४३) रुपेरी किनार / सौ. कल्पना विलास जावडेकर

Image

४३) रुपेरी किनार / सौ. कल्पना विलास जावडेकर / वैद्यकीय / Live Liver Transplant /

हे पुस्तक Liver  च्या रोगाने बेजार झालेल्या लेखिकेच्या नवऱ्याची  कहाणी आहे. श्री. जावडेकर यांना  Liver चा आजार होतो. डॉ च्या मते हा आजार अनुवांशिक असतो. लेखिका स्वत:च्या Liver चा काही भाग नवऱ्याला donate करते व श्री. जावडेकर बरे होतात. ह्या वैद्यकीय संग्रामाची हि कहाणी आहे. अशी शस्त्रक्रिया भारतात होते आणि यशस्वी होण्याचे प्रमाण जवळ जवळ १०० % आहे. हि सर्व माहिती लोकांना कळावी ह्या उद्देशाने लेखिकेने  हे  पुस्तक  लिहिले  आहे व स्वत:च प्रकाशित केले आहे.

हि शस्त्रक्रिया होऊन पूर्ण बरे होई पर्यंतचा प्रवास एखाद्या अनुभवी लेखिके प्रमाणे सौ. कल्पना विलास जावडेकर यांनी शब्दबद्ध केला आहे. ह्या शस्त्रक्रियेला अंदाजे २५ लाख खर्च येतो. इतर अनेक खर्चाचा ह्यात अंतर्भाव नाही. शस्त्रक्रियेला २० तासाहून अधिक काळ लागतो आणि ५० डॉ चा ह्यात सहभाग असतो. हि शस्त्रक्रिया भारतात कोठे होते, डॉ ची माहिती, संपर्कासाठी पत्ता, फोन नंबर वगैरे माहितीही लेखिकेने गरजू रोग्यांसाठी पुरविली आहे. तसेच लिवर  संबंधी शास्त्रीय माहितीचेही संकलन केले आहे.

संवेदनशील माणसाने हे पुस्तक  वाचू नये असे मला वाटते कारण हे पुस्तक  आधी म्हटल्याप्रमाणे सत्य घटनेवर आधारित आहे. पण शब्दातून आणि पानापानातून शब्दबद्ध केलेल्या शारीरिक – मानसिक वेदना (ज्या लेखिकेने आणि नवऱ्याने वर्षानुवर्षे भोगल्या आहेत) वाचून मन सुन्न होते. कसे सोसले असेल त्यांनी? कदाचित फक्त आशावादाच ह्या प्रश्नाचे उत्तर असेल. सुरवातीला रोगाचे निदान होईपर्यंत लेखिका आणि श्री जावडेकर एकही उपाय करायचा सोडत नाहीत, दान धर्म, अंगारा, आयुर्वेदिक उपचार, वेगवेगळ्या pathological test. आपण  हि कधी तरी अशा प्रसंगातून गेलेलो असतो. अर्थात हि शस्त्रक्रिया होऊ शकली कारण त्यांची आर्थिक बाजू भक्कम होती. तसेच अशा कठीण परिस्थितीत साथ देणारे जीवाभावाचे  नातेवाईक आणि मित्र मंडळी होती. ह्या सर्वांचे आभार मानायला लेखिकेने एक संपूर्ण chapter लिहिला आहे.

फार कमी लोकांना वैद्यकीय वाचनाची माहिती असते. बारीक सारीक कारणासाठी डॉ. कडे पळत असतात. घरगुती उपाय माहिती असण्याची शक्यताही कमीच असते. Liver  हा आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे. तुम्हाला सांगितले तर नवल वाटेल  की  Liver हा अवयव स्वत:ला दुरुस्त करतो. त्यामुळे दारुड्या माणसाची लिवर खूप वर्षे अत्याचार झाल्यावर निकामी होते. लिवरचा तुकडा कापला तर परत वाढतो. आपली Liver बिघडली की आपण आजारी पडतो. ह्या Liver चे कार्य चांगले राहण्यासाठी एक सोपा उपाय सांगतो. दिवसातून एक कप गरम पाणी (उकळते नाही) दोन वेळा पिणे. Liver  तंदुरुस्त राहते. करून बघा. मी बरेच वर्ष हा उपाय करत आहे. वेळ मिळाल्यास माझ्या संकेत स्थळाला भेट द्या. Link: http://www.spandane.com/medical.html .

Medical  हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. 🙂 🙂

ज्यांना  Liver  चा त्रास आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे. इतरही वाचकांना ह्या पुस्तकातून शिकण्यासारखे आहे. उ.ह. आजारपणात खचून न  जाता कसे निभावले पाहिजे, नातेसंबंध कसे उपयोगी पडू शकतात, कोणत्याही कठीण प्रसंगी आशा जिवंत ठेवणे का गरजेचे आहे? इत्यादी.

आपल्या प्रतिक्रिया कळवा.

सुधीर वैद्य
२३-०७-२०१२

Advertisements

0 Responses to “४३) रुपेरी किनार / सौ. कल्पना विलास जावडेकर”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

July 2012
M T W T F S S
« Jun   Aug »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: