५९) परक्या भूमीवर घर / स्मिता भागवत / ग्रंथाली /पृष्ठे १४६ / रुपये १५०/- २१-०७-२०११ / कुटुंब समुपदेशन कथा
दोन शब्द लेखिकेबद्दल:
लेखिका मराठी, गुजराती , हिंदी , इंग्रजीत आघाडीच्या नियतकालिकात नियमित लेखन करतात. त्यांनी गुजरातीत ३० पुस्तके लिहिली आहेत. मराठीत १५ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. १९८३ पासून त्या कुटुंब समुपदेशन करतात. भारतात आणि संपूर्ण जग हे त्यांचे कार्य क्षेत्र आहे. सध्या वास्तव्य कॅनडा येथे आहे.
पुस्तकातील विषय:
परदेशातील जोडप्यांचे समुपदेशन ह्या विषयावर आधारित ७ कथा ह्या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. जर पती -पत्नी मधील वाद समुपदेशाने सुटला नाही तर घटस्फोट हा एकच पर्याय शिल्लक राहतो. ह्या नाजूक विषयात लेखिका आपले कार्य करत आहे.
पती -पत्नी मधील वादाचे विषय जरी सगळीकडे तेच असले तरी परदेशात त्याचे स्वरूप थोडे वेगळे असते. ह्या समस्या वाचून सुन्न व्हायला होते. एका पवित्र नात्याची दुसरी बाजू बघून माणसे अशी कशी वागू शकतात ह्याचे कोडे पडते.
लेखिकेला ज्या परिस्थितीत स्वत:चा देश सोडून परदेशात जावे लागले याची कथा – व्यथा ‘भैरवी’ ह्या कथेत मांडली आहे. हे सत्य कथन वाचून आपली मान शरमेने झुकल्याशिवाय रहात नाही.
ज्यांना लोकांच्या समस्यांवर विचार करायला आवडतो त्यांना हे पुस्तक नक्की आवडेल. पुस्तक चाकोरी बाहेरचे आहे पण आपली वैचारिक कक्षा रुंदावायला हे पुस्तक मदत करते.
असे सुंदर पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल ग्रंथालीचे अभिनंदन.
सुधीर वैद्य
१७-११-२०१२
Follow me on …..
0 Responses to “५९) परक्या भूमीवर घर / स्मिता भागवत”