२१५) हाताची रूपे (आपला हात जग्गन्नाथ )

215) Hasta Mudra 13082007070

 

२१५) हाताची रूपे (आपला हात जग्गन्नाथ )
हात हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे. खरेतर आपले सर्वच अवयव हे किती किमती आहेत, हे आपण आजारी पडल्यानंतर आणि  ते अवयव बरे करण्यासाठी डॉ.  घेत असलेली फी बघून आपल्या लक्षात येते.

हात नातेसंबंध जोडण्यासाठी आणि तोडण्यासाठी महत्वाची भूमिका पाडतात. हे हात माणसाला घडवतात किवा बिघडवतात. मातेचे हात बाळाची काळजी घेतात. आई ह्याच हातानी रुचकर स्वैपाक करून आपले पालन पोषण करते. हे हात कौतुकाची थाप पाठीवर देतात आणि चुकले कि त्याच पाठीवर धपाटा घालतात. वडिलांचे हात संकट समयी आधार देतात. गुरुजी ह्याच हातात पट्टी घेवून आपला अभ्यास पक्का करून घेतात. हेच हात आपल्याला विद्या पारंगत होण्यास मदत करतात. नोकरी, व्यवसायात मदत करतात.  डॉक्टरचे हेच हात जीव वाचवतात. कलाकाराचे हेच हात सुंदर कलाकृती घडवतात. सैनिकाचे हात सीमेवर सतर्क राहून आपले रक्षण करतात. हेच हात काही लोकांना वाईट कर्म करायला मदत करतात.

प्रत्येक माणूस ह्या हातांचा  उपयोग आपल्यातील अंगभूत गुणांचा अविष्कार दाखविण्यासाठी करत असतो. हे हात स्वधर्माचे पालन करायला मदत करतात. हे हात निर्माण करतात किवा विध्वंस करतात.

अर्थात हे हात आपणहून काहीच करत नाहीत.  आपला मेंदू त्यांना आज्ञा देतो. प्रत्येक वेळी विचार करा कि हे हात चांगल्या कामासाठी उपयोगात येत आहेत कि नाही? ते स्वधर्माचे पालन करत आहेत कि नाही?

मित्रानो, सगळ्यात महत्वाचे  म्हणजे आपल्या हाताची  बोटे (हस्त मुद्रा) आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. विश्वास बसत नाही? तर मग खालील लिंक नक्की वाचा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या .
http://www.spandane.com/Medical/Naturopathy/06-Mudras.pdf

ह्या  हाताना सकाळी उठल्यानंतर वंदन करा. त्यांचा आशीर्वाद घ्या आणि मग बघा चमत्कार. आपल्या हातून वावगे घडणारच नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. !!!!!

सुधीर वैद्य
२३-०२-२०१३

Advertisements

0 Responses to “२१५) हाताची रूपे (आपला हात जग्गन्नाथ )”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

February 2013
M T W T F S S
« Jan   Mar »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: