२३५) आनंद

२३५) आनंद (Hrishikesh Mukherjee’s Anand / Produced by N. C. Sippy / 5 Film Fare Award Winner & National Award) *ing Rajesh Khanna , Amitabh Bachchan, Ramesh Deo.

११  मे , शनिवार एक खास दिवस.  प्रत्येकाच्या आयुष्यात कमीत कमी ३ दिवस खास असतात. कोणाच्यातरी चुकीने एक दिवस त्याच्या आयुष्यात येतो. मग तो एक चूक करतो, तो दुसरा दिवस  आणि तिसरा दिवस तर प्रत्येकाच्या आयुष्यात देव ठरवितो. असो.

अश्या या खास दिवशी मी हा सिनेमा CD Player वर बघितला. आजपर्यंत हा सिनेमा थियेटर मध्ये बरेच वेळा बघितला आहे . दर २ – ३ महिन्यांनी मी पूर्वी बघितलेल्या  आणि आवडलेल्या सिनेमाच्या CD विकत घेतो आणि परत एकदा घरी शांतपणे बसून ते  सिनेमे  बघतो. चांगला सिनेमा जरी एकदा बघितला असला, तरी पुढच्या वेळी परत बघताना नवीन दृष्टी मिळते.  अर्थात चांगला सिनेमा म्हणजे नक्की कसा ह्याची व्याख्या माणसागणिक बदलती असते.  हा अनुभव व्यक्तिगत असतो. असो.

हा सिनेमा मला खूप आवडतो . कदाचित ‘ मरण ‘ हा माझा आवडता विषय आहे त्यामुळे असेल. माझ्या बऱ्याच लेखात मरणाचा उल्लेख तुम्हाला सापडेल.

हा सिनेमा आपल्याला कसे जगावे आणि मरणाला कसे कवटाळावे हे हसत हसत शिकवतो, पण डोळ्यातून अश्रूंची धार कधी लागते हे कळतच नाही. मौत तू एक कविता है …. किती सुरेख कल्पना. दु:ख स्वत:कडे ठेव आणि सुख-आनंद मात्र इतरांना दे. आपण मात्र बरेच वेळा उलटे वागत असतो. अर्थात प्रत्येक वेळची आणि प्रत्येक  माणसाची परिस्थिती त्याला कारणीभूत असते. पण अश्यारितीने जगायला शिकले  पाहिजे हे मात्र नक्की. निदान त्या दिशेने एक पावूल टाकायला काय हरकत आहे.

मरण हे मरण असते ………..
प्रत्येकाचे वेगळे असते.

जन्म आणि मरणामध्ये एका श्वासाचे अंतर आहे ….

माणूस रोजच मरतो मनाने.
यमाने नेल्यानंतर एकदाच मरतो शरीराने.

हा सिनेमा बघण्यासाठी लिंक: http://www.youtube.com/watch?v=9RShJwyaWKA

सुधीर वैद्य
११ – ०५ – २०१३

Advertisements

0 Responses to “२३५) आनंद”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

May 2013
M T W T F S S
« Apr   Jun »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: