२२४) सुप्रभात – भक्ती / उपासना

224) Photo1793-1

 

२२४) सुप्रभात – भक्ती / उपासना

आमच्या परिसरात गेल्या १-२ वर्षात एका देवीच्या नवीन देवळाची भर पडली आहे . हळू हळू ह्या देवळाचा पसारा वाढत आहे . देवळाला कारखान्यात असते असे पत्र्याचे गेट हि आहे . पण ते गेट जरा उशिरा उघडत असावे कारण आम्ही सकाळी फिरून येताना ते नेहमी बंद असते . भक्तांच्या सोयीसाठी ह्या गेटवर देवीचा फोटो रंगवला आहे .

सकाळी फिरून येताना ,एक स्त्री बराच वेळ त्या देवीच्या फोटोला नमस्कार करत होती. आमची चाहूल लागल्यानंतर चटकन नमस्कार आटोपता घेऊन निघाली .

मनात विचार आला कि गेल्या काही वर्षापासून चंगळवाद आणि भक्ती ह्यात खूप प्रमाणात वाढ झाली आहे . काय कारण असावे बरे? जास्त भक्ती केल्यामुळे पैशाची आवक वाढल्यामुळे चंगळवाद करायला मिळत आहे, म्हणून आभार ? कि पैशाची आवक वाढावी म्हणून भक्ती वाढत आहे? असे तर नाही कि, पैशाची आवक अशीच राहूदे आणि चंगळवाद करता येवू दे म्हणून भक्ती जोर धरत आहे? असो .

कोणतेही कारण त्या माणसासाठी बरोबर असू शकेल, जो पर्यंत त्याच्या भक्तीचा त्याच्या कुटुंबियांना आणि देवळाचा त्या परिसरातील नागरिकांना त्रास होत नाही, तो पर्यंत भक्तीला आणि देवळाच्या विकासाला आक्षेप घेता येणार नाही,

बाकी सुज्ञ वाचकास अधिक सांगण्याची गरज नाही . मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत याची कृपया नोंद घ्यावी . मी स्वत: देवळात फार कमी वेळा जातो. माझ्या कामालाच मी देवपूजा मानतो .

शुभ सकाळ……. आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा, सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो….

सुधीर वैद्य
२५-०३-२०१३

0 Responses to “२२४) सुप्रभात – भक्ती / उपासना”



  1. Leave a Comment

Leave a comment




Archives

March 2013
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.