१६३) Privacy:

Image

१६३) Privacy:

काही  दिवसापूर्वी एका मित्राच्या घरी गेलो होतो. मनसोक्त गप्पा झाल्या. चहा – फराळ झाला. मी निघायच्या वेळेला मित्राचा नातू आला. माझ्याशी बोलला. शाळेतल्या गमती – जमती सांगितल्या. मग मी अच्छा करून निघालो. एवढ्यात त्या नातवाने मला विचारले की आजोबा, तुम्ही माझी खोली बघितली  का? मी म्हणालो नाही कारण त्या खोलीच्या दारावर एक नोटीस चिकटवली  होती, म्हणून मी आत गेलो नाही. नातू म्हणाला अहो आजोबा, तुम्ही तर घरचेच आहात. ती नोटीस बाहेरच्या लोकांसाठी आहे. मग त्याने मला कौतुकाने खोलीत नेले आणि त्याची खोली, अभ्यासाचे टेबल, कपाट वगैरे दाखविले.

मित्रानो, नोटीस  वाचा. माझा मित्र म्हणाला की Mall मध्ये खरेदीला वडिलांबरोबर गेला होता, तेव्हा नातवाने हा wall paper विकत घेतला व आपल्या खोलीच्या दारावर लावला. खरेतर नातू खूप प्रेमळ आहे. पण wall paper वरील मजकूर त्याच्यासाठी  गौण होता. काय सांगावे पुढे मागे त्याचा मुलगा ह्या  wall paper प्रमाणे वागायचा?

सुधीर वैद्य
०३-०९-२०१२

Advertisements

0 Responses to “१६३) Privacy:”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

September 2012
M T W T F S S
« Aug   Oct »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: