५५) पुनर्जन्म / मनोहर दातार

 

५५) पुनर्जन्म / मनोहर दातार /  सन publications / रुपये १००/- १९-१०-१९९९ /- लेख 

लेखकाने भीषण अपघातातून बचावलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. हे बचावणे म्हणजे एका अर्थी त्या व्यक्तीचा पुनर्जन्मच असतो. हे बचावणे केवळ त्या व्यक्तीच्या दुर्दम्य इच्छाशक्ती मुळे शक्य होत असते. अशा कहाण्या अपघातात सापडलेल्या लोकांना धीर देतील व त्या परिस्थितीतून बाहेर येण्याला मदत करतील म्हणून लेखकाने मुद्दाम हे पुस्तक लिहिले आहे.

पुस्तकात १९ कहाण्या आहेत. लेखनशैली ओघवती आहे. आपल्या डोळ्यासमोर प्रसंग  उभा राहतो. पात्रांचे दु:ख आपले होते एव्हडे सामर्थ्य ह्या पुस्तकात आहे.

हे चाकोरी बाहेरचे पुस्तक वाचायला हरकत नाही. मला हे पुस्तक जास्त आवडण्याचे कारण म्हणजे मीही अश्याच एक जीवघेण्या अपघातातून १९९६ साली बाहेर पडलो आहे. त्या अपघाताचे कवित्व अजूनही अनुभवतो आहे. ह्या अपघाताचे परिणाम तुमच्या शरीरावर तर होतातच पण मनाला सुद्धा जखमी करून जातात. माझ्या आयुष्यात असेही काही प्रसंग घडले आहेत की मी अक्षरश: मृत्युच्या सीमा रेषेला स्पर्श करून आलो आहे. त्यावेळी नेमके कसे वाटते  ह्याचे शब्दांकन हि केले आहे. लिंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/55-Deathexperience.pdf

लेखाचा  शेवट  माझ्या ‘ अपघात ‘ ह्या कवितेने करतो.

अपघात

अपघात म्हणजे अपघात असतो.
प्रत्येकाचा वेगळा असतो.

अपघात शरीराचा असतो.
अपघात मनाचा असतो.

अपघाताच्या जखमा मनावर कोरल्या जातात.
शरीरावरच्या लवकरच पुसल्या जातात.

अपघाताने माणसे जवळ येतात.
नाहीतर दुरावतात.

एकाचा अपघात दुसऱ्याचा फायदा असतो.
त्याला कोणाचाच इलाज नसतो.

अपघातातून शिकायचं असत.
पण याच भान प्रत्येकाला नसत.

बरेच अपघात  चुकीने होतात.
पण शिक्षा मात्र दुसरेच भोगतात.

अपघाताच ग्रहमान समजू शकत.
पण तरुण मन ह्यावर विश्वास ठेवण कठीणच असत.

अपघात टाळायचा प्रयत्न करा.
जगा आणि जगू द्या.

मित्रानो मी हि अपघाताची शिकार झालो आहे.
म्हणूच हि कविता तुम्हाला  ऐकवतो आहे.

सुधीर वैद्य
०३-१०-२०१२

Advertisements

0 Responses to “५५) पुनर्जन्म / मनोहर दातार”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

October 2012
M T W T F S S
« Sep   Nov »
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: