६३) एक वाचनीय दिवाळी अंक २०१२ ‘ पुरुष स्पंदन’

 

Photo1514

 

६३) एक वाचनीय दिवाळी अंक २०१२ ‘ पुरुष स्पंदन’/ संपादक हरीश सदानी , रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ / रुपये ९०/- पृष्ठे १९२

हा दिवाळी अंक ‘कुटुंब व स्त्री पुरुष नातेसंबंध’ ह्या  विषयाला वाहिलेला आहे.

कुटुंब हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.  मानवी संबंधाच्या बाबतीत कुटुंब हा महत्वाचा मुद्दा असतो. माणसा माणसा मधील (स्त्री किवा पुरुष) संबंध घडविण्यात – बिघडवण्यात कुटुंबातील संकेत, मुल्ये आणि संस्कार कारणीभूत असतात.

भारतीय संदर्भात कुटुंब संस्थेचा विचार करताना जात-धर्म-पितृसत्ता ह्या बाबींचा विचार अपरिहार्य ठरतो. हल्ली कुटुंब व्यवस्थे बद्दल बरीच चर्चा होते. खा (खाजगीकरण) उ (उदारीकरण )जा (जागतिकीकरण) ह्या गोष्टींच्या तावडीतून कुटुंब व्यवस्थाहि सुटली नाही. ह्या व्यवस्थेला बसलेले हे धक्के बदलत्या परिस्थितीत अपरिहार्य होते. कुटुंबे विभक्त झाली म्हणून संपूर्ण नातेसंबंधाना मुठ माती दिली गेली असे झाले नाही.

कुटुंबाच्या नवीन व्याख्या निर्माण झाल्या कारण माणूस हा समाज प्रिय आहे. तो एकटा राहू शकत नाही. आज फेसबुक सुद्धा एक प्रकारचे कुटुंब झाले आहे.

सर्वच लेख वाचनीय आहेत. लेख वाचून आपल्या विचारांना चालना मिळते. अस्वस्थेची भावना मनात घर करते, कारण कुटुंब ह्या शब्दाची विविध रूपे बरेच वेळा आपल्या लक्षातही आलेली नसतात. मासिकातील कविता तर ज्वलंत आहेत.

हे सर्व लेख वाचून आपल्या मनात सह वेदना जागृत झाली तर ह्या अंकाचा उद्देश सफळ झाला असे म्हणावे लागेल. समाज जीवनाच्या जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी हा दिवाळी अंक जरूर वाचा.

मित्रानो, वेळात वेळ काढून हा अंक नक्की वाचा.

सुधीर वैद्य
२३-१२-२०१२

Follow me on …..

https://spandane.wordpress.com/
www.spandane.com

Advertisements

0 Responses to “६३) एक वाचनीय दिवाळी अंक २०१२ ‘ पुरुष स्पंदन’”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

December 2012
M T W T F S S
« Nov   Jan »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: