२२५) वाचवा

 

 

 

225) P1030034

२२५) वाचवा

काल  संध्याकाळी नेहमी सारखा jogging करत होतो. पार्कमध्ये हिंदी गाणी चालू होती. अचानक एक गाणे कानावर आदळले . ‘मुझे मेरी बीबीसे बचावो ‘ . बचावो  – वाचवा ह्या शब्दावर मन विचार करू लागले . आजचे आपल्या सर्वांचे जगणे म्हणजे मला वाचवा असे झाले आहे. काका मला वाचवा ह्या आरोळीची आठवण झाली .

देशाला भ्रष्टाचारापासून वाचवा, जनतेला अतिरेक्यांपासून वाचवा, मुलीना गर्भावस्तेत मरणापासून वाचवा, तरुण मुलांना वाईट संगत – व्यसनापासून वाचवा, अपघातापासून वाचवा, सरकारला बहुमत गमावण्यापासून वाचवा, मुलीना लैंगिक अत्याचारापासून वाचवा, महागाईपासून वाचवा, अनावश्यक खर्चापासून वाचवा, बेरोजगारीपासून वाचवा,  पाणी वाचवा, विज वाचवा,  पैसे वाचवा, बॉसपासून वाचवा, प्रदुषणापासून वाचवा, कौटुंबिक कलहापासून वाचवा, रोगापासून वाचवा,  गर्दीपासून वाचवा, वाहतूक जामपासून वाचवा, अंधश्रद्धेपासून वाचवा, गुंडापासून वाचवा, परकीय गंगाजळी संपण्यापासून वाचवा, गुंडागर्दीपासून वाचवा, आंदोलनापासून वाचवा, बंदपासून वाचवा, अति क्रिकेटपासून वाचवा, टुकार TV मालिकांपासून वाचवा.   अजून बऱ्याच गोष्टींपासून आपण स्वत:ला वाचवायचा प्रयत्न  करत असतो . पण इथेच थांबतो. 🙂

खरेतर हि जंत्री कितीही लांब होऊ शकते . काही शब्द ह्या जंत्रीतून वाचले असतील सुद्धा . 🙂 
विचार करता करता जास्त वेळ फिरलो याचे भानच राहिले नाही. Jogging  Track वरील तरुण सहकारी म्हणाला कि काय काका आज जास्त वेळ फिरता आहात? मी चटकन भानावर आलो आणि त्याला ‘ वाचवा ‘ ह्या शब्दाची गोष्ट सांगितली. तो अवाकच झाला .
वाचवा हा शब्द इतके वेळा वापरावा लागत आहे कि काही काळानंतर तो शब्दच ‘वाचणे’ (शिल्लक रहाणे ) मुश्किल होईल . 🙂

मित्रानो , आता माझ्या लेखापासून आम्हाला वाचवा असे म्हणू नका म्हणजे झाले . 🙂

सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे पाण्याचा फोटो अपलोड केला आहे .
पाणी वाचवा. !!!!!!! वीज वाचवा. !!!!!
सुधीर वैद्य
०३ – ०४ – २०१ ३ 
Advertisements

0 Responses to “२२५) वाचवा”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

April 2013
M T W T F S S
« Mar   May »
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: