१८४) कावळ्यांचे बोलणे (चोरून ऐकलेले)

१८४) कावळ्यांचे बोलणे (चोरून ऐकलेले)

ह्या महिन्यात १५-१०-२०१२ ला सर्व पित्री अमावस्या होती. हा लेख त्यादिवशी संध्याकाळी लिहून पूर्ण झाला पण कोणाच्या भावना दुखावू नयेत म्हणून आज अपलोड करत आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. पण असे झाले असेल तर मला क्षमा करा.

त्या दिवशी संध्याकाळी फेरफटका मारून घरी परतलो. मन अस्वस्थ झाले होते. आज सर्व पित्री  अमावस्या  असल्यामुळे लोकांनी भक्ती भावाने गाईला  केळीच्या पानावर जेवण वाढून दिले होते. (पितरांची आठवण म्हणून) परंतु हे जेवण खाऊन गाईचे पोट भरले असावे, कारण तिच्या पुढे जमिनीवर अश्या केळीच्या पानांचा ढिग लागला होता. गाय हिरवा चाराही खात नव्हती. जेवणाला मुंग्या आल्या होत्या. काही अजूनही भुकेलेले कावळे  घिरट्या घालत होते. हे दृश्य मन अस्वस्थ करून गेले. मला फोटोही काढावासा वाटला नाही. 😦

घरात येण्यापूर्वी बागेत थांबलो. आमच्या आंब्याच्या झाडावर दोन कावळे बसले होते. त्यातील एक कावळा गेल्या वर्षी ह्याच झाडावर जन्मला  होता. त्याच्या आई-वडिलानी ह्याच आंब्याच्या झाडावर घरटे बांधले होते. ह्याच झाडावर ह्या  कावळ्याने उडायचे धडे गिरवले होते. लहानपणीच त्याच्या मानेचे पीस पडले होते त्यामुळे त्याच्या मानेवर पांढरा पट्टा  दिसतो. त्यामुळे तो ओळखू आला. पण तो इतका हुशार आहे कि आजपर्यंत मी त्याला फोटोत बंदिस्त करू शकलो नाही. असो. त्याच्या बरोबर त्याची प्रेयसी असावी असा माझा अंदाज आहे. चोरून बोलणे ऐकायचे नसते हे माहित असूनसुद्धा मी त्यांचे बोलणे ऐकले. त्यांच्या बोलण्याचा गोषवारा देत आहे. चूक भूल घ्यावी – द्यावी. 🙂

” आज मनसोक्त जेवायला मिळाले. ते सुद्धा फारसे श्रम न करता. हे  प्रेमळ लोक आपल्यासाठी रोज का नाही पान  – जेवण मांडून ठेवत? रोज त्यांना काय परवडणार? महागाई किती वाढली आहे? महागाईचे सोड, अरे ह्यांनी आपल्या म्हताऱ्या पितरांना जिवंत असताना पोटभर जेवण दिले असते तर त्यांना जास्त पुण्य लागले असते. जेवण म्हणजे तरी काय? गवारीची भाजी, अळूची भाजी, भोपळ्याचे भरीत – भाजी, वडे आणि भाताची खीर  वगैरे,  इतरवेळी कधी गवारीची भाजी ह्यांनी खाल्ली आहे का? Cholesterol कमी करण्यासाठी चांगली असते. विदेशात ह्यापासून गावारगम बनवितात.

केळीची पाने कापून किती नुकसान होत असेल ह्याची फिकीर नाही. एकदा जेवण ठेवले कि हे लोक मोकळे, उरलेला अर्धा  दिवस सत्कारणी लावायला. पितरांची आठवण काढायला ह्यांना ह्या दिवसांची का वाट पहावी लागते? आपल्या पितरांचे – हयात नसलेल्या माता – पित्याचे उपकार – आठवण रोज निघाली पाहिजे. त्यांचे उपकार कधीच विसरता येणार नाहीत.

ह्या पंधरा दिवसात कचेरीतही लोकांची रजा असते. गरजू व्यक्तींची कामे होत नाहीत. सुट्यांमुळे साहेबाचे मरण असते. ट्रेन मध्येही गर्दी कमी असते. जे लोक रोज उभ्याने प्रवास करतात त्यांना बसायला जागा मिळते. 🙂

पूर्वी ह्या काळात लोक खरेदी करत नसत. पण हल्ली तर ह्या काळातही दुकाने गर्दीने ओसंडत असतात. ”

तेव्हड्यात त्या कावळ्यांचे लक्ष माझ्याकडे गेले. एक कावळा म्हणाला कि आम्ही खिडकीवर ह्यांचे बोलणे ऐकायला बसलो कि आम्हाला हाकलतात आणि आमचे बोलणे मात्र ऐकतात. आता आपले बोलणे फेसबुकवर अपलोड करेल आणि Like मिळवत बसेल. 🙂 चल आपण दुसरीकडे जावूया. असे म्हणून ते कावळे उडून गेले.

मी खरेच घरी आल्यानंतर फ्रेश होऊन हा लेख लिहायला घेतला. 🙂

सुधीर वैद्य
१५-१०-२०१२

टीप: मित्रानो तुम्हाला मी सर्व पित्री अमावास्येला काय करतो जाणून घ्यायचे असेल ना ? माझे वडील १९६९ साली वारले. १९७० साली त्यांचे श्राद्ध केले. त्यानंतर सर्व पित्री अमावास्येला कोणताही विधी – कर्म कांड केले नाही. दरवर्षी आठवण म्हणून देणगी दिली जाते. मी तर वडिलांना अजून विसरूच शकलो नाही. ते माझे प्रेरणा स्थान आहेत. मी ध्यान करून त्यांच्या सहवासातले  दिवस कधीही enjoy करतो. आजही ते माझ्याबरोबर आहेत. माझे संकेत स्थळ त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे.

Advertisements

0 Responses to “१८४) कावळ्यांचे बोलणे (चोरून ऐकलेले)”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

October 2012
M T W T F S S
« Sep   Nov »
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: