१६९) पाऊस – एक चिंतन

१६९) पाऊस – एक चिंतन 

पाऊस म्हणजे नुसते पाण्याचे थेंब नाहीत. हे थेंब म्हणजे आकाशाचे पृथ्वीवर असलेले प्रेम आहे. आकाश आणि पृथ्वी एकमेकाला भेटू शकत नाहीत. म्हणून आकाश हे प्रेम पावसाच्या रुपात व्यक्त करते.

मला  पावसात भिजायला आवडत नाही. मला कल्पना आहे की हे वाचून बरेच लोक  मला वेड्यात काढतील. तशी  छत्री डोक्यावर असली तरी भिजायला होते त्या संबंधी मी बोलत नाहीये. छत्री शिवाय मला पावसात भिजायला आवडत नाही. असो.

नाही म्हणायला लहानपणी वयाच्या ८-९  व्या वर्षी  पावसात  भिजल्याचे मला आठवते आहे. पण तो किस्सा वेगळा होता. तो किस्साच तुम्हाला सांगतो. माझ्या आठवणी प्रमाणे १९५९ साली ‘ जगबुडी ‘ होणार असे भविष्य वर्तवण्यात आले होते. लोक  भयभीत होते. सरकारही आपत्कालीन व्यवस्था करत होते. धार्मिक लोक होम – हवन, यज्ञ करत होते. त्या जगबुडीच्या दिवशी संध्याकाळ पासून खूप वारा सुटला होता आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. कचेऱ्या लवकर सोडण्यात आल्या.

आम्हा लहान मुलांना हि सर्व मजाच वाटत होती. वाडीतील सर्व मुलांनी  ठरविले की आपण शेवटचा ‘ गाडा ‘ ह्या पावसात फिरवून घेयुया. (मित्रानो, तुम्हाला कदाचित हा खेळ माहित नसेल. सायकलच्या  जुना टायर ला हातातील दंडुक्याने फिरवत फिरवत धावणे आणि एकमेकांचा गाडा पाडणे. ह्या  खेळात छान व्यायाम होत असे.) मी गाडा फिरवत असताना दादा (माझे वडील) आले. त्यांनी मला थांबविले आणि विचारले की पावसात का मुद्दामून भिजत आहेस? मी सांगितले की दादा आज जगबुडी होणार आहे ना म्हणून मी शेवटचा गाडा फिरवून घेत आहे. माझे शिस्तप्रिय दादा हसले आणि घरी गेले.

आम्हीही गाडा खेळून दमलो होतो. पाऊस कोसळतच होता. वाडीत पाणी जमले होते. ५-६ तास झाल्यानंतर पाऊस हि कंटाळला आणि थांबला. तुम्हाला २६ जुलै चा पाऊस आठवत असेल. पण त्यापेक्षाही जग बुडीचा पाऊस मोठा होता. जग काही बुडले नाही. दुसऱ्या दिवशी पावसाळी हवा हि निवळली.

त्यानंतरहि मी पावसात भिजलो पण तो पाऊस, पाण्याचा नव्हता.
लहानपणी आई -वडिलांच्या प्रेमाच्या – लाडाच्या पावसात भिजलो.
वडील आजारी आहेत आणि फार वर्षे त्यांचा सहवास मिळणार नाही हे कळल्या नंतर काळजीच्या पावसात चिंब भिजलो.
पुढे college त  असताना वडील वारले, तेव्हा अनावर शोकाच्या पावसात  भिजलो.
उच्च शिक्षणा शिवाय गत्यंतर नाही हे ओळखून शिक्षणाच्या एक एक पायऱ्या चढत गेलो आणि ध्येय पूर्तीच्या पावसात भिजलो.
नोकरी – व्यवसायाच्या जबाबदारीच्या पावसात ४० वर्षे भिजत गेलो.
प्रेमात पडलो आणि प्रेमाच्या पावसात भिजण्याचे सुख अनुभवत गेलो.
संसारातील जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर कर्तव्य पूर्तीच्या आनंदात चिंब  भिजलो.
व्यवसायातून निवृत्ती घेताना सहकार्यांच्या प्रेमाच्या अश्रूत बुडून गेलो.

आज हे सर्व आठवले, कारण काल रात्री पासून प्रचंड पाऊस पडत होता. सकाळी फिरायला जायच्या वेळेला सुद्धा पाऊस कोसळत होता. पण आज  फिरायला जाणे गरजेचे होते. आम्ही रोज सकाळी फिरून येताना दुध घेऊन येतो. घरातील शिलकीचे दुध हि संपले होते. आम्ही छत्री घेऊन बाहेर पडलो. पावसात मनसोक्त फिरलो. दुध घेऊन घरी आलो. त्यानंतर पाऊस थांबला. आमची जणू परीक्षा घेत होता.
काही काळापूर्वी पावसावर एक कविता केली होती. त्या कवितेने ह्या लेख संपवतो.

पाऊस

पाऊस म्हणजे पाऊस असतो.
निसर्गाचा सेमच असतो पण प्रत्येकाचा वेगळा असतो.

पाऊस सुखाचा असतो.
पाऊस दुःखाचा असतो.
पाऊस प्रेमाचा असतो.

जसा जास्त पावसाचा कंटाळा येतो.
तसाच अति सुखाच्या व अति दुःखाच्या पावसाचा कंटाळा येतो.
पण आपला काहीच इलाज नसतो.
कारण पाऊस आणि सुख-दु:ख, निसर्ग आणि नशिबावार अवलंबून असत.

आपण मात्र सोसायच असत.
दिवस पालटण्याची वाट बघण असत.
भोगणं फक्त आपल असत.
बाकी सगळ झुठ असत.

संकटात संधी शोधण असत.
सुखात पाय जमिनीवर ठेवण असत.
एवढच आपल्या हातात असत.

पाऊस एकदिवस थांबतोच.
सुख-दु:खासाठी सुद्धा हाच नियम असतो.
पण आपल्याला मात्र प्रत्येक गोष्टीची घाई असते.
आणि हेच आपल्या दु:खाच कारण असत.

वयाच्या आधी आणि  नशिबापेक्षा जास्त मिळत नसत.
पण ह्याच भान मात्र आपल्याला नसत.

पाऊस, हिवाळा, उन्हाळा हे निसर्गाच चक्र आहे.
सुख, दु:ख  हे नशिबाच चक्र आहे.
निसर्गाची साठ चक्र मी बघितली आहेत.
म्हणूनच ह्या पावसाची कविता तुम्हाला ऐकवतो आहे.

काय मित्रानो, तुम्ही पावसात भिजता का नाही?

सुधीर वैद्य
११-०९-२०१२ 

Advertisements

0 Responses to “१६९) पाऊस – एक चिंतन”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

September 2012
M T W T F S S
« Aug   Oct »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: