच विचार तिच्या मनावर ठसविला जातो. बलात्कार शारीरिक असतो तसा मानसिकही असतो. समाजाच्या प्रस्थापित चालीरीतीने प्रत्येक स्त्री वर ओढवणाऱ्या मानसिक बलात्काराच्या प्रसंगांचा पंचनामा लेखकाने जहाल भाषेत मांडला आहे.

स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते हे खरे सत्य आहे. स्त्री वरील अत्याचाराच्या बातम्या रोज आपण वाचतो, त्यातील कारणे शोधतो, शक्य असेल तेथे प्रथम स्त्रीला दोष देवून मोकळेही होतो. चर्चेच्या शेवटी पुरुषाची मानसिकता बदलल्याशिवाय स्त्रीला खरा नाय मिळणार नाही असे म्हणून आपली विद्वत्ता पाजळतो. पण हि मानसिकता बदलण्याचा प्रयत्न कसा आणि कोणी करायचा हे मात्र सांगत नाही. हि पुरुषांची मानसिकता लेखकाने थोड्या भडक रीतीने सांगितली आहे, कारण आता पुरुष जातीला अशीच भाषा कळू शकते.  स्त्रीनेच  आतापासूनच  पुरुषांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते हे जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचा. (The Second Sex / द सेकंड सेक्स /Simone De Beauvoir /मराठी अनुवाद – करुणा गोखले /पद्मगंधा प्रकाशन /०१-०५-२०१० /Rs ४५०/- पृष्ठे ५५९/ )

लेखकाने स्त्रीच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा आढावा घेतला आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यात  स्त्रीत होणारे शारीरिक बदल, मानसिक बदल आणि तिच्यावर केले जाणारे संस्कार यांचा  सुरेख मागोवा घेतला आहे.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, प्रत्येक स्त्रीने मी काय करू शकते, मी काय करणार, किती – कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की करणे आवश्यक आहे. हि शिकवण तिला लहानपणापासून मिळाली पाहिजे. आपले ध्येय हे वैचारिक रस्त्यानेच गाठले पाहिजे असा आग्रह ह्या नाटकात आहे.

नाटक बघताना लेखकाने  केलेली निरीक्षणे आपल्या अंगावर येतात. खरेतर  बरीचशी निरीक्षणे आपल्या परिचयाची असतात व त्यामुळे आपण नाटकात  गुंतून जातो.  नाटकातील  निरीक्षणांवर जर आपण विचार केला, भोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन केले, आपल्या आयुष्यात डोकावून बघितले तर आपल्याला खूप गोष्टी आपल्या घरापासूनच सुधारता येतील.

स्त्रियांच्या संदर्भात वाचनात आलेले एक वाक्य देण्याचा मोह मी टाळू शकत नाही. ह्या एका वाक्यात स्त्री चे वर्णन केले आहे.

A woman’s strength amazes men. She can handle trouble and carry heavy burdens. She holds happiness, love and opinions. She smiles when she feels like crying, cries when she’s happy and laughs when she’s afraid. Her love is unconditional!! There’s only one thing wrong with her, she sometimes forgets what she is worth…..

आजच्या स्त्रियांची खरेतर हीच शोकांतिका आहे. लग्न हे बरेच वेळा आयुष्याचे ध्येय बनते – लादले जाते. चांगेल दिसणे, शिकणे, नोकरी  करणे, स्वभावाला  मुरड  घालणे, गृह कृत्य दक्ष होणे हे केवळ लग्न होऊन सासरी जाणे ह्यासाठीची गुंतवणूक असते. हे सर्व करताना स्त्री स्वत:चे स्व विसरत असते किवा  दुसऱ्या गोष्टीत शोधत राहते. सासर हेच तिचे घर, हे लहानपणापासून तिच्या मनावर ठसविले जाते. सासरी गेली कि ती माहेरला पारखी होते. (कौतुकासाठी माहेर असते पण मुलीच्या संसारात समस्या आली तर मात्र तिला माहेरचा आधार मिळेल याची खात्री नसते.) कित्येक वेळा स्त्रीच स्त्रीची शत्रू असते – बनते. अशावेळी जर पुरुषाने स्त्रीला पाठींबा दिला तर तिचे आयुष्य सुखकारक होईल.

स्त्रीची कुचंबणा हा मी लिहिलेला लेख वाचण्यासाठी लिंक http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/71-Suffocation.pdf. ह्या लेखात स्त्रीच्या कुचंबणेचा आलेख अधोरेखित केला आहे.

नाटकात  जीवनातील बऱ्याच Anomalies of Human Behaviour  वर भाष्य केले आहे. मी सुद्धा एका  लेखात ह्या
Anomalies of Human Behaviour चा पंचनामा केला आहे . लिंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/82-Anomalies_of_Human_behaviour.pdf

 

लेखकाच्या  निरीक्षणशक्तीची ताकद एवढी प्रचंड आहे कि हे नाटक बघितल्यानंतर मग ती स्त्री असो किवा पुरुष, एका निराळ्या व  चांगल्या नजरेने स्वत:कडे आणि भिन्नलिंगी व्यक्ती कडे बघू लागेल.

कथेच्या ओघात लेखक शिक्षण, मुंबईची अवस्था, गरिबी वगैरे विषयांचा लेखा  – जोखा मांडतो

नाटकाचे दिग्दर्शन:

लेखकानेच  नाटक दिग्दर्शित केल्यामुळे प्रयोग छान झाला आहे. नट्यांची निवड भुमिकेप्रमाणे योग्य वाटते. सर्व व्यक्तिरेखा प्रातिनिधिक आहेत. सर्व पात्रे नुसताच अभिनय करत नव्हती तर भूमिका जगत होती. नाटकाची संहिता प्रखर होती, त्यामुळेच असा अभिनय शक्य झाला.

पात्रांचे कपडे भूमिकेप्रमाणे योग्य होते. त्यांचे विचार आणि  व्यक्तिमत्व त्यांच्या  ड्रेस मधून अधोरेखित झाले.  त्यातील दोन व्यक्तिरेखा बोल्ड आहेत हे ठसविण्यासाठी त्यांनी  सारखी सिगारेट ओढणे – दारू पिणे हे नसते दाखविले तरी चालले असते, कारण त्यांचा देहबोलीतून , कपड्यांवरून पुरेसा message प्रेक्षकांना मिळत होता. अर्थात स्वतंत्र आणि एकट्या राहणाऱ्या काही मुली दारू पितात, सिगारेट ओढतात हे सर्वांना माहित आहे. नाट्यकथा  ठळकपणे  अधोरेखित करण्यासाठी दिग्दर्शकाने ह्याचा वापर केला असेल असे वाटते. परंतु पहिल्या दोन रांगेतील लोकांना सिगरेटचा त्रास होऊ शकतो.

नाटकाचे नेपथ्य:

नेपथ्यकाराने हॉस्टेलची  खोली नेमकी साकारली आहे. खोलीचा फिकट रंग, खिडक्या, उमललेले भिंतीवरील प्लास्टर वगैरे. मजल्यावरील passage दाखविल्यामुळे room साठी कमी जागा उपलब्ध झाली. इतर furniture मुळे  पात्रांना वावरायला जागा कमी पडत होती. passage मध्ये काहीच कथानक घडत नसल्यामुळे तो रंगमंचावर दाखविण्याची गरज नव्हती असे मला वाटते. हॉस्टेलच्या  खोलीतील बंकबेड पटला  नाही. अपुऱ्या जागेमुळे बहुतेक हि तडजोड केली असावी.

कलाकारांचा अभिनय:

ह्या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या नाटकात एकही पुरुष पात्र  नाही. सर्व स्त्री कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. डावे -उजवे ठरविणे खरेच कठीण आहे.

मित्रानो, वेळात वेळ काढून हे नाटक नक्की बघा. तुमचा वेळ फुकट जाणार नाही ह्याची खात्री मी देतो. पण नाटक  खुल्यामनाने बघणे आणि आपल्या आचार – विचारात बदल घडविण्याचा प्रयत्न करणे मात्र आवश्यक आहे.

सुधीर वैद्य
१५ – ०७ – २०१३

Advertisements

3 Responses to “२५४) ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक – दिग्दर्शक : संजय पवार”


  1. 1 Bhairavi Juvekar August 13, 2013 at 11:18 am

    नाटकाच्या परिक्षणाबद्दल धन्यवाद,खूपच छान लिहिता तुम्ही काका…मला खूप आवडत वाचायला … मी हे नाटक नक्की बघिन.


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

July 2013
M T W T F S S
« Jun   Aug »
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: